Author: editor desk

मेष राशी दिवसाच्या पूर्वार्धात स्थिती सकारात्मक राहील. दिवसाच्या उत्तरार्धात परिस्थिती समाधानकारक राहण्याची शक्यता कमी असेल. संयम ठेवा. अनावश्यक वादात पडू नका. अति लोभाची परिस्थिती टाळा. चांगल्या मित्रांसोबत अधिक सकारात्मक वागणूक उपयुक्त ठरेल. कार्यक्षेत्रात कामे होतील. अभ्यासाच्या दृष्टीकोनातून विद्यार्थ्यांसाठी दिवस शुभ राहील. शत्रूपासून सावध रहा, तो तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करू शकतो. धार्मिक कार्य, पूजा इत्यादीमध्ये रुची वाढेल. वृषभ राशी महत्त्वाच्या कामात हुशारीने निर्णय घ्या. घाईघाईने कोणतेही मोठे निर्णय घेऊ नका, विशेषत: कार्यक्षेत्राबाबत. लांबचा प्रवास करताना काळजी घ्या. कोणावरही घाईघाईने विश्वास ठेवू नका. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवा. कुटुंबात भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. छोट्या प्रवासाचे योग येतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस अडचणींचा असेल.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी आघाडी व महायुतीमधील नेत्यांमध्ये वाक्ययुद्ध सुरु झाले असून भाजपचे माजी खा.रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावर हल्लाबोल केला आहे. भाजप नेते माजी खासदार रावसाहेब दानवे म्हणाले कि, युतीच्या काळामध्ये जागा वाटपाचा निर्णय, निवडणुकीची रणनीती आतापर्यंत ‘मातोश्री’वर ठरवली जात होती. मात्र आता मातोश्रीच्या बाहेर निघून राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या दारात जाऊन उभे राहण्याची पाळी या राज्यातील जनतेने तुमच्यावर आणली आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे. मातोश्रीवरच्या बैठका आता मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी होऊ लागल्या असल्याची टीका रावसाहेब दानवे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. उद्धव ठाकरे सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील धामणगाव येथे एका २२ वर्षीय तरुणाने राहत्या घरी छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. पियुष रमेश गोसावी (वय २२, रा.धामणगाव ता. जळगाव) असे मयत तरुणाचे नाव असून तो गावामध्ये आई, आजी, आजोबा यांच्यासह राहत होता. त्याच्या वडिलांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. पियुष गोसावी हा शेती काम करून उदरनिर्वाह करीत होता. मयत तरुण हा पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुरेश गोसावी यांचा पुतण्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजेनंतर तो घरी आला, त्यावेळेला त्याची आजी ओट्यावर बसलेली होती. पियुषने…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीच्यापूर्वीच राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर लाडक्या भावाला काहीच मिळाले नसल्याची टीका विरोधकांनी केली होती. मात्र, विरोधकांच्या या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही लाडक्या भावांसाठी देखील योजना सुरू केली असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आता शेतीचे वीज बिल भरावे लागणार नाही, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. राज्य सरकारच्या सौरपंप योजनेमुळे शेतकऱ्यांना वीजेवर अवलंबून राहावे लागणार नसल्याचे ते म्हणाले. सौर ऊर्जेच्या माध्यमातून एकही पैसा न भरता सौर पंपाचा वापर करून आता शेतीला पाणी देणे शक्य होणार आहे, असे देखील अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या मागील वर्षी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अजित पवारांनी फुट पाडून महायुतीमध्ये सामील झाल्यावर त्यानंतर सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पद भेटले होते. त्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेचा तापले होते मात्र नुकतेच अजित दादांनी मोठे वक्तव्य केल्याने राज्यातील राजकारण पुन्हा तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्वांना मी विधानसभेत वरिष्ठ आहे. पण मी नव्वदच्या बॅचचा आहे. पण ते सगळे पुढे गेले, मी मागेच राहिलो, तुम्ही एकनाथ शिंदेंना सांगितले इतके आमदार आणलात तर मुख्यमंत्री करतो, मला जर सांगितले असते तर सगळी पार्टी घेऊन आलो असतो, शेवटी नशिबात असते तेच होते, असा मिश्कील टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज ठाण्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एरंडोल येथील माळी समाजाचा युवा कार्यकर्ता हा तन-मन-धनाने बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिवसेनेचे काम करत होता. सन 2009 मध्ये अहोरात्र मेहनत घेऊन याच गद्दार व खोके वाल्यांना आमदार करण्यास सिंहाचा वाटा राहिला. 2014 मध्ये देखील प्रचंड मेहनत घेतली त्यानंतर या माळी समाजाच्या युवा नेत्याकडे वाळूच्या व्यवसायातून दोन पैसे आले आणि त्यांची विधानसभेची इच्छा जागृत झाली. एरंडोल शहरात असे मोठे प्रकरण घडले आणि याच गद्दाराने व खोक्यावाल्यांनी षड्यंत्र रचले आणि गंभीर गुन्ह्यात या युवा नेत्याला अटकवले सुमारे तीन वर्षे जेलवारी करावी लागली समाजाच्या मनात प्रचंड चीड असून माळी समाजाच्या या युवा नेत्याला षड्यंत्र रचून आटकवल्यानंतर समाज…

Read More

जळगाव : प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील झुरखेडा येथे शेतात काम करणाऱ्या गेंदरसिंग वारसिंग पावरा (वय ४१ रा. खरगोन जि. बडवाणी मध्यप्रदेश ह. मु. झुरखेडा ता. धरणगाव) या शेतमजूराला सर्पदंश झाला होता. त्याच्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु असतांना त्याचा मृत्यू झाला. ही घस्टना बुधवार दि. ७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील झुरखेडा गावात गेंदरसिंग पावरा हा तरूण आपल्या कुटुंबासह गेल्या वर्षभरापासून वास्तव्याला होता. शेतीचे काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. गेंदरसिंग याला सर्पदंश झाल्याने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचारा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एकनाथनगर भागात वास्तव्याला असलेल्या एका महाविद्यालयीन तरुणीने बुधवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास रस्त्यालगत दुचाकी लावून धावत्या रेल्वेखाली झोकून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जळगाव तालुक्यातील म्हसावद रेल्वे ट्रॅकलगत ही घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुपारी १ वाजता ही घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार, प्रियंका अरुण गोसावी (वय २४, रा. एकनाथनगर, मेहरूण परिसर जळगाव) असे मयत तरुणीचे नाव आहे. ती मेहरूणमध्ये परिवारासह राहत होती. प्रियंका जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूट महाविद्यालयात एमसीएचे शिक्षण घेत होती. दरम्यान, बुधवारी सकाळी महाविद्यालयात जात असल्याचे कारण देत, घराबाहेर निघाली असल्याची माहिती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रस्त्यावर शतपावली करत असलेल्या एका महिलेच्या गळ्यातून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी १ लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना सोमवारी रात्री १०:३० वाजता घडली आहे. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, उषा शशिकांत हिंगोणेकर (वय ५७ रा. निर्मला रेसिडेन्सी, गुड्डूराजा नगर) ही महिला आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. सोमवारी रात्री जेवण झाल्यानंतर त्या आपल्या घराच्या आवारात रात्री १०:३० वाजता शतपावली करीत असताना त्यांच्या मागून एक इसम चालत आला. त्याने त्यांच्या गळ्यातून सोन्याची पोत ओढून घेतली. लागलीच पुढे दुचाकीवर उभ्या असलेल्या एका दुचाकीवरून दोन्ही चोरटे पसार झाले. ही घटना…

Read More

मेष राशी कामाच्या ठिकाणी बोलण्यावर नियंत्रण ठेवा. अन्यथा वादविवाद होऊ शकतात. वडिलोपार्जित संपत्तीबाबत कुटुंबातील वादाचे मोठ्या भांडणात, मारामारीत रुपांतर होऊ शकतं. आपल्या बुद्धीचा वापर करून कौटुंबिक वाद शांत करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत तुम्हाला नवीन जबाबदाऱ्या मिळण्याचे संकेत आहेत. व्यवसायात वेळेवर काम करा. नक्कीच यश मिळेल. राजकारणातील तुमची प्रभावी भाषणशैली जनतेच्या मनावर चांगली छाप सोडेल. रोजगाराच्या शोधात भटकणाऱ्या लोकांना रोजगार मिळेल. वृषभ राशी विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडथळे दूर होतील. व्यावसायिक मित्राकडून सहकार्य आणि साहचर्य मिळेल. छपाईच्या कामात गुंतलेल्या लोकांना महत्त्वपूर्ण यश आणि सन्मान मिळेल. गायन क्षेत्रात सक्रियता वाढेल. कोणतेही अपूर्ण काम पूर्ण केल्याने धैर्य आणि उत्साह वाढेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना…

Read More