Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील जम्मू काश्मीर येथे गेल्या काही महिन्यापासून दहशतवाद्यांकडून हल्ला होत असल्याच्या घटना नियमित घडत आहे. नुकतेच जम्मूच्या राजौरी येथे सोमवारी 22 रोजी सकाळी दहशतवाद्यांनी लष्कराच्या छावणीवर हल्ला केला. यामध्ये एक जवान जखमी झाला. लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, दहशतवाद्यांनी राजौरीतील गुंधा येथील 63 आरआर आर्मी कॅम्पवर गोळीबार केला, ज्यावर प्रत्युत्तराची कारवाई करण्यात आली. यावेळी एका जवानाला गोळी लागली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अधिक सुरक्षा दल घटनास्थळी पाठवण्यात आले. लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. 16 जुलै रोजी जम्मूच्या डोडा जिल्ह्यातील देसामध्ये दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर हल्ला केला होता.…

Read More

पारोळा : प्रतिनिधी येथील राष्ट्रीय महामार्गावरील सावखेडा होळ गावाजवळ रविवारी सकाळी ७:०० वाजेच्या सुमारास कंटेनर व टेम्पो यांच्यात समोरासमोर अपघात झाला. त्यात एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाल्याची घटना घडली. सविस्तर वृत्त असे कि, रविवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास जळगावहून धुळ्याकडे जाणारा कंटेनर (सीजी ०६ एम ११६६) हा भरधाव वेगाने येत होता. त्याचवेळी समोरून येणाऱ्या टेम्पोला (एमएच ११ बीएल ३११२) जोरदार धडक दिली. त्यात सातजण जखमी झाले. यात राहुल गणपत चव्हाण, रोहिदास परशुराम चव्हाण (दोन्ही मोरगाव तांडा, ता. जामनेर), गणेश पुरा चव्हाण, राघो ओंकार चव्हाण, दारासिंग ओंकार चव्हाण, ट्रालीवरील चालक व क्लिनर (नाव गाव माहीत नाही) हे जखमी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी मुलाकडून जेवणाचा डबा घेऊन जात असताना भरधाव दुचाकीने धडक दिल्यामुळे पेमा सुडिया बारेला (६८, रा. कठोरा, ता. जळगाव) हे ठार झाले. हा अपघात शनिवारी रात्री जळगाव ते भोकर रस्त्यावर झाला. या प्रकरणी तालुका पोलिसात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, मूळचे इंद्रापूर, जि. बडवाणी (मध्यप्रदेश) येथील रहिवासी असलेले पेमा बारेला हे सध्या तालुक्यातील कठोरा येथे राहत होते. त्यांच्या घरापासून काही अंतरावर राहत असलेल्या मुलाकडून जेवणाचा डबा घेऊन पायीच घरी जात होते. त्यावेळी त्यांना भरधाव दुचाकीने (क्र. जी. जे. ०५, जीपी ९१२६) जोरदार धडक दिली. अपघातानंतर बारेला यांना रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील बोदर्डे येथील 47 वर्षीय प्रौढाने खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना २१ जुलै रोजी उघडकीस आली. याबाबत मंजुळाबाई मिस्तरी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती संतोष हिरामण मिस्तरी यांनी गावातील अशोक दयाराम चौधरी यांच्याकडून २० हजार रुपये व मुडी येथील भालेराव गोविंदा महाजन यांच्याकडून १५ हजार रुपये व्याजाने घेतले होते. संपूर्ण कुटुंबीय मोलमजुरी करून २० हजारांचे आठवड्याला दोन हजार व १५ हजारांचे महिन्याला तीन हजार असे व्याज देत होते. मात्र दोघेही घरी येऊन व्याजाचे पैसे का देत नाही? असे विचारून त्रास देत असत. तसेच संशयितांनी वेळोवेळी सुतारकाम करण्याचे साहित्य, दुचाकी तसेच घरातील वस्तू…

Read More

मेष राशी आजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचे विरोधक बनू शकतात. त्यांच्यापासून सावध राहा. आज तुम्हाला नियोजनपूर्वक काम करावे लागेल. व्यवसायात नवीन उपकरणांचा समावेश केला तर तुम्हाला त्याचा लाभ होईल. तुमच्या यशाच्या मार्गात कोणता अडथळा येत असेल तर तो आज दूर होईल. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. तब्येतीची काळजी घ्या. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. आज एखाद्या खास व्यक्तीची भेट होईल. तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांची आज मनोकामना पूर्ण होईल. आज तुम्ही अधिक खर्च कराल. तुमच्या उत्पन्न आणि खर्चाचा बजेट तयार करा.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था पुण्यात भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती लाभली होती. यावेळी त्यांनी राहुल गांधींसह उद्धव ठाकरे यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल चढवला. फेक नरेटिव्ह करून विरोधकांनी थोडा बहुत विजय मिळवला, पण आता विधानसभेत त्यांचा खोटारडापणा बाहेर पडेल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. स्वतःला बाळासाहेब ठाकरे यांचे वारस म्हणणारे आता औरंगजेब फॅन क्लबचे नेते बनले आहेत, असा हल्लाबोल शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला. अमित शहा यांनी केला. कॉंग्रेसवाले अनेक अपप्रचार करत आहेत. परंतु यांनी 60 वर्षांमध्ये गरीबांच्या कल्याणासाठी काय काम केले. हे काहीही करू शकत नाही. आरक्षणाचा अपप्रचार केला. संविधान हटावचा अपप्रचार केला, पण आता…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात आज भाजपचे महाअधिवेशन सुरु असून या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती असून यावेळी उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी देखील सवांद साधला आहे. भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी उत्तर देता येते, पण तो विचार करतो की, आदेश आला तर उत्तर देईल. मात्र, आता सर्व पदाधिकाऱ्यांनी आदेशाची वाट न बघता जशाच्या तसे उत्तर द्या. केवळ हीट विकेट होऊ द्यायची नाही, चार दिवस आपल्या बोलण्याचीच उत्तरे द्यावे लागतील असे बोलू नका. खरे बोलायला विचार करावा लागत नाही, तुम्ही खोट्याला खऱ्याने उत्तर द्या, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था लंडनहून महाराष्ट्रात आणलेल्या शिवकालीन वाघनखांच्या मुद्द्यावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. वाघनख वस्तुसंग्रहालयात ठेवण्यासंदर्भातील कार्यक्रमामध्ये विरोधकांवर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नकली वाघांना वाघनखांचे महत्त्व कसे कळणार अशी टीका केली. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाघनखांवर विवाद करुन नये. या रोगाचा सामना आजचा नाही. छत्रपतींच्या काळातही तो होता. मात्र चाणाक्षपणे तो विरोध मोडून काढत शिवरांयांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले. वाघनखे ही छत्रपती शिवारायांच्या पराक्रमाचे निदर्शक आहेत. त्यावर कोणी शंका घेऊन नये, असे म्हणत विरोधकांवर टीका केली. या टीकेला ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी जशास तसे उत्तर दिले आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी भारतीय जनता पार्टीचा कोणत्या…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी आतापासून तयारी सुरु केली असतांना नुकतेच पुण्यात आज भाजपचे महाअधिवेशन पार पडणार आहे. या महत्वाच्या बैठकीला गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे अमित शहा विधानसभेचे रणशिंग फुंकणार असल्याचे बोलले जात आहे. या बैठकीसाठी भाजपकडून जय्यत तयारी करण्यात आली असून 5 हजार 300 पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या बैठकीसाठी शनिवारीच गृहमंत्री शहा पुण्यात दाखल झाले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील त्यांच्या स्वागतासाठी पोहचले होते. भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची ही बैठक बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत आगामी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेतून पडल्याने ईश्वर मोतीराम ठाकूर (वय ५८, रा. इंद्रप्रस्थनगर) या महापालिकेतील कर्मचाऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास भुसावळ रेल्वे स्थानकाजवळ घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील इंद्रप्रस्थ नगरात ईश्वर मोतीराम ठाकूर हे वास्तव्यास असून ते महापालिकेतील मार्केट वसुली विभागात नोकरीस होते. शनिवारी दुपारच्या सुमारास ते रेल्वेने भुसावळकडे जात असतांना रेल्वे स्टेशनाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. ही घटना रेल्वे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्यांच्याजवळ असलेल्या कागदपत्रांवरुन त्यांनी ओळख पटवल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांनी लागलीच…

Read More