Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » दिल्लीतील बैठकीत निर्णय : पंकजा मुंडेंना मिळणार मोठी संधी !
    राजकारण

    दिल्लीतील बैठकीत निर्णय : पंकजा मुंडेंना मिळणार मोठी संधी !

    editor deskBy editor deskJune 21, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    बीड लोकसभा निवडणुकित मोठ्या चर्चेची ठरली आहे. यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभवाचा मोठा धक्का देणारा ठरलं असून आता पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. भाजपच्या गोटात त्यादृष्टीने हालचाली सुरु असल्याचे कळते. दिल्लीत नुकतीच भाजपच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. पीयूष गोयल आणि उदयनराजे भोसले हे लोकसभेवर निवडून आल्याने त्यांच्या राज्यसभेतील जागा रिक्त झाल्या आहेत. यापैकी एका जागेवर पंकजा मुंडे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास पंकजा मुंडे यांच्या पराभवामुळे कमालीचे निराश आणि नाउमेद झालेल्या त्यांच्या समर्थकांना मोठा दिलासा मिळू शकतो.

    राज्यात सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा संघर्ष सुरु आहे. त्यामुळे ओबीसी नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर घ्या, असा एक मतप्रवाह भाजपच्या राज्यातील नेत्यांमध्ये आहे. दिल्लीत झालेल्या बैठकीत राज्यातील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना राज्यसभेवर घेण्याची केंद्रीय नेतृत्वाला केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे या बीड मतदारसंघातून रिंगणात उतरल्या होत्या. त्या विजयाच्या प्रबळ दावेदार मानल्या जात होत्या. मात्र, शरद पवार गटाच्या बजरंग सोनवणे यांनी शेवटच्या फेरीपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढाईत पंकजा मुंडे यांचा पराभव केला होता. पंकजा यांचा हा पराभव बीड जिल्ह्यातील मुंडे समर्थकांसाठी मोठा धक्का ठरला होता. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांचे राज्यसभेवर पुनर्वसन झाल्यास मुंडे समर्थकांना काहीप्रमाणात दिलासा मिळू शकतो. मात्र, यापूर्वीही महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकीवेळी पंकजा मुंडे यांच्या नावाची जोरदार चर्चा व्हायची. उमेदवारीच्या शर्यतीत त्याच आघाडीवर आहेत, असे सांगितले जायचे. परंतु, प्रत्येकवेळी पंकजा मुंडे यांच्या समर्थकांची निराशा झाली होती. त्यामुळे आता या खेपेला तरी हे दुष्टचक्र भेदले जाणार का, हे पाहावे लागेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लाच प्रकरणात ‘माझी लिंक सापडली, तर राजीनामा निश्चित’ – झिरवाळांचा स्पष्ट इशारा

    February 13, 2026

    ‘अजित पवार लहान भावासारखे’; नाना पाटेकरांची भावनिक आठवण !

    February 13, 2026

    ‘व्हाइट कॉलर’ गुन्हेगारीचा आरोप; सदाभाऊ खोतांची जयंत पाटील यांच्यावर टीका

    February 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.