Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी शहरातील पिंप्राळा परिसरातील गणपती नगरातील रहिवासी ३५ वर्षीय तरुण भूषण केशव काकडे यांच्या पोटात पाणी होऊन श्वास घ्यायला त्रास होऊ लागल्याने या तरुणाचा ३ ऑक्टोबर रोजी रात्री ११:३० वाजता मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, भूषण याच्या पोटात पाणी झाले, त्यामुळे श्वास घेता येत नव्हता. त्याशिवाय पायाला सूज आली होती. नातेवाईकांनी ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी शासकीय वैद्यकीय च महाविद्यालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी रामानंद नगर च पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद व करण्यात आली आहे. तपास प्रशांत पाटील करीत आहेत.

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील वांजोळा रस्त्यावरील प्रेरणानगर फाट्याजवळ बाजारपेठ पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून दोघांना दोन गावठी पिस्तुलांसह जिवंत काडतूस ताब्यात घेतले. त्यांची किंमत सुमारे ५१ हजार आहे. ही कारवाई शनिवारी दुपारी साडेचार करण्यात आली. ताब्यात घेतलेल्या संशयितांचे नावे मुकेश मोहन अटवाल (२०) रा. वाल्मीक नगर, भुसावळ, यश किरण बोयत (२२, भुसावळ) अशी आहेत. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस करत आहेत.

Read More

जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील पहूर येथे कर्जाच्या नैराश्येतून तरुण शेतकऱ्याने स्वतःच्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लॉध्री बुद्रुक येथे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. जीवन ज्ञानेश्वर भागवत (वय३८) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भागवत हे शुक्रवारी संध्याकाळी घरातून बेपत्ता होते. नातेवाईकांनी शोधाशोध केली असता रात्री स्वतःच्या शेतात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. जीवन यांच्यावर खासगी व बँकेचे सत्तर ते ऐंशी हजाराचे कर्ज असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्याचे व्याज वाढल्याने ते विवंचनेत होते. या नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा…

Read More

मेष राशी सावध राहा, एखादा धोका असू शकतो. नातेवाईकाशी वाद होऊ शकतो. वैवाहिक जीवनात आनंदाची बातमी मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता आहे.. व्यवसायात काही चांगला संदेश मिळू शकतो. अतिरिक्त खर्चाचा विचार करा. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते. वृषभ राशी आजचा दिवस व्यवसायात चांगल्या गोष्टी घडू शकतात. कामाच्या ठिकाणी सुधारणा दिसून येऊ शकते. खर्च वाढू शकतो. कायदेशीर कामासाठी चांगल्या संधी मिळू शकतात. घराजवळ एखाद्या सहलीला जाण्याचा योग आहे. वाईट विचारांमुळे चिंता वाटेल. लॉटरीतून काही उत्पन्न मिळू शकते. मित्राकडून नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावध रहा. मिथुन राशी आर्थिक प्रगतीसाठी आजचा काळ खूप चांगला आहे. सकाळची कोणतीही चिंता डोकेदुखीला कारणीभूत ठरेल.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ठाण्यात बोलत असताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एमएमआर रिजनमध्ये काम हाती घेतले आहेत. आशियातील सर्वात मोठ्या लाईनचं उद्घाटन आज मोदीजी करत आहेत. नवरात्र सुरु आहे. मोदीजी फक्त ९ दिवस उपवास करतात. फक्त पाणी पितात. मेट्रो ३ ला महाविकासआघाडीने स्थगिती दिली होती. हजारो कोटी रुपये खर्च करुन स्थगिती दिली. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की, ही पर्यावरणाची साथ देणारी मेट्रो आहे. पर्यावरणाचं संवर्धन करणारी मेट्रो आहे. पण उद्धव ठाकरे यांचं इगो दुखावल्याने त्यांनी स्थगिती दिली. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात नवीन सरकार येताच पहिल्या टप्प्याचं काम आम्ही पूर्ण केलं.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी नवरात्रोत्सवानिमित्त शहरातील विविध देवींच्या मंदिरात आ. राजूमामा भोळे मित्र परिवाराकडून स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रसंगी नवरात्रोत्सवानिमित्त आ. राजूमामा भोळे यांनी भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. धार्मिक स्थळे व प्रार्थना केंद्रांचे पावित्र्य जपणे, स्वच्छता राखणे हे आपलं आद्यकर्तव्यच होय. नवरात्रोत्सवात शहरातील मंदिरांच्या स्वच्छतेची सेवा करण्याचे भाग्य मला लाभले याबद्दल सेवाधारी सेवक म्हणून मी आपला ऋणी आहे, अशी प्रतिक्रिया आ. राजूमामा भोळे यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वच्छ भारत अभियानात जळगाववासीयांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. कार्यकर्त्यांनी मेहरूण, पिप्राळा, दाणा बाजार परिसर, महाबळ, निमखेडी रोड, जुने जळगाव आदी भागातील देवींच्या मंदिरात स्वच्छता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पालकमंत्री गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा पहिला व दुसरा टप्पा यशस्वी झाला असून,तिसऱ्या टप्प्यालाही मान्यता मिळालेली आहे. ना. गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदार संघात 63 किमीच्या रस्त्यांसाठी 80 कोटी 42 लक्ष व देखभाल दुरुस्तीसाठी 5 कोटी असा एकूण सुमारे 85 कोटी एवढा निधी मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे या दोन्ही तालुक्यातील रस्त्यांचा काय पालट होणार असल्याने शेतकरी व ग्रामस्थांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना धन्यवाद दिले आहे. पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री एकनाथ‎ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस, ग्रामविकास मंत्री गिरीश‎ महाजन यांचे आभार मानले आहेत.‎ या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असतांना सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहे. तर ठाकरे गटाचे नेते खा.संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनी मला इंजेक्शन देऊन सुरतला नेल्याचा आरोप केला होता. खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या या दाव्याचे जोरदार समर्थन केले आहे. अनेक आमदारांना जेवणातून, औषधांतून गुंगीचे औषध देण्यात आले होते. त्यांना बधिर करण्यात आले होते. विशषतः नितीन देशमुख यांना तर थेट जिवे मारण्याचा प्रयत्न झाला होता, असे ते म्हणालेत. आमदार नितीन देशमुख हे एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी सुरतला गेले होते. पण ते अर्ध्या…

Read More

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असून नुकतेच एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई करीत छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथून तिघांना ताब्यात घेतले आहे. ते तिघेही दहशतवादी कृत्य करण्याच्या तयारीत असल्याचा संशय असून जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात शुक्रवारी (दि. ४) रात्री एनआयए आणि एटीएसने संयुक्त कारवाई केली. यात छत्रपती संभाजीनगर, मालेगाव आणि जालन्यात छापे टाकले. जालना येथील गांधीनगर येथून एकाला, छत्रपती संभाजीनगर शहरातील आझाद चौका जवळून एकजण आणि एन-६ परिसरातून एक अशा तिघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ते देश विघातक कृत्य करण्याच्या तयारीत होते. त्यांचा देश-विघातक कृत्यात सहभाग असल्याचा संशय आहे. संबंधित तरुणांना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी येथील शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी दाणाबाजारातील भवानी माता मंदिर येथे महाआरती करून देवी मातेला साकडे घातले. जळगावकरांच्या इच्छा पूर्ण कर. त्यांना कायम सुखी ठेव, अशी मनोभावे प्रार्थना आ. भोळे व माजी महापौर सीमा भोळे यांनी केली. देशात सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू झाला आहे. जळगावात नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आ. राजूमामा भोळे व माजी महापौर सीमा भोळे यांनी दाणाबाजारातील भवानी माता मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले. तसेच महाआरती करून जळगावकरांसाठी प्रार्थना केली. प्रसंगी मंदिरातील विश्वस्तांनी आमदार भोळे यांचे सपत्नीक स्वागत केले. यावेळी भाविकांशी आमदार राजूमामा भोळे यांनी संवाद साधला. राजू बांगर, राजेंद्र वर्मा, गुरुजी महेश कुमार त्रिपाठी, लक्ष्मी…

Read More