Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भाजपने दिली मंत्री महाजनांवर मोठी जबाबदारी
    राजकारण

    भाजपने दिली मंत्री महाजनांवर मोठी जबाबदारी

    editor deskBy editor deskJune 21, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन यांच्यावर पक्षाने आता मोठी जबाबदारी दिली आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघ निवडणुकीच्या भाजप प्रभारीपदी मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जून रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी महायुतीतून शिवसेना शिंदे गटाकडून किशोर दराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीतून अजित पवार गटाने महेंद्र भावसार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. यामुळे महायुतीत बिघाडी झाली असून भाजपचे संकटमोचक अशी ओळख असलेले गिरीश महाजन यांची पक्षाकडून प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गिरीश महाजन यांची नियुक्ती केली आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्या पाठीशी भाजपची ताकद लागणार आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवार दिल्याने महायुतीत आधीच मिठाचा खडा पडला आहे. शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे महेंद्र भावसार, ठाकरे गटाचे संदिप गुळवे आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्याशी करावा लागणार सामना करवा लागणार आहे. आता मंत्री गिरीश महाजन नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत काय करिष्मा करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    अजित पवार स्मारक व संग्रहालयाचा वाद; जय-पार्थ पवार यांची भूमिका भिन्न

    February 11, 2026

    ‘जन गण मन’पूर्वी वाजणार ‘वंदे मातरम’; केंद्राचे नवे नियम जाहीर

    February 11, 2026

    अजित पवारांच्या विमान अपघातावर प्रश्नचिन्ह; रोहित पवारांची भावनिक पत्रकार परिषद

    February 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.