मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी महायुती व महाविकास आघाडीचे उमेदवार जवळपास निश्चित झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या वतीने 15 उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर चोपड्यातून राजू तडवी यांना उमदेवारी देण्यात आली आहे. तर शिवसेनेसाठी महत्त्वाचा मनला जाणारा भायखळा मतदारसंघात मनोज जामसुतकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धुळे शहर – अनिल गोटे, चोपडा (अज) – राजू तडवी, जळगाव शहर – जयश्री सुनील महाजन, बुलढाणा – जयश्री शेळके, दिग्रस – पवन श्यामलाल जयस्वाल, हिंगोली – रूपाली राजेश पाटील, परतूर – आसाराम बोराडे, देवळाली (अजा) – योगेश…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी पारोळाच्या गद्दाराच्या मुलाची मस्ती करणारे अनेक किस्से पुढे येत असून त्यातच एका दलित शिक्षकाला बेदम मारहाण करीत पोलीस ठाण्यापर्यंत मॅनेज करण्याचे काम या गद्दाराच्या मुलाने केले हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून एरंडोल व पारोळा तालुक्याला शांतता हवी असेल व विकास हवा असेल तर या गद्दाराच्या मुलाला घरी पाठवण्याची वेळ आली आहे अन्यथा पश्चाताप शिवाय हातात काही मिळणार नाही असे चित्र पारोळा व एरंडोल तालुक्यातील आहे. सोशल मीडियावरील हा व्हिडिओ कधीचा आहे हे सांगता येत नाही परंतु कासोदा येथील आदिवासींची जमीन पचवणे, एरंडोल येथील माळी समाजाच्या नेतृत्वाला तुरुंगात षड्यंत्र रचून पाठवणे, जवळच्याच माळी समाजाच्या नानाभाऊला…
जळगाव : प्रतिनिधी चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात राजगड आणि पवार साहेब हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासून जुडले आहे. कार्यकर्ते देखील त्याच पद्धतीने त्याच साच्यामध्ये वावरत असतात व समाजसेवेत कार्यरत असतात. परंतु राजकीय इतिहासात पहिल्यांदाच ही जागा शिवसेनेकडे गेल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून दगड पेक्षा वीट बरी अशी म्हण अहिराणी मध्ये आहे त्या पद्धतीने कार्यकर्ते भाजपाकडे वाटचाल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जे भावनिक नातं शिवसेना नेत्यांचे जोडायला पाहिजे होते तसे चित्र या मतदारसंघात दिसत नाही यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये दोन मतप्रवाह निर्माण झाला आहे. तसेच जिल्हाध्यक्षांच्या मनातही आपली उमेदवारी कट झाल्याचे शैल्य असल्यामुळे कितपत मैदानात ते…
लाईव्ह महाराष्ट्र जळगाव : प्रतिनिधी कधी पत्रकाराला मारहाण, एकदम गुरमीत राहणे, पैशांची मस्ती आणि सर्व काही पैशाने विकत घेऊ या अविर्भावात असलेले पाचोर्यातील गद्दारणे एका शेतकऱ्याला टर टर टर करू नको अशा मस्तीच्या भाषेत शब्द वापरून दमदाटी केल्याचा प्रकार उघडकीस आला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे शेतकऱ्यांची उद्धटपणे वागणे हे गद्दाराच्या चांगल्याच अंगलट येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाचोर्यातील गुजर समाजाच्या पत्रकाराला मारहाण करणे राज्यभर गाजले विशेष म्हणजे शिवीगाळ करणे हे नेहमीचेच झाले आहे. सर्व काही पैशांच्या जीवावर विकत घेऊ शकतो ही मस्ती आली कडे राजकारणामध्ये फार मोठ्या प्रमाणात भोपावली आहे. दिग्गज नेत्यांना म्हणजेच तालुक्यातील अनेकांन…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील बामोशी बाबा दर्गा परिसरातील भाविकांना चाकूचा धाक दाखवून लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या मालेगाव येथील तिघांना चाळीसगाव शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. यामुळे परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगावातील पिर मुसा कादरी बाबा दर्गा परिसरात झोपलेल्या भाविकांना काही लोक चाकूचा धाक दाखवून पैसे व मौल्यवान वस्तू हिसकावण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती पोलिसांना रात्रीची गस्त घालत असतांना मिळाली होती. पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश रायकर, हवालदार योगेश बेलदार, अजय पाटील, नीलेश पाटील, शरद पाटील, नरेंद्र चौधरी, अमोल भोसले आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर हे व्यक्ती अहिल्यादेवी चौकाकडे…
भुसावळ : प्रतिनिधी पतीने पत्नीच्या चरित्र्यावर संशय घेत मारहाण केली. यानंतर लोखंडी कोयता डोक्यात घातला. यामुळे महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. शहरातील फेकरी शिवारात पती सचिन किशोर बोराडे हा पत्नीवर चरित्र्यावर संशय घेत होता. गुरुवारी पत्नीवर संशय घेत मारहाण केली. यानंतर त्याने थेट कोयता तिच्या डोक्यात घातला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संजय कंखरे करीत आहेत.
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील निमखेडी खुर्द येथील शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी द्रव सेवन करून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मृत शेतकऱ्याचे नाव दामोदर तुकाराम चिखलकर कोळी (५३) असे आहे.दामोदर कोळी यांच्याकडे शेती आहे. गेल्या गेल्या काही वर्षांपासून निर्सगाच्या लहरीपणामुळे ते हताश झाले. गेल्य काही दिवसांपासून कर्ज कसे फेडायचे या विंवचनेत होते. बचत गटाचे व खासगी सावकाराचे कर्ज होते. २० रोजी त्यांनी शेतात काहीतरी विषारी द्रव सेवन केले. कुटुंबाच्या लक्षात आल्याने तातडीने त्यांना जळगाव येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना शुक्रवारी दुपारी बारा वाजता मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात तीन मुले, पत्नी, सून असा परिवार आहे. त्यांच्यावर…
मेष राशी आज कामाच्या ठिकाणी अशी काही घटना घडू शकते ज्यामुळे तुम्ही प्रचंड रागावाल. रागावर नियंत्रण ठेवा. नाहीतर परिस्थिती बिघडू शकते. सकारात्मक विचार वाढवा. सामाजिक कार्यात रुची वाढेल. महत्त्वाच्या कामात कोणाचीही दिशाभूल करू नका. व्यवसायात वेळेवर काम करा. व्यावसायिक क्षेत्रात केलेले करार फायदेशीर ठरतील. जमीन, इमारत, वाहन इत्यादी खरेदीचे नियोजन करता येईल. वृषभ राशी आज तुम्हाला तुमच्या कामात महत्त्वाचे यश मिळेल. त्यामुळे तुमचे मनोबल आणि धैर्य वाढेल. तुमचा आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. प्रामाणिकपणे काम करत राहा. तुमची प्रगती पाहून विरोधी पक्षांना हेवा वाटेल. त्यामुळे काळजी घ्या. व्यवसायात कठोर परिश्रम करूनही अपेक्षित आर्थिक लाभ न मिळाल्याने दुःखी राहाल. तुम्हाला व्यवसायात…
एरंडोल : प्रतिनिधी राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु झाली आहे. तर दुसरीकडे महायुती व महाविकास आघाडीने देखील आपले उमेदवार जाहीर केले आहे. मात्र राज्यात यंदा अनेक अपक्षांच्या उमेदवारीमुळे पक्षाचे उमेदवार टेशनमध्ये आले आहे. नुकतेच एरंडोल पारोळा मतदार संघात आज दि.२५ रोजी भगवान आसाराम महाजन यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. एरंडोल भडगाव विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज भगवान आसाराम महाजन यांनी हजारोंच्या संख्येने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी मतदारसंघात गावोगावी जाऊन नागरिकांशी संवाद साधत समाज उपयोगी काम करत नागरिकांशी संवाद साधला होता त्यांचा उमेदवारी अर्ज एरंडोल या ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दाखल…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून चांगलेच वातावरण तापले आहे. महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच सुरू असताना दुसरीकडे महायुती मात्र उमेदवारांची अदलाबदल करत निवडणुकीला सामोरे जात आहेत. अशात आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्येही जोरदार इनकमिंग सुरू झाले आहे. आज सकाळीच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये भाजपच्या एका माजी खासदाराने प्रवेश केला असून, भाजपचा आणखी एक माजी खासदार आणि काँग्रेसचा विद्यमान आमदार अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार आहे. दरम्यान अजित पवार यांच्या पक्षात प्रवेश करणारे सर्व आजी-माजी आमदार आणि खासदार घड्याळ चिन्हावर विधानसभा लढवणार आहेत. सांगलीचे भाजपचे माजी खासदार संजय काका पाटील यांनी आज सकाळी अजित पवार यांच्या…

