जळगाव : प्रतिनिधी
अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे जखमी झालेले खलील शेख अय्युब मणियार (वय ४५, रा. वराडसीम, ता. भुसावळ) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. ही घटना दि. ८ जुलै सोमवारी गोदावरी महाविद्यालयासमोर घडली. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.
सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ तालुक्यातील वराडसीम खलील शेख अय्युब मणियार हे दि. ८ जुलै रोजी सोमवारी भुसावळकडे जात होते. यावेळी त्यांना समोरुन येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याने त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात केले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.