Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » राजकीय चर्चेला उधान : गृहमंत्र्यांची आ.खडसेंनी घेतली भेट
    जळगाव

    राजकीय चर्चेला उधान : गृहमंत्र्यांची आ.खडसेंनी घेतली भेट

    editor deskBy editor deskJune 21, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    जळगाव जिल्ह्यातील दिग्गज नेते आ.एकनाथ खडसे यांनी गुरुवारी रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या स्नुषा तथा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेही उपस्थित होत्या. या भेटीमुळे गत काही महिन्यांपासून भाजप प्रवेशाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या एकनाथ खडसे यांचा स्वगृही परतण्याचा मुहूर्त ठरल्याचा दावा केला जात आहे. विशेषतः त्यांच्या खांद्यावर भाजप एखादी मोठी जबाबदारी देईल अशी चर्चाही या प्रकरणी राजकीय वर्तुळात रंगली आहे.

    एकनाथ खडसे हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य आहेत. तर त्यांच्या सून रक्षा खडसे या भाजपमध्ये आहेत. त्यांनी नुकताच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. नाथाभाऊंच्या आशीर्वादाने त्यांनी निवडणुकीत चमकदार कामगिरी केली. त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यानंतर आता या भेटीनंतर खडसे यांनी अमित शहा यांची भेट घेतल्यामुळे यांचा भाजप प्रवेश निश्चित झाला असल्याचे मानले जात आहे.

    अमित शहा आणि एकनाथ खडसे यांच्यात या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण याविषयी वेगवेगळ्या तर्कवितर्कांना उधाण आले आहे. एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपमध्ये प्रवेश करण्याची घोषणा केली होती. तसेच आपला प्रवेश राज्यात नव्हे तर दिल्लीत होणार असल्याचेही ते म्हणाले होते. त्यानंतर त्यांनी रक्षा खडसे यांच्या विजयासाठी चांगलाच जोर लावला होता. त्यामुळे रक्षा खडसे यांच्या रावेर लोकसभा मतदारसंघातून झालेल्या विजयात त्यांचा मोठा वाटा आहे. आता खडसे यांचा पुन्हा भाजपत प्रवेश कधी होतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    साकेगाव बसस्थानकावर थरार : ५ ते ६ जणांच्या टोळक्याचा दोघांवर जीवघेणा हल्ला !

    September 30, 2026

    कार्यालयात घुसून गोळीबार; ठाकरे गटाचे प्रदीप पूर्णेकर ठार, ठाण्यात खळबळ

    September 30, 2026

    पेन्शनच्या ऑफरची लिंक उघडली अन् खात्यातून ३.८५ लाख ट्रान्सफर; जळगावात सायबर फसवणूक

    September 30, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.