चाळीसगाव : प्रतिनिधी
बसस्थानक परिसरात गावठी पिस्तूल बाळगणाऱ्या एकास अटक करण्यात आली. पोलिसांनी गुरुवारी रात्री ही कारवाई केली. गणेश तुकाराम पवार (वय २५, रा. बोरमाळी, पो.नागद, ता. कन्न्ड, जि संभाजीनगर, ह.मु, चाकण, ता. खेड, जि. पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
सविस्तर वृत्त असे कि, पोलिस बसस्थानक परिसरात गस्त घालत होते. त्याचवेळी एकजण बसस्थानकाच्या नियंत्रण कक्षासमोर संशयितरीत्या बसलेला दिसला. त्याची विचारपूस केली असता त्याने नागद (ता. कन्नड) येथे जात असल्याचे सांगितले. अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला गावठी बनावटीचे पिस्तूल व २ जिवंत काडतुसे, मॅगझिन, दोन मोबाईल असा एकूण ५१ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल आढळून आला आहे. पोकॉ. समाधान पाटील यांच्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक माळी करीत आहेत