जळगाव : प्रतिनिधी वधू वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून योग्य स्थळ शोधण्यात मदत होते. योग्य स्थळासाठी बाहेर फिरण्यासाठी लागणारा पैसा, वेळ, श्रम कमी होतात असे प्रतिपादन शहराचे आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केले. “लेवा शुभमंगल” तर्फे आयोजित सकल लेवा पाटीदार समाज आयोजीत वधू वर परिचय मेळावा आज रविवारी दि. ६ ऑक्टोबर रोजी एका हॉटेलमध्ये पार पडला. यावेळी समाजाचे कुटुंबनायक ललित पटिल, उद्योजक अरुण बोरोले, डॉ. प्रमोद महाजन, डॉ. अमित भंगाळे, डी. के. देशमुख, व्ही. एच. पाटील व सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी लेवा शुभमंगल डिरेक्टरीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर विवाहेच्छुक वधू वरानी त्यांचा परिचय करून दिला. यावेळी आ. राजूमामा…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातील जुने जळगाव परिसरातील कालिकामाता मंदिरामध्ये नवमीच्या पवित्र दिवशी शहराचे आमदार राजूमामा भोळे व माजी महापौर सीमा भोळे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. या वेळेला देवी मातेचे आमदार भोळे दांपत्याने दर्शन घेतले. शहरात नवरात्रोत्सवानिमित्त सर्वत्र चैतन्याचे वातावरण आहे. सर्व देवीदेवतांचे मंदिरामध्ये भाविकांची गर्दी आशीर्वाद घेण्यासाठी ओसंडून वाहत आहे. नवरात्रोत्सवाच्या सुरुवातीला आमदार राजूमामा भोळे मित्र परिवारातर्फे मंदिरांची स्वच्छता करण्यात आली होती. शनिवारी नवमीच्या पवित्र दिवशी जुने जळगाव येथे आमदार राजूमामा भोळे तसेच माजी महापौर सीमा भोळे यांनी उपस्थिती दिली. या वेळेला देवी मातेचे दर्शन घेऊन त्यांनी होम हवन केले. तसेच महाआरती करून मंदिरातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळेला मंदिरातील…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गणेशवाडी परिसरातील रणछोड नगरामध्ये व्यापाऱ्याच्या पत्नीचा डोक्यात हातोड्याने वार करून निघृण खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी दि. १० ऑक्टोबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास उघड झाली होती. दरम्यान, उसनवारी दिलेले पैसे संशयित आरोपींकडे मयत महिलेने वारंवार मागून तगादा लावला म्हणून एका महिलेसह तिघांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. एमआयडीसी पोलिस स्टेशन आणि एलसीबीचे पथक यांनी २० तासात याचा उलगडा करून तिघांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुवर्णा राजेश नवाल (वय ५७, रा. रणछोड नगर, गणेश वाडी जळगाव) असे मयत महिलेचे नाव आहे. त्यांचे पती राजेश नवाल हे दाणा बाजार परिसरामध्ये धान्याचे व्यापारी आहेत. दरम्यान गुरुवारी…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पातोंडा येथे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक राजेंद्र रामदास लोहारे (६१) यांनी सावखेडा येथे तापी नदीच्या पुलावरून उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यांचे भाऊ प्रदीप लोहारे यांना ही माहिती कळताच त्यांनी नदीकाठी शोध सुरू केला. शुक्रवारी सकाळी मुंगसे-दापोरी येथे नदीच्या काठावर त्यांचा मृतदेह आढळून आला. आजारपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर येत आहे. या घटनेची अमळनेर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. त्यांच्या पार्थिवावर पातोंडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, भाऊ, बहीण, असा परिवार आहे. ते शिक्षक प्रदीप लोहारे यांचे मोठे बंधू, तर अमळनेर येथील एलआयसी ऑफिसर मयूर लोहारे यांचे वडील होत.
जळगाव : प्रतिनिधी गॅसवर खाद्य पदार्थ गरम करीत असताना गॅस रेग्युलेटर लिकेज होऊन आग लागल्याने अनंत भिमराव ठाकूर (रा. विठ्ठलवाडी, खोटे नगर) यांच्या घरातील साहित्य जळून खाक झाले. सुदैवाने वेळीच आग नियंत्रणात आल्याने सिलिंडर फुटले नाही की इतर कोणाला दुखापत झाली नाही. मात्र दसरा एक दिवसावर आलेला असताना किराणा साहित्यासह इतरही वस्तू जळून खाक झाल्या. शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास खाद्य पदार्थ गरम करण्यासाठी ठाकूर यांच्या घरातील मंडळींनी गॅस सुरू केला. त्या वेळी रेग्युलेटर लिकेज झाले व पेट घेतला. यामुळे सर्व जण भयभीत झाले. त्या वेळी ठाकूर यांच्या वडिलांनी चादर ओली करून ती रेग्युलेटरवर टाकली. या विषयी अग्नीशमन दलाला माहिती…
मेष राशी आज तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना आखू शकता. कोणत्याही प्रकारचे पेपर वर्क करताना जास्त काळजी घ्या. तुमची एक छोटीशी चूक मोठी समस्या निर्माण करू शकते. पैशाशी संबंधित बाबी सध्या थोड्या मागे पडू शकतात. पती-पत्नीचे नाते आनंदी राहील. जास्त काम केल्याने आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. वृषभ राशी आज तुम्ही एखाद्या मित्रासोबत काहीतरी नवीन करण्याचा विचार करू शकता. परदेशी भाषा शिकण्यासाठी तुम्ही कोर्समध्येही सहभागी होऊ शकता. अचानक सर्व प्रलंबित कामे पूर्ण होण्यास कुठूनतरी आर्थिक लाभ होण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला अचानक आंतरिक शांतीचा अनुभव येऊ शकतो. नातेवाईक आणि शेजारी यांच्याशी संबंध अधिक सुधारतील. जवळच्या नातेवाईकाच्या वैवाहिक संबंधांमध्ये वाद वाढू…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील लाडशाखीय वाणी या जाती समुदायातील नागरिकांचे चाळीसगाव मतदारसंघात नुकतेच राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न झाले आहे. सदर अधिवेशनात शासनाकडे त्यांनी विविध मागण्यांचे केलेल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे बाबत मागणी करण्यात आली होती. याबाबत आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी तातडीने पावले उचलत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिष्टमंडळासोबत भेट घेऊन निवेदन सादर केले होते. त्यावर मुख्यमंत्री यांनी तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश राज्याच्या बहुजन कल्याण विभागास दिले होते त्यानुसार आज दि.१० ऑक्टोबर रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत सोळा कुलस्वामिनी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासनाने मान्यता दिली आहे. राज्यात लाडशाखीय वाणी समाजाची संख्या…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील तळागळातील घटकांपर्यंत विकास कामांना पोहचविण्याचे ध्येय घेऊन सुरू असलेल्या आमदार मंगेश चव्हाण यांच्या विकास कामाच्या संकल्पाला यश मिळाले असून चाळीसगाव तालुक्यातील 32 तांड्यांना 4 कोटी 40 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार मंगेश चव्हाण यांच्या कर्तुत्वाने तालुक्यात कोट्यावधींची विकास कामे सुरू आहे. तळागळातील घटकांपर्यंत विकास कामे पोहचावी यासाठी महायुतीचे सरकार देखील तात्काळ निर्णय घेत आहेत. दि 9 ऑक्टोंबर रोजी संत सेवालाल महाराज बंजारा / लमाण तांडा समृध्दी योजनेतर्गत चाळीसगाव तालुक्यातील 32 तांड्यांना 4 कोटी 40 लक्ष निधी मंजूर झाला आहे. यामुळे शहर असो व मोठी गावे असो यात सुरू असलेली विकासकामे आता तांडे गाठत तांड्यांमध्ये…
धरणगाव : प्रतिनिधी शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासंदर्भात निवेदन देण्यासाठी आज सकल मराठा आणि बौद्ध समाज बांधवांसह शहरातील माळी, चौधरी, मुस्लीम, मातंग, धनगर, बडगुजर, पारधी, ब्राम्हण, धोबी, चर्मकार आणि इतर समाजातील बांधवही मोठ्या संख्येने धरणगाव पालिकेवर धडकले. निवेदन देतांना विचारलेल्या प्रश्नांवर पालिका अभियंता आणि शिल्पकाराची चांगलीच थ..थ..फ..फ उडाली. पुतळा उभारणी संदर्भात मार्गदर्शक सूचनांचे पालन व्हावे ! निवेदनात म्हटले होते की, धरणगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या पुतळा उभारण्याचे कार्य सुरू आहे, महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वी मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा कोसळला ही दुर्दैवी घटना घडली, सदर घटनेचे देशात सर्व ठिकाणी तीव्र निदर्शने करीत…
अमरावती : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवारांना मोठा झटका बसला असून त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील अनेक नाराज पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिले आहेत. अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांनी राजीनामा दिल्यानंतर इतरही पदाधिकाऱ्यांनी बंडखोरी केल्याचे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे अमरावती जिल्हाध्यक्ष प्रदीप राऊत यांच्याकडे अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाची मोठी जबाबदारी होती. दोन्ही ठिकाणी महाविकास आघाडीचे खासदार निवडून आले. मात्र, विधानसभा निवडणुकीपूर्वी त्यांना जिल्हाध्यक्षपदावरून हटवून प्रदेश संघटन सचिवपदाची नवी जबाबदारी देण्यात आली. त्यांना विश्वासात न घेता जिल्हाध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याने प्रदीप राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे. प्रदीप राऊत यांनी या संदर्भात आरोप…

