Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील उमाळे गावाजळील पाझर तलावानजीक मंगळवारी (२४ जुलै) सकाळी अनिल कमलाकर जाधव (३५, रा. उमाळे, ता. जळगाव) हे मृतावस्थेत आढळून आले. त्याच्या मृत्यूचे कारण समजू शकले नाही. सविस्तर वृत्त असे कि, शेतमजुरी करणारे अनिल जाधव हे आई-वडिलांसह उमाळे येथे राहत होते. सोमवारी (२२ जुलै) रात्री ते घरातून बाहेर गेले होते. मंगळवारी (२३ जुलै) सकाळी सात वाजता उमाळे गावापासून जवळच असलेल्या एका पाझर तलावाजवळ ते पडलेले आढळले. त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. अनिल जाधव हे अविवाहित होते. काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते, अशी माहिती त्यांच्या मित्रांनी दिली. मयताच्या…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील गजबजलेल्या शास्त्रीनगरातील कुटुंब कुलदेवताला राजस्थानमध्ये गेले असता अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घरातून सोन्याच्या दागिन्यांसह रोकड रक्कम असा ४ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, शुक्रवारी दुपारी २:३० वाजता अनिकेत रमेश भावसार व त्यांचे कुटुंब कुलदैवत आंबाजी माता अबुरोड राजस्थान येथे दर्शनासाठी घराला कुलूप लावून गेले होते. दि. २२ रोजी सकाळी पावणेआठच्या वाजेच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटच्या समोर राहणारे सचिन चौधरी यांनी त्यांच्या घराचा दरवाजा उघडा असल्याने फोनवरून सांगितले. व्हिडीओ कॉलवर त्यांना बेडरूममधील कपाटाचे लॉकर उघडल्याचे दिसून आले. त्यामुळे मंगळवारी सकाळी ते घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना घराचा दरवाजा तुटलेला…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील खोलचर येथे मुलास मारहाण केल्याप्रकरणी वडिलांनी पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून तिघांनी बाप-लेकास मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील खोलचर येथे दि. २१ रोजी रामचंद्र भट्टू हटकर यांच्या मुलास काही कारण नसताना गावातील शिवाजी सजन हटकर, अरुण शिवाजी हटकर, भुरा शिवाजी हटकर (सर्व खोलचर, ता. पारोळा) यांनी मारहाण केली होती. याबाबत पारोळा पोलिसात तक्रार अर्ज दिला होता. याचे वाईट वाटल्याने मंगळवारी सकाळी ९ वाजता पुन्हा या तीन जणांनी रामचंद्र हटकर यांना लाकडी दांड्याने मारहाण केली व शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पारोळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read More

जळगाव : प्रतिनिधी खरंच नेता असावा तर गुलाबराव पाटील यांच्या सारखा.. ज्यांना शेतकरी, विद्यार्थी, दिव्यांग, वारकरी, वयोवृद्ध, सर्वांची काळजी आहे. जनता त्यांना उगाचच ‘आपला गुलाबभाऊ म्हणत नाही. गोरगरिबांचा नेता, आपला गुलाबभाऊ, अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत इलेक्ट्रिक सायकल स्वीकारल्यानंतर लाभार्थी बांधवांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. हा गोड सोहळा आज सायंकाळी जळगाव ग्रामीण मतदार संघातील भोकर गावात संपन्न झाला. भोकर गावात दिव्यांग बांधवांना पहिल्या टप्प्यात ४ तर आज दुसऱ्या टप्प्यात ७ इलेक्ट्रिक सायकल वाटप करण्यात आल्यात. त्यात १) अनिल अशोक पवार २) रघुनाथ एकनाथ वाघ ३) ज्ञानेश्वर भगवान बाविस्कर ४) राकेश प्रभाकर सोनवणे ५) अनिल सुकदेव भोई ६) दिलीप नाना पाटील,…

Read More

मेष राशी आजचा दिवस संमिश्र राहणार आहे. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं पूर्ण फळ मिळेल. तुम्ही तुमचं उत्पन्न वाढवण्याच्या स्त्रोतावर लक्ष द्याल. शेजाऱ्यांसोबत वाद घालू नका. कार्यक्षेत्रात महत्त्वाची जबाबदारी मिळेल. आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. आर्थिक गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. तुमचं मन एखाद्या गोष्टीमुळे त्रस्त असेल. घरात एखाद्या कारणावरून वाद होऊ शकतो. जीवनसाथीला नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. वाहन खरेदी करताना मित्रांचा सल्ला घ्या. वृषभ राशी आजचा दिवस तुम्हाला प्रसन्न करेल. तुम्हाला तुमच्या कामांबाबत सचेत राहावं लागणार आहे. घरी पाहुण्यांचं आगमन होणार आहे. वडिलांनी एखादा सल्ला दिल्यास त्याची अंमलबजावणी करा. विनाकारण कोणतीही रिस्क घेऊ नका. नोकरीचा शोध घेणाऱ्यांना दिलासा देणारी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एनडीए सरकारचा अर्थसंकल्प सादर केला असून यात त्यांनी विविध क्षेत्रासंदर्भात मोठ्या घोषणा केल्या आहेत. परंतु, सर्वसामान्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय असलेल्या सोनं-चांदीच्या दरातही मोठी कपात या बजेटमधील निर्णयाने झाली आहे. त्यामुळे जळगाव आणि पुण्याच्या सराफ बाजारात याचा परिणाम देखील दिसून आला आहे. अवघ्या दोन तासांमध्ये प्रति तोळा 3 हजारांनी सोनं स्वस्त झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे सोने खरेदीसाठी ग्राहकांनी सराफा बाजारात गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्ममधील पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. यात सोन्याच्या कस्टम ड्युटीमध्ये मोठी कपात करण्याचा निर्णय घेण्यात…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प आज दि. २३ सादर झाला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी सलग सातवा अर्थसंकल्प मांडला. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांनी गरीब, तरुण, महिला, शेतकरी अशा महत्त्वाच्या घटकांवर लक्ष केंद्रित करण्याचा सरकारकडून प्रयत्न केला जात असल्याचे म्हटले आहे. यासह अर्थसंकल्पात सीतारामन यांनी अनेक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. ३ लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. नवीन कर प्रणालीमध्ये ० ते ३ लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नाही. नव्या करप्रणालीत ३ लाख रुपयांपर्यंत करातून सूट देण्यात आली आहे. नवीन कर प्रणाली अंतर्गत करदर संरचना खालीलप्रमाणे सुधारित…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या पावसाचा चांगलाच जोर वाढत असतांना दरम्यान हतनूर धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली असून हतनूर धरणाचे १८ दरवाजे उघडण्यात आले आहे. यामुळे तापी नदीच्या दोन्ही तिरांवरील नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारी हतनूर धरणाचे ४१ पैकी १२ दरवाजे १.० मी. उंचीने सकाळी दुघाज्ञात आले होते. तापी नदीपात्रामध्ये २३०९६ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. पुढील काही तासांत ३५ हजार ते ४५ हजार क्युसेक पर्यंत विसर्ग हतनूर धरणातून होण्याची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने सायंकाळी १८ दरवाजे उघडण्यात आले. यामुळे तापी काठच्या नागरिकांनी आवश्यक खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यात बालविवाहाचे प्रमाण जास्त असून ते कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन मार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जानेवारी २०२१ मध्ये जिल्हा कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. बालविवाह मुक्त जिल्हा करण्यासाठी व त्याबाबत योग्य ते नियोजन, अंमलबजावणी व निर्णय या कृती दलामध्ये घेण्यात येतात. त्यानुसारच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.अंकित सर आणि मा. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद सर यांच्या जिल्हा कृती दल बैठकीतील सूचनांनुसार सक्षम बालविवाह निर्मूलन कार्यक्रमांतर्गत महिला व बालविकास विभाग, युनिसेफ, एसबीसी-३ व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य,पंचायत,शिक्षण महिला व बालकल्याण आणि जिल्हा महिला व बालविकास विभाग मधील तालुकास्तरीय तसेच क्लस्टर मधील अधिकारी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केलेल्या उदय रमेश मोची वय २६, रा. रामेश्वर कॉलनी हा कुठलेही परवानगी न घेता घरी मिळून आला. यापक्ररणी त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील रामेश्वर कॉलनीतील बांधाजवळील उदय मोची याला दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. परंतु त्याने पोलीस अधीक्षक किंवा शासनाची कुठलीही परवानगी न घेता, तो शहरातील त्याच्या घरी आलेला होता. पोलिसांनी त्याच्या घराची तपासणी केली असता, तो घरी मिळून आला. याप्रकरणी त्याने पोलीस अधीक्षक यांनी पारित केलेल्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कर्मचारी किरण पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन संशयित उदय रमेश मोची याच्याविरुद्ध गुन्हा दाखल…

Read More