Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे चिरंजीव निलेश राणे यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत निलेश राणेंनी पक्षात प्रवेश केला आहे. शिवसेनेकडून उमेदवारीही मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, निलेश राणे यांच्या शिवसेनेतील प्रवेशामुळे राणे कुटुंबात भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्ष सामावले आहे. कुडाळमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य असा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते शिवसेनेचा भगवा ध्वज आणि धनुष्यबाण हाती घेऊन निलेश राणेंनी पक्षात प्रवेश केला. यावेळी व्यासपीठावर नारायण राणे आणि नितेश राणे सुद्धा उपस्थितीत होते. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीचा जोर वाढला असून दुसरीकडे मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. इच्छुकांशी चर्चा करुनच उमेदवार निश्चित करणार असल्याचे जरांगे यांनी आधीच सांगितले आहे. त्यामुळे त्यासाठी अनेक इच्छुक जरांगे यांची भेट घेण्यासाठी आंतरवाली सराटी येथे गर्दी करत आहेत. दरम्यान, मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. इच्छुक उमेदवार म्हणून येणार आणि गेम करणार, अशी धमकी एका युट्युब चॅनलच्या कमेंटमधून दिली आहे. एका अज्ञाताने ही धमकी दिली असू यामुळे एकच खळबळ उडाली आहे. युट्युबवरील एका चॅनलच्या कमेंटमध्ये बजाज बिश्नोई लीडर नावाच्या फेक अकाउंटवरुन ही धमकी देण्यात आली आहे. इच्छुक…

Read More

जळगाव   : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार घोषित झाले आहेत. महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार सुरेश भोळे दिनांक २८ रोजी उमेदवारी दाखल करणार आहेत. नेते गिरीश महाजन यांची उपस्थिती राहील. जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून इच्छूक उमेदवारांनी अर्ज घेतले असून ठरलेल्या मुहूर्तानुसार अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया दिनांक २३ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून २९ ऑक्टोबरपर्यत अर्ज दाखल करता येणार आहे. भाजपतर्फे २८ रोजी कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. महायुतीतील भाजप उमेदवारांचे दिनांक २८ रोजी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. नेते गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील बोरगाव शिवारातील शेतकरी धनगर यांच्या शेतात आज दुपारी २ वाजता एक अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या अनोळखी तरुणाचे डोकं व एक हात वेगळा होता. तसेच कुजलेल्या अवस्थेत हा मृतदेह असल्याचे दिसून आले. तर हिंस्र प्राण्यांनी हल्ला केल्याने या तरुणाचा मृत्यू झाल्याची शक्यता या वेळी वर्तवण्यात आली. दरम्यान, घटनास्थळी वनपाल अनिल साळुंखे, वनरक्षक सुनील तोडकर, गणेश धानोरे, वन मजूर शांताराम पाटील, गजानन सैंदाणे यांनी भेट देऊन शेतातील घटनास्थळाची पाहणी केली. धरणगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. जितेंद्र चव्हाण यांनी जागेवरच मृदेहाचे शवविच्छेदन केले. या संदर्भात त्यांनी रिपोर्ट सादर केला असून तो नाशिक येथे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रस्तयाच्या परिस्थतीकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगाने जाणाऱ्या डंपरने समोर चालणाऱ्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील धर्मेंद्र रामदयाल सोनी (वय ४२, रा. शिवराम नगर) हे गंभीर जखमी झाले. ही घटना दि. १८ रोजी काशिनाथ हॉटेलजवळ घडली. याप्रकरणी डंपर चालकाविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील शिवराम नगरात धर्मेंद्र सोनी हे वास्तव्यास असून ते व्यापारी आहेत. दि. १८ रोजी रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास (एमएच १९, डीजी ८८८०) क्रमांकाच्या दुचाकीने सुरभी लॉन्स येथे फाईल देण्यासाठी पुतण्याला घेवून जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने जात असलेल्या (एमएच १५, एफव्ही ४९५४) क्रमांकाच्या डंपरने मागून…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जीएसटी व आयकराच्या कामासाठी दिलेले ३० लाख रुपये परत मिळावेत, यासाठी दोन कंत्राटदारांनी सीए सुहास प्रफुल्ल दहाड (३७, रा. सुयोग कॉलनी) यांना मारहाण करून त्यांचे अपहरण केले. ही घटना २२ ऑक्टोबर रोजी घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, दोन्ही कंत्राटदारांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गिरणा टाकी परिसरात असलेल्या सुयोग कॉलनीतील सुहास दहाड हे चार्टर्ड अकाउंटंट असून, कंत्राटदार नीलेश संजय मोरे व तुषार कैलास धनगर या दोघांकडून पाच ते सहा महिन्यांपूर्वी जीएसटी व इन्कम टॅक्सच्या कामासाठी दहाड यांनी प्रत्येकी १५ लाख रुपये घेतले होते त्यानुसार त्या दोघांचे कामदेखील दहाड यांनी करून दिले होते. काम…

Read More

जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला नयन भालेराव याने व्हिडीओ कॉल करून तिचा अश्लील व्हिडीओ तयार करीत तिचा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. ही घटना डिसेंबर २०२२ ते १८ ऑक्टोबर २०२४ दरम्यान घडली. याप्रकरणी नयनसह जळगावातील एका मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून नयनला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील एका गावातील शिक्षण घेत असलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीची धामणगाव, ता. जळगाव येथील नयन भालेराव याच्यासोबत ओळख निर्माण होऊन नंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. त्यादरम्यान तरुणाने केलेल्या व्हिडीओ कॉलवेळी तरुणीचे अश्लील व्हिडीओ तयार केले. त्यावरून तरुणीने प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिला. तरुणाने हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन जवळीक…

Read More

रावेर : प्रतिनधी शहराच्या वेगवेगळ्या भागात भरारी पथकांनी केलेल्या कारवाईत एकत्रित ३ लाख ९० हजार रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. संबंधित व्यक्ती पुरावा देऊ न शकल्याने ही रक्कम कोषागार कार्यालयात जमा करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू असताना सायंकाळी काळ्या बॅगमधून एक व्यक्ती रोकड घेऊन जात असल्याची माहिती रावेर पोलिसांना मिळताच त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात नाकाबंदी केली. आचारसंहिता कक्षातील भरारी पथकाने मंगळवारी रात्री साडेआठ वाजता संशयित सुनील लखीचंद लुल्लव्य (रा. ४६२, आदर्शनगर, भुसावळ) यांची झडती घेतली असता, काळ्या रंगाच्या बॅगेत ८५ हजार २३० रुपयांची रोख रक्कम मिळाली. याचा पंचनामा करण्यात आला.…

Read More

पारोळा : प्रतिनिधी तालुक्यातील सावखेडे तुर्क ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे बिल मिळावे तसेच इतर कामांची वर्क ऑर्डर काढावी म्हणून दोन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी पारोळा गटविकास अधिकारी किशोर दत्ताजीराव शिंदे यांच्यासह पाच कर्मचाऱ्यांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी बुधवारी (दि. २३) संशयिताना ताब्यात घेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार बांधकाम व्यावसायिकाने सावखेडे तुर्क ग्रामपंचायत परिसरात विकासकामांचा ठेका घेतला होता. त्याचे बिल मिळावेतसेच इतर कामांच्या वर्कऑर्डर मिळण्याकरिता संबंधित कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे दोन लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली. ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या विभागाने…

Read More

मेष राशी आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. व्यवसायात नवीन करारांमुळे व्यवसायाची स्थिती सुधारेल. कोर्टातील खटल्यातील निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. नोकरीत प्रमोशनसोबतच तुम्हाला हव्या त्या ठिकाणी पोस्टिंग मिळू शकते. क्रीडा स्पर्धेत खडतर संघर्षानंतर लक्षणीय यश मिळू शकते. वृषभ राशी आज तुम्हाला नोकरीच्या शोधात प्रवास करावा लागू शकतो. तुमचा प्रवास यशस्वी होण्याचे संकेत आहेत. जुनी महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतील. पण महत्वाकांक्षा पूर्ण होऊ शकते. तुमच्या कार्यक्षेत्रात कोणाचीही दिशाभूल करू नका. शहाणपणाने आणि विवेकाने वागा. सामाजिक कार्याकडे कल वाढेल. मिथुन राशी आज कामात बरीच धावपळ होईल. मन विनाकारण भीतीने ग्रस्त आणि अस्वस्थ राहील. कामावर तुमच्या बॉसकडून निंदा…

Read More