मेष राशी व्यवसायात अधिक मेहनत घ्यावी लागेल. उद्योगात अधिक भांडवल गुंतवण्याआधी, कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नीट विचार करा. काही महत्त्वाच्या कामात विनाकारण अडथळा येऊ शकतो. चैनीच्या कामांवर जास्त पैसा खर्च होईल. तुम्ही दारूचे सेवन करत असाल तर गाडी चालवू नका. एखाद्या नातेवाईकाच्या दुधाची चांगली बातमी मिळेल. राजकारणात उच्च पद मिळू शकते. वृषभ राशी उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील. काही व्यावसायिक योजना प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. बेरोजगारांना रोजगार मिळेल. मानसन्मान मिळेल. कुटुंबातील एखादा सदस्य दूरच्या देशातून येईल. राजकीय प्रयोग फायदेशीर ठरतील. नवीन मित्र व्यवसायात फायदेशीर ठरतील. कुटुंबात काही शुभ कार्ये पूर्ण होतील. स्पर्धेत यश मिळेल. मिथुन राशी कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम केल्याने…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी आपण ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा बळकट करण्यास प्राधान्य दिले आहे. मॉड्युलर जळीत कक्ष व अतिदक्षता विभागाचे लोकार्पण हे आरोग्य सेवेत एक महत्त्वपूर्ण पावले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी मागच्या चार वर्षात जिल्हा वार्षिक नियोजन मधून अत्याधुनिक करणासाठी नव्या तंत्रज्ञानाने सज्ज असलेले यंत्र सामुग्री दिले आहेत. आज त्यात अत्याधुनिक जळीत उपचार वॉर्डची भर पडली. उत्तर महाराष्ट्रातलं सर्वाधिक अत्याधुनिक रुग्णालय म्हणून ओळख निर्माण होत आहे. डीपीडीसीतून दिलेल्या मोठ्या निधीमुळे सिव्हील हॉस्पिटल व महाविद्यालयाचा संपूर्ण चेहरा मोहरा बदलला असल्याने सर्वसामान्यांना आपल्या हक्काचे हॉस्पिटल वाटत असल्याचे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते सिव्हिल…
जळगाव : प्रतिनिधी राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीचे रणधुमाळी सुरु झाली असतांना जळगाव जिल्ह्यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक गावातील तरुण शिंदेंच्या शिवसेनेत पक्ष प्रवेश करू लागले आहे. नुकतेच जळगाव ग्रामीण मतदार संघातील कंडारी येथील शेकडो तरुण शिवसेनेत दाखल झाले आहे. यावेळी युवा सेना तालुका प्रमुख दिपक भदाने, युवा सेना विभाग प्रमुख किशोर पाटील, किरण एकनाथ भिल, मनोज गुलाब भिल, गणेश एकनाथ भिल, मनोहर भिल, मोहन वामन भिल, सुनील गुलाबी भिल, साकिब संजू पटेल, राहुल भराडी, सावन भिल, गोकुळ भिल, अमोल मोरे, समाधान मोरे, मंगल मोरे, विनोद मोरे, किशोर भिल, अर्जुन भिल, सावन मोरे, भिकन भिल रोहित भिल…
पुणे : वृत्तसंस्था आगामी विधानसभा निवडणुकीची सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली असतांना भाजपने देखील निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. नुकतेच दि.२५ रोजी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे नेते अमित शहा राज्याच्या दौऱ्यावर येवून गेले त्यानंतर आज पुण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कार्यक्रम होणार होता मात्र आता पुणे दौरा रद्द करण्यात आला असल्याची माहितीसोर आली आहे. स.प. महाविद्यालयाच्या मैदानावर त्यांच्या सभेची जय्यत तयारी सुरू होती. मात्र गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सभास्थळी चिखल झाला आहे. तसेच आजही पुण्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे मोदींचा पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा…
बीड : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी पोलिसांच्या कारवाई सुरु असतांना नुकतेच बीड शहरात सुरु असलेल्या हवाला रॅकेटचा बुधवारी सायंकाळी बीड ग्रामीण व शहर पोलिसांनी भांडाफोड केला.पोलिसांनी ३ ठिकाणी धाड टाकून, २६लाखांची रोकड जप्त केली. पाचसंशयितांना चौकशीसाठी ताब्यातघेतले गेले आहे. नोटांवर कोडवर्डलिहून देशभरात हवाल्याचे पैसेपाठवले जात होते. मिळालेल्या माहितीनुसार, बीड शहरात हवाला रॅकेट कार्यरतअसल्याची माहिती पोलिस अधीक्षकअविनाश बारगळ यांना मिळाली होती.त्यांनी बीड ग्रामीण ठाण्याचे सहायकपोलिस निरीक्षक बाळराजे दराडे यांनाकारवाईचे आदेश दिले होते. एपीआयदराडे, पीएसआय नितीन काकरवाल,पीएसआय ज्ञानेश्वर कुकलारेयांच्यासह शहर ठाण्याचे पीआयशितलकुमार बल्लाळ, एपीआय बाबाराठोड यांच्या पथकाने बीड शहरातीलडीपी रोडवरील सारडा सेंट्रल, कबाडगल्ली व जालना रोडवरील सहकारभवन परिसरात अशा तीन ठिकाणीछापेमारी केली.…
धरणगाव : प्रतिनिधी स्वच्छता व पाणीपुरवठा तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या प्रयत्नांतून माळी समाजाला मंदिर बांधण्यासाठी 50 लाख रुपये निधी शासनामार्फत उपलब्ध करून देण्यात आला आहे. माळी समाजाच्या मंदिराचे भूमिपूजन करण्यासाठी गुलाबराव पाटील यांची माळी समाजातील पंचमंडळाने भेट नुकतीच भेट घेतली. आणि येत्या 29 सप्टेंबर रोजी मंदिराच्या भूमिपूजनाचे आयोजन करण्यात आले असून गुलाबराव पाटील यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार आहे. धरणगावातील मोठ्या माळी वाड्यात 2200 स्क्वेअर फुट जागा पडून होती. यासाठी माळी समाजातील पंचमंडळाने या जागेत माळी समाजाचे मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला. मात्र मंदिर बांधण्यासाठी मोठा खर्च येत असल्याने माळी समाजातील पंचमंडळाने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे मंदिर बांधण्यासाठी निधी उपलब्ध…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळहून सुरतकडे जाणाऱ्या एक्स्प्रेसमध्ये १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शौचालयात अज्ञाताने अत्याचार केला होता. मात्र पीडितेने बदनामीच्या धाकाने ही बाब कुटुंबियांना सांगितली नाही. मात्र पीडितेचे पोट दुखू लागल्यानंतर वैद्यकीय तपासणी केली असता, ती सहा महिन्यांची गर्भवती असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर घडला प्रकार समोर आला. अज्ञात प्रवाशाविरोधात भुसावळ लोहमार्ग पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथून भुसावळ येथे ही मुलगी सुरत जाण्यासाठी आली व सुरत जाणाऱ्या गाडीतून तिने प्रवास सुरू केला. भुसावळ रेल्वे स्थानक सोडल्यावर ही १७ वर्षीय पीडिता शौचास गेली असता, शौचालयात मागून तोंडाला मास्क लावून एक युवक आला व त्याने तिच्यावर अत्याचार केला. याबाबत…
जळगाव : प्रतिनिधी भरधाव काँक्रीट मिक्सर वाहनाने दुचाकीला धडक दिल्यामुळे भुसावळ येथील के. नारखेडे कॉलेजचे लिपिक कुणाल राजेंद्र महाले (२५, रा. नहाटा नगर, भुसावळ) हे जागीच ठार झाले. तर त्यांचे सहकारी निखिल शरद ब-हाटे जखमी झाले. अपघात बुधवारी (२५ सप्टेंबर) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास महामार्गावर जळगाव ते बांभोरी दरम्यान जकात नाक्याजवळ झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कुणाल महाले व निखिल बऱ्हाटे कॉलेजच्या कामानिमित्त भुसावळ येथून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात जात होते. जळगाव शहराच्या पुढे जकात नाक्याजवळ काँक्रीट मिक्सर वाहनाने त्यांच्या दुचाकीला कट मारला व महाले हे रस्त्यावर पडले. वाहनाच्या मागच्या चाकाखाली येऊन ते जागीच ठार झाले. दरम्यान, धडक देणारा चालक…
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील सराफ बाजारात अतिक्रमण काढायला गेलेल्या न.प.च्या पथकाला शिवीगाळ करत महिलांनी अंगावर रॉकेल ओतून घेत स्वतःला जाळून घेण्याची धमकी दिली. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा केल्याची तक्रार अमळनेर पोलिसात देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, न.प.चे अतिक्रमण विभागप्रमुख राधेश्याम अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शहरातील सराफ बाजार भागातील नागराज भबुतमल चोरडिया यांनी अतिक्रमण केले होते. त्यांना नगरपरिषदेने वेळोवेळी नोटीस बजावूनही अतिक्रमण न काढल्याने मुख्याधिकारी तुषार नेरकर यांच्यासह अतिक्रमण विभागाचे पथक व पोलिस कर्मचारी २४ रोजी सकाळी ११ वाजता नागराज चोरडिया यांचे अतिक्रमण काढायला गेले. त्यावेळी नागराज चोरडिया व त्यांची पत्नी इंदुमती चोरडिया, मुलगा प्रदीप चोरडिया, हेमेंद्र चोरडिया, चेतन चोरडिया व…
मेष राशी व्यवसायात आजचा दिवस समाधानाचा असेल. आज कुटुंबीयांशी भेट होईल. आज परस्पर संबंधांना महत्त्व द्या. थोडे कष्ट करूनच फायदा होण्याची शक्यता आहे. खर्च कमी करण्याचा प्रयत्न करा. कमालीची व्यस्तता राहील. तुम्हाला वाईट बातमी मिळू शकते. अधिक रेटारेटी होईल. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. वृषभ राशी प्रसन्न वाटेल. वादांना संयमाने व शांततेने समोसे जाल. आज साहसी वागू नका. नवीन कल्पना आणि योजनांवर चर्चा होईल. एखाद्याच्या प्रतिष्ठेनुसार आणि सन्मानानुसार काम केले जाईल. प्रॉपर्टीच्या कामात फायदा होईल. प्रगतीचा मार्ग मोकळा होईल. संयमाने केलेल्या कामात यश मिळेल. मिथुन राशी आज चुकीच्या लोकांच्या संगतीमुळे तुमचे नुकसान होईल. वाहनात बसताना काळजी घ्या. बोलण्यावर नियंत्रण ठेवा, कोणत्याही कामात…

