Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी दीपोत्सवानिमित्त शुक्रवारी सकाळी १ नोव्हेंबर रोजी आ. राजूमामा उर्फ सुरेश भोळे यांनी सहकुटुंब माजी मंत्री सुरेशदादा जैन यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. आमदार भोळे यांनी पत्नी तथा माजी महापौर सीमा भोळे, मुलगा विशाल भोळे, सुन डॉ. जुही भोळे व मोहित भोळे यांच्यासह सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. जळगाव शहरात सर्वांगिण विकास कसा झाला पाहिजे, शहर मतदारसंघातील कोणकोणत्या विषयांवर विशेष लक्ष केंद्रीत केले पाहिजे, तसेच विविध विषयांवर वडिलधाऱ्या दादांनी आशीर्वादपर मार्गदर्शन दिले. हा स्नेहबंध उद्याच्या जळगाव शहराच्या सर्वागिण विकासासाठी अत्यंत मोलाचा आणि मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केला.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात सर्वच पक्ष निवडणुकीच्या प्रचारात उतरले असताना राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत अचानक मोठी वाढ करण्यात आली आहे. त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय सुरक्षा यंत्रणांनी घेतला आहे. फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत चार फोर्स वनचे चार अत्याधुनिक शस्त्रधारी कमांडो तैनात करण्यात येणार आहे. राज्यात भाजपच्या प्रचाराची जबाबदारी ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. या धामधुमीत त्यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना प्राप्त झाली आहे. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. फडणवीस यांना सध्या झेड प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. त्यात आला वाढ करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात विधानसभा निवडणुकीची मोठी धुमाकूळ सुरु झाली असून तर दुसरीकडे माहिम मतदारसंघावरून राजकीय वाद वाढले आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात शिंदेंच्या शिवसेनेकडून पुन्हा सदा सरवणकर यांना तिकीट देण्यात आले आहे तर उद्धव ठाकरेंकडून महेश सावंत यांना उमेदवारी मिळाली आहे त्यामुळे माहिम मतदारसंघात तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. अमित ठाकरेंना महायुतीचा पाठिंबा मिळेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. परंतु सदा सरवणकर हे माघार घेण्यास तयार नव्हते. त्यात कार्यकर्त्यांना खचू न देणे ही नेत्याची जबाबदारी असते असं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले त्यामुळे मनसेकडूनही त्यावर पलटवार केला…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी चोपडा ते धरणगाव रस्त्यावर ३१ रोजी रात्री केलेल्या कारवाईत गांजा विक्री करणाऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याकडून जवळपास ४८ हजारांचा १२०० ग्रॅम जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथील चोपडा ते धरणगाव रस्त्यावर ३१ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास चोपड्याकडून विना क्रमांकाच्या दुचाकीवर चोपडा तालुक्यातील तावसे बुद्रुक येथील ज्ञानेश्वर अमृत चौधरी (वय ७६) हा येत होता. त्यावेळी त्याच्या जवळील दुचाकीवरील पांढऱ्या रंगाची गोणीमध्ये ४८ हजार रुपयांचा १२०० ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. हा गांजा तो विक्री करण्याचे उद्देशाने बाळगताना आढळून आल्याने धरणगाव पोलिसांच्या पथकातील सर्व अधिकारी, अंमलदारांच्या मदतीने त्याच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पनवेल येथून जळगावात परतल्यानंतर रिक्षातून घरी जात असताना जगदीश लक्ष्मण बडगुजर (२६, रा. पिंप्राळा) या विद्यार्थ्याला मारहाण करीत धारदार वस्तूने वार केला. त्याच्याकडून रोख २० हजार २५० रुपयांसह मोबाइल, एटीएम कार्ड देखील हिसकावून घेतले. याप्रकरणी रिक्षाचालकासह दोघांना अटक करण्यात आली आहे. ही घटना ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे घडली. मिळालेल्या मह्हितीनुसार, जगदीश बडगुजर हा जळगावात आल्यानंतर घरी जाण्यासाठी तो रेल्वे स्थानक मार्गावरील एका हॉटेलसमोरून रिक्षात (क्र. एमएच १९, व्ही. ५६५८) बसला. रिक्षाचालक गोलू निकम (२२, रा. राम नगर) व प्रवीण महाजन या दोघांनी मारहाण करीत धारदार शस्त्राने वार केला. त्यानंतर त्याच्या बॅगेतील एटीएम कार्ड, रोख २० हजार ५००…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील जांभोरे येथे बैलगाडीला बसने मागून जोरदार धडक दिली. या अपघातात बैलजोडीसह शेतकरी ठार झाला. ही घटना गुरुवारी घडली. मृत शेतकऱ्याचे नाव गोपाल केशव अहिरे (६७) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शेतातून बैलगाडी घेऊन घराकडे येत असताना पारोळा धरणगाव रस्त्याला जांभोरे येथे पारोळ्याकडून येणारी नाशिक धरणगाव बसने क्रमांक (एम. एच २० बी. एल. ३३६३) जोरदार धडक दिली. अपघातात बैलगाडीचा अक्षरशः चुराडा झाला. बैलजोडी ही जागीच ठार झाली. शेतकरी गोपाल अहिरे गंभीर जखमी झाले. त्यांचे लहान बंधू नाना अहिरे यांनी तत्काळ त्यांना धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालय हलविण्यात आले.…

Read More

मेष राशी महत्त्वाच्या कामात मोठे निर्णय परिस्थितीचे भान ठेवूनच घ्या. सामाजिक उपक्रमांची जाणीव ठेवा. व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी व्यवसायाच्या दृष्टिकोनातून लाभाची स्थिती सामान्य राहील. उपजीविका करणाऱ्या लोकांना त्यांच्या वरिष्ठांशी समन्वय राखण्याची आवश्यकता असेल. आरोग्याच्या दृष्टिकोनातून दिवस काहीसा त्रासदायक असेल. कफ, वाणी आणि पित्ताशी संबंधित विकार होऊ शकतात. खाण्यापिण्याचे पथ्य पाळावे. वृषभ राशी महत्त्वाच्या कामात आज विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमची गुप्त धोरणे विरोधी पक्षाला उघड होऊ देऊ नका. सामाजिक कार्यात रस वाढेल. कुटुंबात शुभ आणि धार्मिक कार्य पूर्ण होण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित वादात अडकू नये म्हणून खरेदी-विक्री करताना विशेष काळजी घ्या. घाईगडबडीत कोणीही मोठा निर्णय घेऊ नये. मिथुन राशी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील सर्वच नेत्यांनी आपआपले उमेदवारी अर्ज भरले आहे. तर आता प्रचाराचा धुराळा उडणार आहे. नुकतेच महायुतीचे नेते व आमदार सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांना थेट गद्दार म्हणले असल्याने राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. शिराळा येथील महायुतीचे उमेदवार सत्यजित देशमुख यांच्या प्रचार सभेत बोलताना माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्तावावार बोलत असताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांवर टीका केली आहे. सदभाऊ खोत शरद पवारांवर टीका करताना म्हणाले, मी ज्या सभागृहात काम करतो, त्या सभागृहाचे सभापती होते शिवाजीराव देशमुख. ते आजारी होते. घरात मशीन बसवल्या होत्या. रक्त बदलावे लागत होते. रक्त बदलल्यावर ते उठून कामाला…

Read More

जळगाव :  लाईव्ह महाराष्ट्र न्युज  जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात धगधगती मशाल जोरात वारू उधळेल असे चित्र आता शहरात निर्माण होण्यास शक्यता फार कमी झाले आहे. धगधगती मशाल ही पेटली आहे परंतु त्या मशालीसाठी कुणीही मदतीला धावून जाईल असे चित्र नाही आहे. सामाजिक रचनेतही मशाल फार काही जोर धरेल असे चित्र वाटत नाही. विश्वासाने कोणी मान टाकेल खांद्यावर असा विश्वास या मशालीच्या नेतृत्वावर दिसून येत नाही म्हणून मतदार राजा सावध भूमिकेत आहे काय चित्र निर्माण होईल हे सांगता येत नाही परंतु मशाल जोरात धगधगणार हे काही असं अनुकूल वातावरण जळगाव शहरात दिसून येत नाही असो ज्या पद्धतीने मशालीची प्रसिद्धी व्हायला पाहिजे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी रावेर विधानसभा मतदारसंघ सामाजिक रचनेत अल्पसंख्यांक मानला जातो या मतदारसंघाची रचना फार वेगळी आहे आर्थिक संपन्न असलेले मतदार या ठिकाणी आहे. परंतु या मतदारसंघात दाराने फार मोठे अडचणी निर्माण करून ठेवले आहे प्रचंड सामाजिक प्राबल्य असलेला दारा हा ज्येष्ठ नेत्याला अडचणीच्या ठरणार आहे कुठल्याही परिस्थितीत पुत्राला विधानसभेत पाठवण्यासाठी दारापुढे पायघड्या टाकण्याचे काम ज्येष्ठ नेत्याकडून सुरू आहे. ज्येष्ठ नेत्याने एका ज्येष्ठ भाऊला देखील मध्यस्थी करायला सांगितले असून ज्येष्ठ भाऊ निम्मेमाल उपटण्याच्या तयारीत आहे दाराची मध्यस्थी करून असे या मतदारसंघात बोलले जात आहे. या मतदारसंघात परिवर्तनवादी निकाल येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे यामुळे सध्या कोणाची हवा आहे यापेक्षा…

Read More