भुसावळ : प्रतिनिधी शहरातील रेल्वेस्थानकाजवळ मोटारसायकलवर मोबाइलवर बोलत जात असताना एका तरुणाचा हातातील ९ हजार रुपये किमतीचा मोबाइल दोघांनी लांबविला. ही घटना बुधवारी घडली. याप्रकरणी गुरुवारी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंडारी (ता. भुसावळ) येथील नागसेन कॉलनीतील दिनेश हरिदास घोडाम (३८) बुधवारी सकाळी १० वाजता दुचाकीवरून कामावर जात असताना अज्ञात दोन जणांनी त्यांचा रस्ता अडविला व त्यांच्या हातातील ९ हजार रुपये किमतीचा मोबाइल दुचाकीवर आलेल्या दोन जणांनी जबरी हिसकावून पसार झाले. त्यांनी आरडाओरड केली परंतु या संदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. गुरुवारी रात्री ११ वाजता भुसावळ शहर पोलिसात तक्रार देण्यात आली. याप्रकरणी भुसावळ शहर पोलिसात…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील रावेर व पिंपळगाव हरेश्वर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या गुन्हेगारांवर कारवाई करत चार जणांना एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी १९ रोजी दिले तसेच भोलाणे (ता. जळगाव) येथील किरण श्रावण कोळी (वय २८) या आरोपीलाही जिल्हाधिकाऱ्यांनी स्थानबध्द करत त्याची ठाणे कारागृहात रवानगी केली आहे. त्याच्या कारवाईबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने प्रस्ताव तयार केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या शेख तोसिफ शेख अफजल (२८, रा. रावेर); अयुब बशीर तडवी (५५, रा. कुसुंबा, ता. रावेर), मगन मुरलीधर करवले (४३, रा. अटवाडे, ता. रावेर) व पिंपळगाव पोलिस ठाणे हद्दीतील मनोहर उर्फ मोहन…
मेष राशी मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या लोकांना प्रमोशनसोबत पगारवाढीची खूशखबर मिळेल. काही महत्त्वाच्या कामात यश मिळेल. व्यवसायात उत्पन्न वाढण्याचे नवीन स्रोत उघडतील. राजकारणात तुम्हाला उच्च पद किंवा सन्मान मिळू शकतो. जमिनीच्या विक्रीतून लोकांना फायदा होईल. नोकरदार वर्गाला रोजगार मिळेल, कला-अभिनय क्षेत्रात काम करणा-या लोकांना सरकारकडून मोठा मानसन्मान मिळेल. वृषभ राशी आज चांगली बातमी मिळेल. महत्त्वाच्या कामात यश मिळेल. तुम्हाला स्वादिष्ट भोजन मिळेल. लांबच्या प्रवासाला जावे लागेल. कामाच्या ठिकाणी अधीनस्थांशी जवळीक वाढेल. राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील. व्यवसाय योजना गुप्तपणे अंमलात आणा. बांधकामातील अडथळे दूर होतील. मित्राकडून चांगली बातमी मिळेल. नोकरीच्या ठिकाणी बदलासह पदोन्नती होईल. धैर्य आणि शौर्य वाढेल. तांत्रिक ज्ञानामुळे मान-सन्मान…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या महिलेवर २१ जुन रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पतीला व मुलांना जीवेठार मारण्याची धमकी देत शेतात महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी १८ जुलै रोजी पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, जामनेर तालुक्यातील गावात विवाहिता पती आणि मुलांसह राहत आहे. शेती करून त्या आपला उदरनिर्वाह करतात. २१ जुन रोजी दुपारी ३ वाजता महिला व तिचे पती शेतात काम करत होते. त्यानंतर पती हे बियाणे घेण्यासाठी व मुलांना शाळेतून आणण्यासाठी शेतातून गावात निघून गेले. त्यावेळी त्यांच्या गावात राहणारा शंकर रमेश धनगर रा. शेंदुर्णी ता.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांसह दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत. ही अत्यंत महत्वाची बैठक असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रमुख नेत्यांची बैठक मुंबईतील गरवारे क्लब या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, नसीम खान, विश्वजीत कदम यांसह अनेक नेतेमंडळी उपस्थित राहणार आहेत.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील तरुणाचा त्याच्याच मित्राने निर्घुण खून करून मृतदेह नदीपात्रात फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून नदीपात्रात शोध घेतल्यानंतर तब्बल ९ तासांनी त्याचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर येत असून मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर शिवारातील डोलारखेडा भागात कुंड परिसरात आज शुक्रवार दि. १९ जुलै रोजी पहाटे उघडकीस आली. नितीन साहेबराव पाटील (वय २५, रा. कला वसंत नगर, असोदा रोड, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. तो आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे…
जालना : वृत्तसंस्था राज्यात सध्या आषाढी एकादशीनिमित्त अनेक भाविक विठूरायाच्या दर्शनासाठी गेले होते. तेथून परत येत असतांना दुचाकीला वाचवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव काळीपिवळी जीप विहिरीत कोसळली. या विचित्र अपघातात सात जण ठार, तर सात जण गंभीर जखमी झाले. जालना – राजूर रोडवरील तुपेवाडी शिवारातील वसंतनगर येथे गुरुवारी सायंकाळी ५ वाजता ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये पंढरपूरहून परतणारे ६ वारकरी, तर एका प्रवासी महिलेचा समावेश आहे. मृतांपैकी पाच जण बदनापूर तालुक्यातील चनेगावचे, एक भोकरदन तालुक्यातील तुपेवाडी, तर एक जण खामखेडा येथील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोकरदन तालुक्यातील चनेगाव, तुपेवाडी, राजूर येथील भाविक हे १५ दिवसांपूर्वी आषाढीनिमित्त पंढरपूर येथे अगस्त ऋषी महाराज…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील लोंढरी बु., येथे पैशाच्या व्यवहारातून जावयाने सासऱ्याच्या पोटात चाकू मारून प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पहूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, जावई अटकेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जावई अमोल कृष्णा ठुबे (लोंढरी) याच्याकडे सासरे कैलास रामधन पाटील (सवतखेडा) यांचे पैसे घेणे होते. या व्यवहारासाठी अमोल याने बुधवारी सासरे कैलास पाटील यांना घरी बोलावून घेतले. यादरम्यान दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची होऊन हाणामारीत रूपांतर झाले. यावरच अमोल न थांबता त्याने चक्क सासऱ्याच्या पोटात खोलवर चाकू घालून आतडे बाहेर काढून गंभीर जखमी केल्याचे दिलेल्या जबाबात कैलास पाटील यांनी म्हटले आहे. माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक भरत दाते, पोलिस…
जळगाव : प्रतिनिधी बालाजीपेठ परिसरातून एका वृध्दाच्या उघड्या घरातून १३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरून नेले. याप्रकरणी दुपारी साडेतीन वाजता शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, चोरट्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ओंकार सोनवणे (वय २०, रा. रिधूरवाडा ता. जळगाव) असे संशयिताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रदीप कन्हैय्या प्रजापती (वय ६२, रा. ओम नगर) हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहेत. त्यांचे बालाजी पेठमधील ओम नगरात जुने घर आहे. त्या ठिकाणी ते जेवण करून आराम करण्यासाठी जात असतात. ते दरवाजा उघडा ठेवून पलंगावर झोपले असतांना संशयिताने घरात घुसून १३ हजार रुपये किमतीचे दोन मोबाइल चोरून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील राखुंडे नगरातील रहिवासी असलेल्या एमबीएचे शिक्षण घेत असलेल्या २५ वर्षीय तरुणास तिघांनी पिस्तुलाचा धाक दाखवीत चारचाकी वाहनातून अपहरण करीत मारहाण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. मिळालेली माहितीनुसार, सटाणा गावाजवळील पेट्रोलपंपावर अपहरणकर्ते गाडीत पेट्रोल भरण्यासाठी थांबले असता या तरुणाने आरडाओरड केल्याने पंपावरील कर्मचाऱ्यांमुळे या तरुणाची सुटका झाली. या प्रकरणी १८ रोजी अनिकेत महेंद्र उर्फ बाळू मोरे, कृष्णा जिभाऊ झालटे, मेहुल मोरे (सर्व चाळीसगाव) यांच्यासह तीन अनोळखी इसमांच्या विरोधात कलम १०९, १७३ (२), १४० (१), १४० (२), १४२ आणि ६०नुसार गुन्हा दाखल झाला आहे. १७ रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास कल्पेश सुनील पाटील हा…

