Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » जळगावात निवृत्त सहायक फौजदाराचे चोरट्यांनी फोडले घर
    क्राईम

    जळगावात निवृत्त सहायक फौजदाराचे चोरट्यांनी फोडले घर

    editor deskBy editor deskSeptember 28, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    पत्नीसह रावेर येथे मुलाकडे गेलेले निवृत्त सहायक फौजदार चंद्रकांत माधवराव बडगुजर (६७, रा. दादावाडी) यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख सात हजार रुपयांसह सोन्या-चांदीचे दागिने, असा एकूण ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना १४ ते २६ सप्टेंबरदरम्यान घडली. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रकांत बडगुजर हे पत्नीसह १४ सप्टेंबर रोजी रावेर येथे शिक्षक असलेले पंकज बडगुजर या मुलाच्या घरी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरातून रोख सात हजार रुपये, ३० हजार रुपये किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोनपोत, १० हजार रुपये किमतीच्या गणपतीच्या चांदीच्या दोन मूर्ती, चांदीचे लक्ष्मीचे शिक्के, जोडवे, असा एकूण ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. शेजारी राहणाऱ्या महिलेने गुरुवारी (दि. २६) बडगुजर यांच्याशी संपर्क साधून दरवाजा उघडा असल्याचे सांगितले. त्यानंतर बडगुजर कुटुंबीय घरी आले असता, त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटून ते जिन्याखाली पडलेले दिसले. कपाटात ठेवलेली रोकड व सोन्या-चांदीचे दागिने दिसले नाहीत. याप्रकरणी त्यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकों धनराज पाटील करीत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    मास्टर कॉलनीत भीषण दुर्घटना; बाप–लेकीचा विजेच्या धक्क्यात मृत्यू, भाची गंभीर

    December 5, 2025

    ओव्हरटेकचा अट्टहास ठरला घातक; एसटी बस दोन तुकड्यांत, तीन ठार !

    December 5, 2025

    सोनीनगरात मध्यरात्री धाड : दोन घरांत चोरी; १ लाख ६३ हजारांचा ऐवज गायब

    December 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2025 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.