जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात दोन सख्ख्या बहिणीवर अत्याचार झाल्या प्रकरणी बाल लैंगिक अत्याचार अधिनियम कायद्यानुसार संशयित आरोपी विनोद बारेला याच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याला गजाआड करण्यात आले आहे. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार 11 आणि 13 वर्षीय अल्पवयीन सख्ख्या बहिणींवर 10 सप्टेंबर ते 11 सप्टेंबरच्या दरम्यान संशयिताने 2 वेळा अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्हा हादरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगावमध्ये मध्य प्रदेशातील कुटुंब वास्तव्याला आहे. या कुटुंबात 11 वर्षीय व 13 वर्षीय या दोन सख्ख्या बहिणी वास्तव्याला आहे. या परिसरात राहणारा संशयित आरोपी विनोद बारेला हा देखील राहतो. 10 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर च्या दरम्यान या…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील विक्रोळी नजीक गोदरेज कंपनीच्या परिसरात आज रविवार दि १५ रोजी सकाळच्या वेळेत कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये सहाजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातग्रस्त इनोव्हा गाडी भरधाव वेगात असल्यामुळे हा अपघात झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. प्रचंड वेगात असलेल्या या इनोव्हा गाडीच्या चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार काही अंतरापर्यंत फरफटत जाऊन सर्व्हिस रोडलगतच्या दुभाजकावर आदळली. ही गाडी दुभाजकाला धडकल्यानंतर तेथील स्ट्रीट लाईटचा खांबही खाली कोसळला. या अपघातानंतर जखमींना गाडीतून बाहेर काढून जवळच्या…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील मेहरुण परिसरातील एका भागात राहणाऱ्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला कोणीतरी अज्ञात व्यक्तीने दि. .१० सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास कशाचे तरी अमिष दाखवून पळवून नेले. ही घटना त्याच्या कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी सर्वत्र मुलाचा शोध घेतला. मात्र तरी देखील मिळून न आल्याने अखेर त्यांनी एमआयडीसी पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हे करीत आहे.
धरणगाव : प्रतिनिधी मंदिरात दर्शन घेण्याच्या बहाण्याने दिव्यांग पतीला शेतात नेऊन विहिरीत ढकलून देत खून केल्याची घटना घडली होती. यातील संशयित ज्योती प्रकाश सुर्यवंशी यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर कामकाज झाल्यानंतर न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतील मंदिरात दर्शनासाठी घेवून गेलेल्या प्रकाश यादव सुर्यवंशी (वय ३६, रा. भवरखेडा, ता. धरणगाव) या दिव्यांग पतीला त्यांची पत्नी ज्योती प्रकाश सुर्यवंशी यांनी दि. २ रोजी विहरीत ढकलून देत खून केला होता. याप्रकरणी धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित ज्योती सुर्यवंशी यांना अटक करण्यात आली होती. जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावल्याने संशयिताच्या वतीने अॅड.…
जळगाव : प्रतिनिधी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात जात असतांना शासकीय आशादीप महिला वस्तीगृहाच्या अधीक्षिका मयूरी देवेंद्र राऊत-कपरे (वय ३२, रा. श्रीरामनगर, दादावाडी) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या पतीला मानसिक धक्का बसल्याने जिल्हा परिषदेतील महिला व बालविकास विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत यांनी सहा मजली इमारतीवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतू त्याठीकाणी काम करणाऱ्या मजूरांच्या लक्षात हा प्रकार आल्याने त्यांनी राऊत यांना वाचवले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात सुरु आहे. ही दुर्देवी घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषदेतील महिला व बालविकास विभागातील जिल्हा कार्यक्रम अधिकारी देवेंद्र राऊत व त्यांची पत्नी आशादीपक महिला वस्तीगृहाच्या अधीक्षिका मयूर राऊत हे…
चोपडा : प्रतिनिधी शहरातील नगरपालिकेच्या मागे असणाऱ्या झोपडपट्टी भागात दि.१४ रोजी शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे छापा टाकून गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. याबाबत सविस्तर असे की, गुप्त माहितीच्या आधारे शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर सावळे यांनी दि.१४ रोजी दुपारी ३:४५ वाजेच्या सुमारास नगरपालिकेच्या मागील बाजूस असणाऱ्या झोपडपट्टी भागात सापळा लावला. त्यात जयेश प्रदीप सपकाळ (वय २६, रा दोंडकेवाडा निंभोरा, ता. रावेर) याच्य ताब्यातून एक गावठी बनावटीची पिस्तूल (कट्टा), एक जिवंत काडतूस मिळून आली. सोबत दुचाकी वाहन असा एकूण १ लाख १ हजार रुपयांच मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे त्याच्या विरुद्ध शहर…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील अडावद येथील मन्यार वाड्यात वनविभागाने शनिवारी (दि. १४) दुपारी छापा टाकला असता सागवानाचे अंदाजे एक हजार अनघड कच्चे बेलन तर अकराशे तयार बेलन आणि खराद मशीन असा सुमारे ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामुळे अवैध लाकडाचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दि. १२ रोजी अडावद-उनपदेव रस्त्यावरून सायकलींवर सागवान कच्चे बेलनची वाहतूक करतांना साग्यादेव परिसरातील रूपा पावरा व महेश पावरा या दोघांना वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे यांनी अटक केली होती. त्यांना न्यायालयात हजर केले असता, दोघांना एक दिवसाची वन कोठडी मिळाली होती. वनाधिकाऱ्यांनी संशयितांकडून कुणाकुणाला सागवानचा अवैध कच्चा माल पुरविला गेला याची विचारपूस केली असता,…
भुसावळ : प्रतिनिधी पोलिसांनी गुप्त माहितीवरून वरणगाव रस्त्यावरील एमआयडीसी परिसरातील संकुलाजवळ सापळा रचून एकाला गावठी पिस्तूल व काडतुसांसह ताब्यात घेतले. ही घटना शनिवारी सायंकाळी ६ वाजता घडली. पोलिस निरीक्षक राहुल वाघ यांना गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार, रेकॉर्डवरील गुन्हेगार हरीश राहुल उजलेकर (रा. वरणगाव, ता. भुसावळ) हा एमआयडीसी परिसरातील सद्गुरू इंजिस्टिटजवळील बांधकाम चालू असलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्सजवळ येणार आहे. यारून पोलिस उपनिरीक्षक मंगेश जाधव, पोहेका. विजय नेरकर, नीलेश बाबूलाल चौधरी, पोहेकॉ. महेश चौधरी, राहुल वानखेडे, भूषण चौधरी, प्रशांत परदेशी, जावेद शहा यांनी सापळा रचून त्याची झडती घेतली असता १५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल, दोन हजार रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे मिळून…
जळगाव : प्रतिनिधी व्हीआयपी केटरर्सची ऑर्डर घेण्यासाठी नाशिक येथून आलेल्या एक तरुणीला दुचाकीवरुन घेवून जात असताना गैरसमज होऊन मोहीत राजेश चव्हाण (२७, रा. सम्राट कॉलनी) या तरुणाला १० ते १५ जणांच्या टोळक्याने मारहाण केली. त्याच्यावर चॉपरसारख्या धारदार शस्त्राने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना शनिवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शेरा चौकात घडली. तरुणावर जीएमसीत उपचार सुरू असून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, सम्राट कॉलनीत मोहित चव्हाण याचा इव्हेंट मॅनेजमेंटचा व्यवसाय आहे. शहरातील एका हॉटेलमध्ये कार्यक्रम असल्याने त्याठिकाणी व्हीआयपी केटरर्सची आवश्यकता होती. त्यामुळे मोहीतने नाशिक येथील एका एजन्शीशी संपर्क साधून केटरर्स पुरविण्यास सांगितले होते. त्याचे…
मेष राशी आज तुम्हाला पूर्वीपेक्षा निरोगी वाटाल. आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन आनंद घेऊन येवो. बाहेरच्या गोष्टी टाळा. तुम्हाला वैवाहिक जीवनात आनंद मिळेल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत प्रवासाची योजना करू शकता. देशवासीयांच्या कामावर आणि व्यवसायावर लक्ष्मी देवीची कृपा असेल. तुम्हाला एकाच वेळी अनेक जॉब ऑफर मिळतील. जुन्या मित्राच्या भेटीने आनंद होईल. वृषभ राशी काही कामे पूर्ण होतील, परंतु नको असलेल्या समस्या तुमच्यासाठी अडचणीचे ठरतील. तुम्ही खूप व्यस्त असाल. सामाजिक कार्यात तुम्हाला रस राहील. आज तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळ मिळू शकते. व्यवसायात उधार देणे टाळा आणि आत्मविश्वास ठेवा. तुम्हाला चांगल्या आरोग्याचा लाभ मिळेल. किरकोळ दुखापतींमुळे त्रास होईल. मिथुन राशी आजचा दिवस संमिश्र…

