Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी मित्रांसोबत सोयगाव तालुक्यातील पळाशी येथील धारकुंड गेलेल्या गौरव नेरकर (२१, रा खंडेराव नगर) या तरुणाचा दगडावर साचलेल्या शेवाळावरून पाय घसरुन कुंडात बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. सोमवारी त्याचा मृतदेह सापडला. मिळालेल्या माहितीनुसार, घटना मित्रांना समजताच त्यांनी आरडाओरड केली. काही तरुणांनी पाण्यात उड्या घेतल्या, मात्र गौरव सापडला नाही. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज बारवाल, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. रात्री शोधकार्यात अडचणी येत सोमवारी पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य केले. त्यावेळी गौरवचा मृतदेह सापडला. बनोटी रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. सोमवारी सायंकाळी गौरवचा मृतदेह जळगावात आणण्यात आला व…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील कुरंगी येथे पत्नी व अल्पवयीन मुलाने आपल्या जन्मदात्या पित्यास घरगुती वादातून लोखंडी रॉड व विटेने जबर मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या इसमास ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यामध्ये पत्नी व अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. पत्नी व अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथील मयत हा कौटुंबिक वाद करत असे. २१ जुलै रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास त्याचे पत्नी व अल्पवयीन मुलाशी भांडण झाले. या भांडणात मुलाने पित्याच्या कंबरेवर, पाठीवर व मानेवर…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी साकेगाव शिवारात नवोदय विद्यालयाच्या मागे शेतात सुमारे १२ वर्षांच्या मुलाचा मृत्यूदेह आढळून आला होता. चार दिवस उलटूनही ओळख पटलेली नाही. त्या बालकाचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालानुसार निष्पन्न झाले आहे. मात्र खून का करण्यात आला अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, साकेगाव शिवारातील नवोदय विद्यालयामागील शेतात मुलाचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. मृत्यूदेहाच्या शेजारीच गुलाबी व काळ्या रंगाच्या पानाची डिझाईन असलेला शर्ट तसेच निळ्या रंगाची पॅन्ट आढळून आली आहे. याप्रकरणी तालका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र शवविच्छेदनानंतर या मुलाचा गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हवालदार संजय भोई यांच्या…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी अवैध वाळू वाहतूक प्रकरणी जप्त केलेला डंपर लंपास केल्याची घटना १९ रोजी घडली. तहसील कार्यालयाच्या आवारातून हा डंपर पळविण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या सर्वत्र सुरू असलेल्या अवैध गौण खनिज व वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी तहसीलदारांनी पथके तयार केली आहेत. तहसील कार्यालयाच्या वतीने १२ जुलै रोजी नाहाटा कॉलेज भुसावळजवळ डंपर (क्र. एमएच १९ झेड ५३०१) हा अवैध वाळू वाहतूक करताना पकडला होता. या पथकात मंडल अधिकारी रजनी तायडे, मंडल अधिकारी एस. एफ. खान, मंडल अधिकारी प्रफुल्ल कांबळे, कोतवाल शरद पवार, वाहनचालक विलास नारखेडे हे होते. मात्र हा डंपर दि.१९ जुलै रोजी तहसील कार्यालयाच्या आवारातून चोरी…

Read More

पुणे : वृत्तसंस्था अनैतिक संबंधातून गरोदर राहिलेल्या विवाहितेचा गर्भपातादरम्यान मृत्यू झाल्यानंतर मृतदेह नदीत फेकून देण्यात आला. त्यानंतर आरडाओरडा करणाऱ्या तिच्या दोन लहान मुलांनाही नदीत जिवंत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मावळ तालुक्यातील या हत्याकांडाने परिसरात खळबळ उडाली आहे. समरीन निसार नेवरेकर (२५, रा. समता कॉलनी, वराळे, ता. मावळ), इशान (५), इजान (२) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी गजेंद्र दगडखैर (३७, मावळ), रविकांत गायकवाड (४१,अहमदनगर), मदत करणारी एजंट महिला, कळंबोली (नवी मुंबई) येथील अमर हॉस्पिटलमधील संबंधित डॉक्टर व मदत करणाऱ्या सर्वांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. समरीन ही बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांत आली होती. पोलिसांना तिचे घराजवळ राहणाऱ्या गजेंद्र याच्याशी…

Read More

मेष राशी मेष राशीच्या लोकांनी आज जपून व्यवहार करावा. मन अशांत राहील. मानसिक आरोग्य टिकवून ठेवा. अध्यात्मामध्ये रस घेतल्यास मनाला शांती मिळेल. कला आणि संगीत क्षेत्राशी निगडीत असणाऱ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस शुभ जाईल. तर उद्योग व्यवसाय करणाऱ्यांना आज अचानक धनलाभ होईल. दूरच्या प्रवासाचा योग आहे. वाहन जपून चालवा. रिलेशनशीपमध्ये वाद दूर होतील. वृषभ राशी आजचा दिवस चढउताराचा असेल. दूरच्या नातेवाईकांकडून चांगली बातमी मिळेल. संध्याकाळी मित्रांबरोबर फिरायला जाण्याचा प्लान कराल. आईच्या आरोग्याची काळजी घ्या. धावपळ करावी लागणार आहे. भावांचं सहकार्य मिळेल. तणावापासून दूर राहा. लव लाईफमधील अडचणी सबुरीने सोडवा. आर्थिक प्रकरणात सावधानता बाळगा. मोठी रक्कम कुणालाही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील नेरी नाका परिसरात एक संशयित आरोपीला गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे. गणेश हिमंत कोळी रा. मोहाडी असे आरोपीचे नाव असून त्याच्या साथीदारालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज दि. २१/०७/२०२४ रोजी एका व्यक्तीचा गावठी कट्ट्यासह फोटो प्राप्त झाला, त्यानुसार कारवाई करत पोलिस पथकाने नेरी नाका परिसरात जात तपास सुरु केला, यावेळी त्यांना एक संदिग्ध व्यक्ती निदर्शनास आली, दरम्यान पो.उ.नि चंद्रकांत धनके यांच्या मोबाईल मधील फोटो आणि सदर व्यक्ती एकच असल्याने त्यास तत्काळ पोलिसांनी विचारपूस सुरु केली. त्याचे नाव पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव गणेश हिमंत कोळी वय २३ वर्षे रा. मोहाडी, उमेश पार्क…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चोरीच्या आठ दुचाकींसह चोरट्याला गिरड गावातून भडगाव पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या आठ दुचाकी हस्तगत करण्यात आले आहे. याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. अमोल शांताराम पाटील रा. गिरड ता. भडगाव असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील गिरड येथील पंडीत झिपरू बोरसे वय ४७ यांची दुचाकी क्रमांक एमएच १९ डीक्यू ५९१५ ही दुचाकी १३ जानेवारी २०२३ रोजी चोरी झाली होती. याप्रकरणी भडगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना ही दुचाकी त्याच गावातील संशयित आरोपी अमोल पाटील याने चोरी केल्याचे निष्पन्न झाले त्यानुसार पोलीसांनी त्याला १८…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था पुण्यातील भाजपच्या अधिवेशनात गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे प्रमुख बनले आहेत असे अमित शहा म्हणाले होते. त्यांच्या याच टीकेला सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्या प्रसार माध्यमांशी बोलत होत्या. तडीपार लोकांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हेच सर्वांत मोठे आव्हान आहे. अमित शाह यांनी भाषणावेळी ज्या भाषेचा वापर केला, ते दुर्दैवी आहे, अशी टीका ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. सुषमा अंधारे यांनी म्हटले की, आम्हाला अमित शहा यांच्यावर बोलायचे नाही. तडीपार लोकांनी महाराष्ट्रात येऊन आम्हाला शहाणपणा सांगण्याची…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री आज आपला वाढदिवस वेगवेगळ्या ठिकाणी साजरा करीत आहे तर उपमुख्यमंत्री अजित पवार आज अहमदनगर म्हणजेच आताच्या आहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर येथे ‘लाडक्या बहिणींसोबत संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. लाडकी बहिण योजनेच्या अर्ज भरताना कोणीही पैशाची मागणी केली तर त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा, कोणाचीही गय केली जाणार नाही. लाडकी बहिणी योजनेच्या अर्ज भरण्यासाठी प्रत्येक अर्जामागे सदरील माणसाला पन्नास रुपये अनुदान राज्य सरकार देत आहे. त्यामुळे महिलांकडून पैसे मागण्याची आवश्यकता नसल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. या आधी देखील ज्यांनी ज्यांनी महिलांना पैसे मागण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.…

Read More