Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जिल्ह्यातून एक वर्षासाठी पिता-पूत्र हद्दपार
    क्राईम

    जिल्ह्यातून एक वर्षासाठी पिता-पूत्र हद्दपार

    editor deskBy editor deskJuly 10, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    महाराष्ट्रात प्रतिबंधित गुटखा तस्करी आणि विक्रीप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या रमेश जेठानंद तेजवाणी (५८) व दीपक रमेश तेजवाणी (२४ दोघे रा. सिंधी कॉलनी) या दोघा पिता-पूत्राला जळगाव जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी हे आदेश दिले आहे.

    सविस्तर वृत्त असे कि, सिंधी कॉलनी परिसरातील रहिवासी रमेश तेजवाणी व दीपक तेजवाणी हे अनेक वर्षापासून गुटख्याच्या व्यवसायात सक्रिय होते. रमेश तेजवाणी विरुद्ध चार तर मुलगा दीपक तेजवाणी याच्याविरुद्ध सात गुन्हे दाखल आहे. त्यामुळे त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, पोउनि दत्तात्रय पोटे, सहायक फौजदार अतुल वंजारी, युनूस शेख, सचिन पाटल, योगेश बारी, साईनाथ मुंडे, छगन तायडे, किरण पाटील यांनी सादर केला होता त्यानुसार मंगळवारी पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दोघांना हद्दपार करण्याचे आदेश दिले. पिता-पुत्राला ताब्यात घेत त्यांना बऱ्हाणपूर येथे सोडण्यात आले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावातील घरफोड्यांचा भंडाफोड; मध्यप्रदेशातील टोळी उघड

    December 13, 2025

    महिला बचत गटांसाठी ऐतिहासिक विजय : उमेद अभियान अधिकारी कर्मचारी यांच्या आंदोलनाला यश !

    December 13, 2025

    बेपत्ता तरुणीचा विहिरीत मृतदेह; गांधली गावात शोककळा

    December 13, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.