सोलापूर वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून महायुती व महाविकास आघाडीच्या याद्या देखील जाहीर झाल्या आहे. त्यामुळे आता सर्वच उमेदवार अर्ज करण्याच्या धावपळीत असतांना एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. राज्यातील सोलापूरमध्ये भाजप आणि शिंदेसेनेतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येताय. महायुतीच्या जागा वाटपात शहर मध्य विधानसभेची जागा शिंदेसेनेला मिळायला हवी. अन्यथा भाजपच्या जिल्ह्यातील पाच जागा पाडू, असा इशारा शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे व अन्य पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धोरण अडचणीत येईल, असे आम्ही काही करणार नाही, अशी भूमिका दुसरे जिल्हाप्रमुख मनिष काळजे यांनी जाहीर केले. शिंदे म्हणाले. सोलापर लोकसभा मतदारसंघातील एक जागा शिवसैनिकांची आहे.…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वाकडी येथे सुनील वामन पाटील (वय ४०) या तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील वाकडी येथे सुनील पाटील हे वास्तव्यास होते. त्यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास विष प्राशन केल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला साडे चार वाजता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला. सुनील याच्या पश्चात पत्नी व मुलं असा परिवार आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार संजिव मोरे करीत आहेत
चोपडा : प्रतिनिधी चोपडा-शिरपूर रस्त्यावरील अकुलखेडा टोलनाक्याजवळ नाकाबंदी करत असताना पुणे येथील आकाश गणेश चव्हाण या युवकाकडे गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस आढळून आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. ही घटना दि. २३ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ रोजी १० वाजेच्या सुमारास निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चोपडा शहर पोलिसांनी चोपडा-शिरपूर रस्त्यावरील अकुलखेडा टोल नाक्याजवळ नाकेबंदी करत असताना पुणे-तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असलेला आकाश गणेश चव्हाण (२४, ह. मु. वाल्मीक नगर, पनवेल) हा दुचाकी (एमएच१४/केएल४३०३) चोपड्याकडे येत असताना त्याला पोलिसांनी अडवले. त्याच्याकडे २५ हजार किमतीचा एक गावठी कट्टा व दोन हजार किमतीचे दोन जिवंत काडतूस, पन्नास हजार…
जळगाव : प्रतिनिधी पती-पत्नीचे भांडण झाले. त्यातून पतीने मारहाण केल्याने पत्नी त्याच्याविरुध्द तक्रार द्यायला पोलीस ठाण्यात गेली तर इकडे पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी तरुणाने सुसाईड नोट लिहून ती आसाम येथे राहत असलेल्या मित्राला पाठविली. ही घटना बुधवारी रात्री साडे दहा वाजता चौघुले प्लॉट परिसरात घडली. मिलिंद शशिकांत दलाल (वय ३८) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी शनी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद दलाल हा टेन्ट हाऊसचा व्यवसाय करायचा. चौघुले प्लॉट भागात पत्नी, सहा वर्षाची मुलगी, तीन वर्षाचा मुलगा यांच्यासोबत वास्तव्याला होता. पती-पत्नीत सातत्याने भांडण होत होती. बुधवारी रात्रीही दोघांमध्ये भांडण झाले. त्यात…
जळगाव : प्रतिनिधी येथील आकाशवाणी चौकात पोलिसांच्या गस्तीदरम्यान एका कारमधून ६३ लाख ६८ हजार ९४८ रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या रोकडसह मुद्देमाल जिल्हा कोषागार कार्यालयात जमा करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास एमएम १९ ईए ९१७३ ही कार नाकाबंदीदरम्यान रोखण्यात आली. या कारची पोलिसांनी तपासणी केल्यानंतर एका पेटीत रोकड आढळून आली. त्यानंतर भरारी पथकाला ही माहिती कळविण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या भरारी पथकाने कारमधील राकेश ए. जैन (रा. नयनतारा अपार्टमेंट, सिंधी कॉलनीरोड, जळगाव) यांच्या समक्ष पंचनामा करीत रोकडसह मुद्देमाल जप्त केला.
वरणगाव : प्रतिनिधी येथील आयुध निर्माणीमध्ये तयार होणाऱ्या गोळ्यांच्या (काडतूस) चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या एके- ४७ च्या तीन व इतर दोन, अशा पाच रायफलींची शस्त्रागारातून चोरी झाली. ही धक्कादायक घटना सोमवार, दि.२१ रोजी घडली. याबाबत वरणगाव पोलिसांत बुधवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव आयुध निर्माणीत लष्करासाठी ५.५६ व एके ४७ • रायफलच्या गोळ्या (काडतूस) तयार केल्या जातात. या गोळ्या तयार झाल्यानंतर डेपोत पाठवण्याआधी त्यांची निर्माणी परिसरातच रायफलद्वारे चाचणी घेतली जाते. या चाचणीसाठी वापरल्या जाणाऱ्या पाच रायफलींची निर्माणीच्या शस्त्रागाराचे कुलूप तोडून चोरी झाल्याची घटना सोमवार, दि.२१ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली होती.शनिवारी याठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी शस्त्रागार विभागाला कुलूप…
लाईव्ह महाराष्ट्र : जळगाव माजी मंत्री डॉ. सतीश अण्णा पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी मिळू नये यासाठी पारोळ्यातील गद्दाराच्या मुलाकडून 10 सी आर ची ऑफर एका माडवली बादशाह कदून दिली गेली असे वृत्त विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार17 ऑक्टोबर रोजी सोशल मीडियावरील वाचकांना दिले गेले. अखेर विश्वसनीय सूत्रांनी दिलेली माहिती शिक्कामोर्तब होण्याच्या मार्गावर असून पहिल्या यादीत डॉक्टर सतीश अण्णांचे नाव कट करण्यात मांडोली बादशहा यशस्वी झाले आहे. जळगाव जिल्ह्यात शरद पवार यांचे विश्वासू व निष्ठावंत रवींद्र प्रल्हादराव पाटील व डॉक्टर सतीश भास्करराव पाटील हे दोन व्यक्ती आहे. डॉक्टर सतीश अण्णा म्हटलं म्हणजे पवार साहेब अशी ओळख जळगाव जिल्ह्यात…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महायुतीनंतर महाविकास आघाडीतील ठाकरे व पवार गटाची कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर आता कॉंग्रेस यादी जाहीर झाली आहे. काँग्रेसच्या उमेदवार यादीबाबत गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता होती. विशेष म्हणजे महायुतीच्या तीनही घटक पक्षांनी उमेदवारांची यादी जाहीर केली, महाविकास आघाडीतून ठाकरे गट आणि शरद पवार गटाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर काँग्रेस पक्षाकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 48 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसच्या या यादीत काही ठिकाणी विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर काही ठिकाणी नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. महाविकास आघाडीत जागावाटपाचा तिढा सुटला नव्हता. त्यामुळे काँग्रेसची…
मेष राशी समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क साधला जाईल. तुमचा विश्वास ठेवा. व्यापार क्षेत्राशी संबंधित लोकांना व्यवसायात शुभ प्रगतीची शक्यता आहे. उपजीविकेच्या क्षेत्रात गुंतलेल्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. मनातील समाधान वाढेल. आर्थिक क्षेत्रात केलेल्या प्रयत्नांना यश मिळेल. अचानक आर्थिक लाभ आणि पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. वाहन, घर, मालमत्ता खरेदीचे नियोजन केले जाईल. वृषभ राशी आज तुम्हाला चांगले अन्न आणि कपडे मिळतील. कोणत्याही महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होतील. प्रवासात नवीन मित्र बनतील. राजकारणात नात्यांचा फायदा होईल. व्यवसाय वाढवण्याच्या योजना यशस्वी होतील. नोकरीत तुम्हाला अधीनस्थांकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक नात्यात गोडवा राहील. व्यवसायात उत्पन्न चांगले राहील. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. चैनीच्या…
जळगाव : प्रतिनिधी खानदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री क्षेत्र पद्मालय गणपती मंदिर च्या विकासासाठी तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी राज्य शासनाने मंजूर केला यात 14 कोटी रुपयांच्या विकास कामांमध्ये ठेकेदाराला काम मिळून देण्यासाठी त्याच्याकडून तीन कोटी रुपये उकळले असल्याची चर्चा सुरू असून पारोळा येथील गद्दाराच्या मुलाने हा पराक्रम केला असल्याचे ठेकेदारांमध्ये व प्रशासनामध्ये चर्चा आहे. समाजामध्ये देवस्थानच्या विकासा साठी लोक वर्गणीतून विकास केला जातो अनेक भाविक दानधर्म करीत असतात परंतु श्री क्षेत्र पद्मालय गणपती मंदिर येथे शासनाने तीर्थक्षेत्र विकास अंतर्गत कोट्यावधी रुपयांचा निधी दिला हे काम दर्जेदार व्हावे यासाठी प्रशासनाने पाठपुरावा केला परंतु टक्केवारीसाठी अनेक ठेकेदारांना झुलवत ठेवले शेवटी…

