Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी रात्री घरातून गेलेल्या सोनू राजू बनसोडे (२७, रा. समतानगर) या तरुणाचा मृतदेह समता नगरातील एका विहिरीत आढळून आला. पाण्यावर चपला तरंगताना दिसल्याने बुधवारी (२४ जुलै) सकाळी सात वाजता ही घटना उघडकीस आली. सविस्तर वृत्त असे कि, आई व बहिणीसह समतानगरात राहणारा सोनू बनसोडे हा तरुण मंगळवारी (२३ जुलै) रात्री ११ वाजता बाहेर जात असल्याचे सांगून घराबाहेर गेला होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने शोधाशोध सुरू केली. बुधवारी (२४ जुलै) सकाळी ७ वाजता समता नगरातील विहिरीत चपला तरंगताना दिसल्या. त्यामुळे या ठिकाणी काही जणांनी गर्दी केली होती. या चपला सोनूच्याच असल्याचे त्याच्या आईने ओळखले.…

Read More

धुळे : प्रतिनिधी शहरातील फागणे गावाजवळ १८ जुलै रोजी सायंकाळी धरणगाव येथील व्यावसायिक आणि त्यांच्या मित्रांची १० लाख ९१ हजार ९०० रुपयांची रोकड लुटण्यात आली होती. या गुन्ह्याची उकल स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने केली असून याप्रकरणी धुळ्यातील पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. एक संशयित फरार आहे. सविस्तर वृत्त असे कि, १८ जुलै रोजी एमएच १९ बीई १८०७ क्रमांकाच्या दुचाकीने किशोर पंढरीनाथ पाटील (रा. धरणगाव, जि. जळगाव) हे व्यावसायिक त्यांचे मित्र अतुल लक्ष्मीनारायण काबरा यांच्यासह धरणगावला जात होते. त्यांच्याकडे सोयाबीन विक्रीची १० लाख ९१ हजार ९०० रुपयांची रोकड होती. ते फागणे गावाजवळ पोहोचले असता त्यांना दोन अनोळखी तरुणांनी अडविले…

Read More

भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वाडे येथील जवान समाधान सखाराम महाजन (वय २३) यांचे २४ रोजी मालपूरजवळ अपघातात निधन झाले. सविस्तर वृत्त असे कि, वाडे येथील सुपुत्र समाधान महाजन हे आर्मीमध्ये नोकरीला होते ते एका महिन्याच्या सुटीवर घरी आलेले होते. सुटी उपभोगून कर्तव्यावर हजर होण्यासाठी कामी परतीचा प्रवास करीत असताना मालपूरजवळ रेल्वे अपघातात त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे विभागाकडून परिवारास देण्यात आली. समाधान सखाराम महाजन हे ४० आरआरजेएनके, पुच्छ येथे कार्यरत होते. समाधान यांचे दीड वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. ते सखाराम आनंदा महाजन यांचे एकुलते एक पुत्र होत. त्यांच्या पश्चात आई, वडील, दोन बहिणी, पत्नी, असा परिवार आहे. या घटनेची माहिती…

Read More

मेष राशी आजचा दिवस तुमची पद आणि प्रतिष्ठा वाढवणारा असेल. आज तुम्हाला एकाचवेळी अनेक कामे मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही व्यस्त व्हाल. तुमचा रखडलेला पैसा तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कार्यक्षेत्रात तुम्हाला तुमच्या वरिष्ठांचं मार्गदर्शन मिळेल. धार्मिक कार्यात अग्रेसर असाल. आज तुमच्या समोर काही आव्हाने उभे ठाकतील. पण घाबरून जाऊ नका. त्यावर मात करा. वृषभ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी अतिशय चांगला जाणार आहे. घरात लग्न सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असेल. त्यामुळे घरातील सर्व सदस्य त्यात व्यस्त होतील. कोणत्याही कामाची घाई करू नका. चांगलं काम केल्यास अधिकारी तुमच्या कामाचं कौतुक करतील. समाजात तुम्हाला नवीन ओळख…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षण व ओबीसी आरक्षणाचा वाद सुरु होता त्यानंतर पुन्हा एकदा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले होते. मात्र बुधवारी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. त्यांनी सरकारला आपल्या मागण्यांसाठी 13 ऑगस्टपर्यंतची मुदत दिली आहे. सलाईन लावून घेत उपोषण करण्यात अर्थ नाही. समाजानेही उपोषण सोडण्याचा हट्ट धरला आहे. आरक्षणासोबतच आम्हाला तुम्हीही हवे आहात असे त्यांचे म्हणणे आहे, असे जरांगे यांनी आपले उपोषण स्थगित करताना म्हटले आहे. मनोज जरांगे पाटील पुढे बोलताना म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लढा देणारे मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी 5…

Read More

रावेर : प्रतिनिधी रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंजाबी ढाब्यावर पोलिसांनी गावठी बनावटीची पिस्टल आणि दोन जिवंत काडतुसे सह एका संशयित आरोपीला रावेर पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि,  सहाय्यक पोलिस अधिक्षक फैजपूर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर, फैजपूर विभाग कार्यालय आणि रावेर पोलिस स्टेशनच्या पथकाने पाल ते रावेर रोडवर पंजाबी ढाब्यावर छापा टाकला. या छाप्यात इसम इरफान नबाब तडवी (वय -३६, रा. सहस्त्रलिंग, ता. रावेर) याला अवैधरीत्या गावठी बनावटीची पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे घेऊन फिरत असल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारवाई करत संशयित आरोपीला अटक…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था नेपाळची राजधानी असलेल्या काठमांडू येथे विमान कोसळल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या विमानातील 19 जणांपैकी 18 जणांचा मृत्यू झाला आहे. जखमी पायलट कॅप्टन मनीष शाक्य यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी 11 वाजता त्रिभुवन विमानतळावरून विमानाने उड्डाण केले. काही क्षणातच ते कोसळले. 9N-AME हे विमान सूर्या एअरलाइन्सचे होते. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांपैकी 17 सूर्या एअरलाइन्सचे कर्मचारी होते, तर उर्वरित 2 क्रू मेंबर्स होते. काठमांडू पोस्टनुसार, अपघातानंतर लगेचच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक बचाव कार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, एका सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, अपघातानंतर…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी पाचव्यांदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्याविरोधात ११ वर्षांपूर्वीच्या एका फसवणूक प्रकरणात पुणे न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट काढले आहे. मनोज जरांगे पाटील, अर्जुन जाधव व दत्ता बहीर यांनी धनंजय घोरपडे यांच्या ‘शंभूराजे’ या नाटकाचे ६ प्रयोग २०१३ मध्ये जालना येथे आयोजित केले होते. प्रत्येक प्रयोगाला ५ लाख याप्रमाणे ३० लाख रुपये घोरपडे यांना देण्याचे आयोजकांनी कबूल केले. परंतु, या प्रयोगांचे पूर्ण पैसे घोरपडे यांना देण्यात आलेले नव्हते. त्यामुळे त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यावरून जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड) यांच्याविरोधात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भरधाव वाहनाच्या धडकेत निलेश दिलीप ताकुळदे (वय २८, रा. कुसुंबा, ता. जळगाव) हे गंभीर जखमी झाले. ही घटना दि. २२ जुलै रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास काशिनाथ चौकात घडली. याप्रकरणी वाहन चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील कुसुंब तरुण वास्तव्यास आहे. दि. २२ जुलै रोजी तो एमएच १९ बीझेड ८११० क्रमांकाच्या वाहनाने जात होता. यावेळी काशिनाथ चौकात मागून येणाऱ्या एमएच ४१ जी ७६५५ वाहनाने त्यास जोरदार धडक दिली. या अपघातात निलेश ताकळदे हा तरुण गंभीर जखमी णाले असून त्यांच्या दुचाकीचे नुकसान देखील झाले आहे. दरम्यान, तरुणाने पोलिसात दिलेल्या तक्रारीवरुन बाहरचालकाविरुद्ध…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील नशिराबाद जवळील एका गावातून पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना दि. २१ जुलै रोजी उघडकीस आली. याप्रकरणी अज्ञाताविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत असे कि, जामनेर तालुक्यातील एका गावातील दाम्पत्य नशिराबाद जवळील एका गावात राहण्यासाठी आले होते. दि. २१ जुलै रोजी सकाळच्या सुमारास त्या दाम्पत्याच्या पंधरा वधींच मुलीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले. ही घटना उघडकीस आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी मुलीचा सर्वत्र शोध घेतला, मात्र ती कुठेही मिळून न आल्याने अखेर त्यांनी नशिराबाद पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल…

Read More