Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने निवडणुकीच्या बुथचे सूक्ष्म नियोजन करून एकजुटीने आपले गाव व आपला बूथ ही जबाबदारी पार पाडा. महायुतीचा भगवा फडकविण्यासाठी साठी सज्ज राहा. विरोधी उमेदवार कोण यापेक्षा महायुतीचा धनुष्यबाण हेच डोळ्यासमोर ठेवा. धरणगाव येथे २४ ऑक्टोंबरला उमेदवारी अर्ज दाखला करणार असुणु हजारोंच्या संख्येने उपस्थिती द्यावी आणि महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता हा गुलाबराव पाटील आहे असे समजून काम करण्याचे आवाहन शिवसेना नेते था पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. त्यांनी विरोधकांना चिमटे घेत टोलेही लगावले. जळगाव तालुक्याचा महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा जळगाव येथिल आदित्य लॉन येथे पार पडला यावेळी ते बोलत होते. “धनुष्यबाण हेच मिशन” ठेवून काम करा – खा.…

Read More

मुंबई वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकांच्या घडामोडींना वेग आला असून भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आज राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर होत आहे. बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. एकूण ३८ जणांचा या पहिल्या यादीमध्ये समावेश आहे. अजित पवार गटाची संपूर्ण यादी अजित पवार – बारामती छगन भुजबळ – येवला हसन मुश्रीफ-कागल धनंजय मुंडे – परळी नरहरी झिरवाळ – दिंडोरी अनिल पाटील – अमळनेर राजू कारेमोरे – तुमसर धर्मरावबाबा आत्राम – अहेरी इंद्रनील नाईक – पुसद चंद्रकांत नवघरे – वसमत नितीन पवार – कळवण माणिकराव…

Read More

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसापासून अनेक घडामोडी करीत असतांना कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली पहिली यादी जाहीर केली असून यात जळगाव जिल्ह्यात पाच शिलेदारांना पुन्हा एकदा मैदानात उतरविले आहे. तर दुसरीकडे पाचोरा विधानसभा मतदार संघात आ.किशोर पाटील यांना संधी दिली आहे. तर दुसरीकडे ठाकरे गटाच्या नेत्या वैशालीताई सूर्यवंशी यांनी नुकतीच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी नेहमीच मनोज जरांगे पाटील आक्रमक भूमिका घेत असून यंदाच्या विधानसभेत देखील मनोज जरांगे पाटील आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती समोर असतांना नुकतेच स्व.आर.ओ.पाटील यांच्या कन्या वैशालीताई सूर्यवंशी गेल्या गेल्या दोन वर्षापासून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात निवडणुकीच्या यादीचा कहर सुरु झाला असून नुकतेच महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव तथा मनसे नेते अमित ठाकरे यांची देखील उमेदवारी जाहीर झाली आहे. अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर संदीप देशपांडे यांना वरळीतून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे वरळीत ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे विरुद्ध मनसेचे संदीप देशपांडे यांच्यात काँटे की टक्कर असणार आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे काल डोंबिवली दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी कल्याण ग्रामीणचे विद्यमान आमदार…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव येथील जिनिंगमधून तब्बल ८६ लाख रुपये किंमतीच्या रुईच्या गाठी घेऊन पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या तामिळनाडूतील तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रोकर भावेश शहा (रा. कोईम्बतूर, तामीलनाडू), रंजीता इंटरप्रायझेस रायचूरचे मालक भाव्या नायक आणि पायोनियर इंटरप्रायझेस रायचूरच्या मालक बबीता संचेती अशी या गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव येथील वल्लभ जिनिंगचे मालक हरीश सुभाष अग्रवाल यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, वरील तीनही जणांनी आपला विश्वास संपादन केला. त्यानंतर २६ ऑगस्ट २०२२ रोजी ११० रूई गाठी व दि. ११ सप्टेंबर २०२२ रोजी १०० रूई गाठी त्यांनी खरेदी केल्या. दि. २४ ऑगस्ट…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी शेतीच्या वहिवाटीवरून असलेल्या वादातून एका कुटुंबाला ३५ जणांनी मारहाण, तर एकावर विळ्याने वार केल्याची घटना १३ रोजी सायंकाळी एकतास (ता. अमळनेर) गावात घडली. जखमी उपचार घेऊन परत आल्यावर मारवड पोलिस स्टेशनला ३५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एकतास येथील गोकुळ आनंदा बच्छाव आणि जयेश दुर्योधन वाघ यांच्या दोघांच्या शेतीची एकच वहिवाट असून, त्याबाबत न्यायालयात वाद सुरू आहेत. १३ रोजी सायंकाळी गोकुळ बच्छाव हे चुलत मामीची अंत्ययात्रा आटोपून परत येत असताना जयेश दुर्योधन वाघ, दुर्योधन निंबा वाघ, भरत निंबा वाघ आले व त्यांना मारहाण करू लागले. त्यावेळी जयेश याने विळ्याने मानेवर वार करण्याचा प्रयत्न केला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी चार वर्षांपूर्वी चोरलेली दुचाकी सासऱ्याला विक्री करणाऱ्या तन्वीर मजीद पटेल (रा. खडका रोड, भुसावळ) याच्यासह त्याचा सासरा अशपाक सत्तार पटेल (रा. आक्सानगर, रा. जळगाव) या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करीत चोरीच्या दोन दुचाकी हस्तगत केल्या. मिळालेली माहितीनुसार, मास्टर कॉलनीतील अशपाक सत्तार पटेल याच्याकडे चोरीची दुचाकी (एमएच १९, एक्यू ७८६३) असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. पथकाने अशपाक पटेल याची विचारपूस केली असता, त्याने ही दुचाकी चार वर्षांपूर्वी त्याचा जावई तन्वीर मजीद पटेल याने आणून दिल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने तन्वीरचा शोध घेतला असता तो एका…

Read More

जळगाव : प्रतिनिधी फटाके फोडण्याच्या कारणावरुन आठ जणांच्या टोळक्याने महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करण्यासह या महिलेच्या दीर व दिराणीलाही मारहाण केली. ही घटना २० ऑक्टोबर रोजी तालुक्यातील रामदेववाडी येथे घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील रामदेववाडी येथे फटाके फोडत असल्याच्या कारणावरुन वाद होऊन रेखाबाई धरमसिंग जाधव (४५, रा. रामदेववाडी) यांच्या डोक्यात एकाने कुन्हाडीने वार केला. तसेच महिलेचे दीर मिथून जाधव व दिराणी कांचन जाधव यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. यामध्ये तिघे जखमी झाले. या प्रकरणी रेखाबाई जाधव यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवत ठाणे जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणीवर जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे तरुणाने अत्याचार केला. यातून ही तरुणी गर्भवती राहिली असून तरुणाने लग्नास नकार दिल्याने अत्याचार करणारा धनराज पासवान (२०) व त्याची आई दुर्गा पासवान (४०) दोन्ही रा. कुसुंबा, ता. जळगाव या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मार्च २०२२ ते १४ ऑक्टोबर २०२४ दरम्यान सुरू होता. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथील धनराज पासवान याची ओळख ठाणे जिल्ह्यातील एका २५ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत वेळोवेळी तिच्यावर अत्याचार केला. यातून तरुणी गर्भवती राहिली. त्यानंतर तरुणीने लग्नाची मागणी केली असता तरुणासह त्याची आई दुर्गा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमध्ये भाजपने ९९ उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर मंगळवारी रात्री ११.३० वाजता शिवसेनेने ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे यामध्ये मुंबई, मराठवाडा, कोकण, खानदेश, पश्चिम महाराष्ट्रातील मतदारसंघांचा समावेश आहे. दरम्यान जळगाव जिल्ह्यातील सर्व जागांवरील उमेदवार शिवसेने जाहीर केले असून भाजपने मुक्ताईनगर मतदार संघ शिवसेनेला सोडल्याने शिवसेनेने मुक्ताईनगर मतदार संघातून अपक्ष आमदार चंद्रकांत निंबा पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर पालकमंत्री गुलाबराव पाटील हे जळगाव ग्रामीण मतदार संघातून लढणार आहेत तसेच शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून पुन्हा रिंगणात उतरणार आहेत. उमेदवारांची मतदार संघानिहाय यादी १) एकनाथ शिंदे – कोपरी पाचपाखडी २) चंद्रकांत…

Read More