Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगाव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न
    क्रिंडा

    जळगाव छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

    editor deskBy editor deskJune 21, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    आज दहावा आंतरराष्ट्रीय योगा दिन जळगाव मधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात दोन हजारापेक्षा अधिक खेळाडू, विद्यार्थी आणि नागरिकांनी सहभागाने उत्साहात साजरा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योगा दिन ” म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. त्याअनुषंगाने 21 जून रोजी जळगाव जिल्ह्यात आज सकाळी हा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा झाला.

    जळगांव जिल्हा प्रशासन च्या वतीने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी, जळगांव, नेहरू युवा केंद्र संघटन, जळगांव जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघ, जळगांव जिल्हा क्रीडा संघटना महासंघ, जळगांव जिल्हा योग संघटना, पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान न्यास, जळगांव, यांचे संयुक्त विद्यमाने श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगांव येथे सकाळी ७.०० वाजता जळगांव जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद साहेब यांचे हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले.

    यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अंकीत,प्रशिक्षणार्थी आय. ए. एस. अधिकारी वेवोतोलु केजो, शिक्षणाधिकारी माध्यमिक श्रीमती जयश्री चव्हाण, शिक्षणाधिकारी प्राथमिक श्री विकास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनिकेत पाटील, श्री नरेंद्र, समन्वयक नेहरू युवा केंद्र संघटन जळगांव, श्रीमती सरला पाटील गट शिक्षणाधिकारी, श्री खलील शेख, गट शिक्षणाधिकारी, श्री विनोद बियाणी, रेड क्रॉस, श्रीमती जयश्री पाटील, श्री समाधान बर्कले, पतंजली योग समिती, जळगांव, श्रीमती डॉ अनिता पाटील, जळगांव जिल्हा हौशी योग असोसिएशन, प्रा डॉ नारायण खडके, शिव छत्रपती पुरस्कारर्थी, श्री किशोर चौधरी, श्री सुमेध तळवेलकर, शिव छ्त्रपती क्रीडा पुरस्कारार्थी आदी मान्यवर उपस्थीत होते.

    जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सुरुवातीला सर्व सहभागी विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या, श्री रविंद्र नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी सर्व मान्यवरांचे योगा चे पुस्तक देऊन स्वागत केले. त्या नंतर कॉमन योगा प्रोटोकॉल नुसार सर्व उपस्थितांनी योगासने आणि प्राणायाम केले. या कॉमन योगा प्रोटोकॉल चे प्रात्यक्षिक जळगांव जिल्हा हौशी योग असोसिएशन च्या खेळाडूंनी सादर केले. अनुभुती इंग्लिश मेडियम स्कुल द्वारा म्युझिकल योगा विद्यार्थ्यांमार्फत प्रात्यक्षिक क्रीडा शिक्षक श्रीमती स्मिता बुरकुल, श्रीमती श्वेता कोळी यांचे मार्गदर्शनाखाली सादर केले.

    सर्व विद्यार्थ्यांना जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालया मार्फत सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. उपस्थितांचे आभार श्रीमती सुजाता गुल्हाणे, क्रीडा अधिकारी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्या करीता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे श्री मिनल थोरात, श्री किशोर चौधरी, श्री भारत देशमुख, श्री विनोद कुलकणि, श्री उमेश मराठे, श्री गोविंद सोनवणे, श्री विनोद माने, श्री संजय महिरे, श्री सुरज पवार, श्री अविनाश महाजन यांनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    सर्वांसमोर झालेला अपमान जीवावर बेतला; २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूने जळगाव हळहळले

    February 17, 2026

    शेतात पाणी भरण्यास निघालेल्या तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू

    February 16, 2026

    दारूच्या नशेत वाद, तरुणाचा निर्घृण खून; अल्पवयीनसह दोघे ताब्यात

    February 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.