छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे नेहमीच उपोषण करीत राहिले आहे. मनोज जरांगे पाटलांनी आता विधानसभेच्या मैदानात उतरण्याची तयारी केली आहे. आंतरवाली सराटी येथील बेमुदत उपोषण संपवून छत्रपती संभाजीनगर येथील एका रुग्णालयात उपचार घेणाऱ्या जरांगेंनी गुरुवारी मराठा समाजाला आपण दिलेल्या उमेदवारामागे ठामपणे उभे राहण्याचे आवाहन केले. मी दिलेला उमेदवार दगड असला तरी त्याला निवडून द्या. मी त्याच्याकडून बरोबर काम करून घेतो, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. मंत्री तथा बडे ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यावरही निशाणा साधला. त्यांनी भुजबळांचा उल्लेख येवल्याचा गेंडा म्हणून…
Author: editor desk
अकोला : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या अनेक घटना समोर येत असतांना नुकतेच शेगाव येथून अकोल्याकडे निघालेल्या एसटी महामंडळाच्या शिवशाही बसला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या बस मध्ये 44 प्रवासी होते. या आगीत संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहे. महामार्ग क्रमांक सहा वरील तुषार हॉटेल जवळ ही घटना घडली. मात्र, चालकाच्या सतर्कतेमुळे बसमधील प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार एसटी महामंडळाची शिवशाही बस संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या शेगाव येथून अकोल्याकडे रवाना झाली होती. यादरम्यान चालकाला अचानक काहीतरी जळण्याचा वास आला. त्यामुळे चालकाने बस रस्त्याच्या कडेला उभी केली. आणि तातडीने सर्व प्रवाशांना बाहेर काढले. त्यानंतर बसने घेतलेला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार सुरु असतांना मुंबईसह पालघर, ठाणे, रायगड, पुणे सातारा जिल्ह्याला आज दि.२५ जुलै अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिला आहे. रायगड, रत्नागिरी, सातारा जिल्ह्याला उद्याही २६ जुलै रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर पालघर, ठाणे, मुंबई, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूरला उद्या २६ जुलै रोजी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. पुण्यात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. २५ जुलैला ‘इथे’ रेड अलर्ट पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा २६ जुलै रोजी कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट? रायगड, रत्नागिरी, सातारा मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट २५ जुलै- रत्नागिरी, नाशिक, कोल्हापूर,…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या १८ वर्षीय तरूणीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घडली आहे. याप्रकरणी सायंकाळी ६ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात एकावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरूणी ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवारी २४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता पिडीत तरूणी ही घरी एकटी असतांना गावात राहणारा सुरेश रामदास भील याने तिच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केला. ही घटना घडल्यानंतर संशयित आरोपी हा पसार झाला. पिडीत तरूणीने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ६ वाजता संशयित आरोपी…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसाचा हाहाकार आणखी वाढत असतांना पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुळशी तालुक्यातील सुप्रसिद्ध लवासा प्रकल्पात दरड कोसळून 2 व्हिला जमिनीखाली गाडले गेलेत. त्यात 3 ते 4 जण बेपत्ता झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. बेपत्ता नागरिकांचा स्थानिकांच्या मदतीने शोध घेतला जात आहे. पुणे शहर व जिल्ह्याला गुरुवारी मुसळधार पावसाने झोडपले आहे. यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या य़आहेत. मुळशी तालुक्यातील लवासा येथे गुरुवारी 453.5 मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे डोंगररांगातून वाहणाऱ्या पावसाच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे. या पावसामुळे लवासा हिल स्टेशन परिसरात डोंगरावरील दरड कोसळून त्यातील 2 व्हिला अर्थात…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणात आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी व विरोधकामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु असतांना नुकतेच माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते श्याम मानव यांनी केलेले आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळले असून, माझ्या नादी कुणी लागले तर मी सोडत नाही, असा इशाराच फडणवीस यांनी अनिल देशमुखांना बुधवारी दिला. तसेच शाम मानव हे सुपारीबाजांच्या नादी लागलेत का हे तपासावे लागेल, असे प्रत्युत्तर मानव यांना त्यांनी दिले आहे. अजित पवारांनी गुटखा व्यावसायिकांकडून कोट्यवधीची कमाई करून मागितली, उद्धव ठाकरेंनी 300 कोटी रुपयांची वसुली मागितली, आदित्य ठाकरेंनी दिशा सालियनचा बलात्कार करून हत्या केली, अनिल परब यांनी सत्तेचा गैरवापर केला, अशी चार…
जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या शिफारसीवरून राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे पाल ता. रावेर येथे नव्याने सुरु करायच्या प्रस्तावित नवीन कृषी महाविद्यालय आणि कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या तपासणी समितीचा येथे पाहणी दौरा बुधवार, 24 जुलै रोजी झाला. समितीच्या बैठकीत सातपुडा विकास मंडळाचे मा. अध्यक्ष व विद्यमान सदस्य आ.शिरीषदादा चौधरी यांनी आपल्या आदिवासी भागाच्या या कर्मभूमीला कृषी शिक्षणाच्या माध्यमातून अधिक उत्पादनक्षम बनविण्यासाठी यापुढे झोकून काम करणार कार्यरत असल्याचे स्पष्ट केले. रावेर – यावल तालुक्यात कृषी व ग्रामविकास विभागाचे विकासापूरक निरनिराळे उपक्रम राबवणार असतांना आमच्या सातपुडा विकास मंडळाची नियोजित दोन्ही महाविद्यालये राहुरी कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील दोन्ही उत्तम…
जळगाव : प्रतिनिधी मध्यरात्रीच्या सुमारास दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने हाफकिन अजिंठा फार्म- सुटिकल्स कंपनीतून १७ किलो तांब्याचे पाईप चोरणाऱ्या ज्ञानेश्वर रतन सोनार (वय २५) व विनोद गोपाळ मोरे (वय २२) यांना अटक केली होती. ते पाईत विकत घेणाऱ्या शेख सईद रफिक शहा (वय ५३, रा. रजा कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्या तिघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एमआयडीसी परिसरातील हाफकिन अजिंठा फार्मसुटिकल्स लि. कंपनीतून सुमारे १८० फुट लांब १७ किलो वजनाची ६३ हजारांची तांब्याची पाईपलाईन चोरी झाल्याची घटना दि. २० जुलै रोजी उघडकीस आली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही चोरी…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील रायपूर येथे किराणा दुकानाजवळ बोलत उभ्या असलेल्या सचिन दिनेश यादव (२२, रा. रायपूर कुसुंबा, ता. जळगाव) याला जवळ बोलावून त्याच्याशी वाद घालत चॉपरने वार केला. ही घटना २२ जुलै रोजी घडली. मंगळवारी (२३ जुलै) एमआयडीसी पोलिस ठाण्यात रायपूर कुसुंबा येथील दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, सचिन यादव हा रायपूर कुसुंबा येथे कुटुंबासह राहतो. गावातील एक जण त्याच्याकडे दारूसाठी पैशाची मागणी करायचा, मात्र पैसे न दिल्याने धमकी द्यायचा. २२ रोजी, सचिनची आई घरी येत असताना तिला त्या तरुणाने शिवीगाळ केली. त्यानंतर सचिन किराणा दुकानाजवळ एका जणासोबत बोलत असताना सचिनच्या आईला शिवीगाळ करणाऱ्यासह…
जळगाव : प्रतिनिधी कासमवाडी परिसरात दोन झाडे मालवाहू रिक्षावर पडल्याने तिचा चक्काचूर झाला. तसेच घराची भिंत पडण्यासह वीजवाहक तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. ही घटना बुधवारी (२४ जुलै) दुपारी अडीच ते तीन वाजेदरम्यान घडली. सविस्तर वृत्त असे कि, नेरी नाका, कासमवाडी परिसरातील भाजीपाला विक्रेते निशिकांत माळी यांनी त्यांच्या मालकीची मालवाहू रिक्षा (एमएच १९, बीएस १७७८) बुधवारी घरासमोर उभी केली होती. दुपारी पाऊस सुरू झाल्यानंतर घरासमोर असलेली दोन झाडे या रिक्षावर तसेच त्यांच्या शेजारील घराच्या भिंतीवर पडली. यात रिक्षाचा पूर्णपणे चक्काचूर झाला असून, भिंतही पडली. झाडे पडल्याने वीजवाहक ताराही तुटल्या. त्यामुळे या परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेत माळी यांचे नुकसान…

