जळगाव : प्रतिनिधी काहीही कारण नसताना दुकानावर येऊन राजू रामदेव प्रजापत (वय ३८, रा. अरिहंत कॉलनी) या व्यावसायिकास एका जणाने शिवीगाळ करीत लोखंडी रॉड सारखी वस्तू डोक्यात मारली. या वेळी व्यावसायिकाच्या वडिलांनादेखील शिवीगाळ करण्यात आली. ही घटना गुरुवार दि. १८ जुलै कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य मार्केटमध्ये घडली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील धान्य मार्केट परिसरात असलेल्या दकानावर राजू प्रजापत हे गेले त्या वेळी तेथे गणेशवाडीतील एका जणाने येऊन त्यांना शिवीगाळ केली. व्यावसायिकाचे वडील तेथे आले असता त्यांनाही त्याने शिवीगाळ केली. तसेच लोखंडी रॉडसारखी…
Author: editor desk
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील घुमावल येथील भाजपायुमोचे तालुकाध्यक्ष आणि माजी सरपंच प्रकाश लक्ष्मण पाटील (४४) यांनी शुक्रवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मित्रमंडळी, नातेवाईक, आप्तेष्ट यांना ‘जय श्रीराम’चा मेसेज टाकून शनिवारी सकाळी ७ ते दुपारी १२ वाजेदरम्यान गळफास घेतला. त्यांच्या मालकीच्या शेतात झाडाला दोरी बांधून त्यांनी जीवन संपवले. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकलेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी ४ ते ४:३० वाजेदरम्यान त्यांच्या मोबाइलमध्ये नंबर असलेल्या सर्वांना त्यांनी ‘जय श्रीराम’चा मेसेज पाठवला आहे. दि. २० रोजी सकाळी ७ वाजता त्यांच्या दुचाकीवरून त्यांनी मारुती मंदिर परिसरात असलेल्या शेतात झाडाला दोरी बांधून गळफास घेतला. गळफास घेण्याआधी त्यांनी नेहमीप्रमाणे मारुती मंदिरातील देवाचा फोटो मोबाइलमध्ये…
जळगाव : प्रतिनिधी मुंबई व जळगावात दुचाकी चोरून त्या घेऊन फिरणाऱ्या प्रेम संजय बडगुजर (२०, रा. अयोध्या नगर) व अविनाश दिनकर बागुल (२७, रा. नगरदेवळा, ता. पाचोरा) या दोघांना रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या पथकाने ताब्यात घेत चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या. ही कारवाई शुक्रवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास रायसोनी नगरात करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, रामानंदनगर पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार संजय सपकाळे, पोहेकॉ सुशील चौधरी, जितेंद्र राजपूत जितेंद्र राठोड, हेमंत कळसकर, विनोद सूर्यवंशी, उमेश पवार हे गस्त घालत असताना रायसोनी नगरमध्ये मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास प्रेम बडगुजर, अविनाश बागुल हे संशयास्पदरित्या दोन दुचाकींवर फिरताना दिसले. त्यांची चौकशी करत त्यांच्याकडे असलेल्या दुचाकींविषयी…
मुक्ताईनगर : प्रतीनिधी पोलिस महासंचालकांच्या पथकाने मुक्ताईनगर तालुक्यातील बऱ्हाणपूर चौफुलीजवळ प्रतिबंधित गुटख्याचा कंटेनर पकडला. तब्बल १ कोटी ६ लाखांचा गुटखा जप्त करण्यात आला. वाहन चालकाला ताब्यात घेऊन चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, एवढ्या मोठ्या किंमतीचा पकडण्याची तालुक्यातील ही पहिलीच घटना आहे. लियाकत अली इस्लाम खान (रा. मेवात, हरियाणा), असे ताब्यात घेण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे, तर ट्रान्स्पोर्ट चालक सतीश शर्मा (रा. दिल्ली), त्यागी (रा. जयपूर) व मुबारक (रा. दिल्ली) आणि कंपनी मालक नीलू पंजाबी ऊर्फ निशू (रा. भिवाडी, राजस्थान) या चार जणांविरुद्ध मुक्ताईनगर पोलिसांत भारतीय न्यायसंहिता…
मेष राशी नियोजित कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. समाजात आपले स्थान निर्माण करण्यात यशस्वी व्हाल. लांबच्या प्रवासाला जाण्याची शक्यता आहे. कल्पकतेने काम करणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी अधिक लक्ष द्यावे लागेल. तुमचे वर्तन सकारात्मक ठेवा. व्यवसाय क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना उत्पन्नाच्या नवीन स्रोतांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. कामात अडथळे येतील. सामाजिक मान-सन्मान आणि प्रतिष्ठेचे भान ठेवावे लागेल. वृषभ राशी नोकरीच्या ठिकाणी परिस्थितीनुसार काम करणे फायदेशीर ठरेल. विद्यार्थ्यांनी नकारात्मक प्रवृत्ती टाळावी. सहलीला जाण्याचे योग येतील. विद्यार्थ्यांनी अभ्यासाव्यतिरिक्त इतर गोष्टींबाबत अधिक काळजी घ्यावी. महत्त्वाच्या कामात मतभेद वाढू शकतात. दिशाभूल करू नका. बुद्धीचा वापर करून योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. गोंधळात पडणे टाळा.…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील धामणगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य, विकासो संचालक यांनी आज आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. सरपंच लुभान बळवंत जगताप यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य एकनाथ सुभाषराव निकम, मनोज प्रभाकर निकम, दिलीप गोविंदराव जगताप, विकासो संचालक लालचंद जगन्नाथ मोरे, ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत मोरे, संदीप प्रभाकर निकम, पुंडलिक माधवराव मोरे यांनी आमदार मंगेश चव्हाण यांनी भारतीय जनता पक्षाचा रुमाल टाकून सर्वांचे स्वागत केले. यावेळी मार्केट संचालक कमिटी संचालक नवल पवार, माजी जि प सदस्य अनिल गायकवाड, सर्वोदय चे संचालक प्रशांत पाटील, भाजपा गटप्रमुख सुनील पवार, भूषण पाटील,…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबईमध्ये विनाकारण फिरण्यापेक्षा आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून कामे करा, आपल्या वक्तव्यामुळे महायुतीत बेबनाव होणार नाही याची कटाक्षाने काळजी घ्या, अशा सूचना करतानाच जागावाटपात मतदारसंघांची अदलाबदल झाल्यास तशाही परिस्थितीत निवडणूक लढवून जिंकण्याची तयारी ठेवा, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व आमदारांना इलेक्शन मोडवर आणले. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी शिवसेनेची बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित आमदार, मंत्री आणि पक्षाच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतानाच काही सूचनाही केल्या. ही बैठक जवळपास चार तास चालली. या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी पक्षाच्या आमदारांना आपापल्या मतदारसंघात तळ ठोकून बसण्याच्या सूचना केल्या. ज्यांचे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी असून आता महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेले कॉंग्रेस व शरद पवारांनी देखील विरोध करण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या विधानसभेला उद्धव ठाकरेच मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असे उद्धवसेनेकडून वारंवार सांगण्यात येत आहे. त्याला यापूर्वी शरद पवारांनी विरोध केला होता. आता काँग्रेसनेही उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर विधानसभा निवडणूक लढण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. शुक्रवारी (१९ जुलै) मुंबईत झालेल्या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल, महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या प्रमुख उपस्थितीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. महाविकास आघाडी हाच विधानसभेसाठी चेहरा असेल, असे स्पष्ट करण्यात आले. उद्धव सेनेचे खासदार संजय राऊत यांनी…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील चिंचोली येथील बाबुलाल मकुंदा पाटील (वय ६५) हे आपल्या पत्नीसोबत चिंचोली येथीलच लक्ष्मी नारायण मंदिराच्या दरवर्षाप्रमाणे जाणाऱ्या पंढरपूर पायी दिंडीत सहभागी झाले होते. त्यांच्यासोबत चिंचोली येथून बरीच भक्त मंडळी पंढरपूर यात्रेसाठी गेली होती. मिळालेल्या माहितीनुसार, आषाढी एकादशीच्या दिवशी विठ्ठल, रखुमाईचे दर्शन घेऊन ते १८ रोजी दुपारी पंढरपूर येथून घरी परतीच्या मार्गावर लागले. रस्त्यात अहमदनगर जवळ त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर दिंडीतील सेवेकऱ्यांनी त्यांना नगरच्या एका खासगी रुग्णालयातही दाखल केले. पंरतु, प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, २ मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे चिंचोलीसह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
भुसावळ : प्रतिनिधी महामार्गावरील नवोदय विद्यालयाच्या मागील बाजूस साकेगाव शिवारात एका अनोळखी मुलाचा निंबाच्या झाडाखाली मृतदेह आढळला. ही घटना १८ रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत घातपाताची शक्यता वर्तविली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साकेगाव शिवारात नवोदय विद्यालयाच्या मागील बाजूस यज्ञेश मोहन नेमाडे मित्रासह शेत पाहण्यासाठी गेले असता त्यांना निंबाच्या झाडाखाली सुमारे १४ ते १५ वर्षांच्या मुलाचा मृतदेह दिसला. त्यांनी तालुका पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक महेश गायकवाड, पोहेका संजय तायडे, संजय भोई, वाल्मिक सोनवणे, जगदीश भोई यांच्या पथकाने धाव घेत पाहणी केली. मृतदेहाच्या शेजारी टी-शर्ट निळ्या रंगाची…

