जळगाव : प्रतिनिधी “कहो दिल से, राजूमामा फिर से”, “राजूमामा आगे बढो, हम तुम्हारे साथ है” अशा घोषणा देऊन शिवकॉलनी, हरिविठ्ठल नगर परिसरात महायुतीचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने प्रचार रॅली काढली. यावेळी परिसरातील विविध नागरिकांच्या घरी भेटी देऊन तसेच,मंदिरात जाऊन आ. भोळे यांनी पूजा करून विजयासाठी साकडे घातले. जळगाव शहर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांनी मंगळवारी सकाळी प्रचाराला जोरदार सुरुवात केली. संध्याकाळी दुसऱ्या टप्प्यात शिव कॉलनी स्टॉप येथे प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली. शिवकॉलनी परिसर, हनूमान मंदिर, आशाबाबा नगर परिसर, गजानन महाराज मंदिर परिसर, खंडेराव नगर, पंडितराव कॉलनी, हरिविठल…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी “शिवसेनेत सामील झालेल्या या कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत आहे. त्यांचा सहभाग पक्षाच्या बळकटीसाठी महत्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगत मा. जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांनी सांगितले. म्हसावद आणि बोरणार येथील उ. बा. ठा. गटाला मोठा धक्का बसला असून, पाळधी येथे शिवसेना प्रचार कार्यालयात माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांच्या हस्ते या कार्यकर्त्यांचा पक्षात स्वागत करण्यात आले. म्हसावद येथील ऊ .बा. ठा. गटाचे गट प्रमुख योगेश सोनवणे, बोरणार येथील संदीप धनगर, रामदास मराठे, आनंदा धनगर, गोविंदा बाविस्कर, मोहित धनगर, युसूफ पठाण, अमोल आण्णा धनगर, गौरव धनगर, सुरेश भोई, महेंद्र धनगर, तेजस धनगर, शिवाजी धनगर, आणि तेजस भोई यांनी माजी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहर विधानसभा मतदार संघातील महायुती तथा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आ. राजूमामा भोळे यांच्या प्रचाराचा नारळ आज मंगळवारी दि. ५ नोव्हेंबर रोजी जुन्या जळगावात ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते फोडण्यात आला. यानंतर जुने जळगाव परिसरातील विविध भागांमध्ये जाऊन आ. राजूमामा भोळे यांची प्रचार रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये जनतेमधून भरभरून प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी औक्षण करून तसेच पुष्पहार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. जुने जळगाव परिसरातील विविध कॉलनीमध्ये महिला भगिनींनी आ.राजूमामा भोळे यांचे औक्षण करून त्यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अनेक भागात आ. भोळे यांच्यावर पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत करण्यात आले. ढोलताशांच्या गजरात, फटाक्यांच्या आतिषबाजीत…
जळगाव : प्रतिनिधी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी २० नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. जिल्ह्यात मतदारांमध्ये जनजागृती करण्यासोबतच अधिकाधिक मतदाराना मतदानासाठी प्रोत्साहित करण्याकरिता व्हॉईस ऑफ मीडिया यांच्या वतीने अमळनेर येथील मंगळग्रह संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आलेल्या मतदार जनजागृती रथाचे उद्घाटन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांचे हस्ते दि.५ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी,अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी भिमराज दराडे, जिल्हा पुरवठा अधिकारी संजय गायकवाड, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील,मंगळ ग्रह संस्थानचे अध्यक्ष , विश्वस्त आदी उपस्थित होते. या वेळी उपस्थितांच्या हस्ते मतदार जनजागृती रथाचे उद्घाटन…
मुंबई : वृत्तसंस्था उद्धव ठाकरेंच्या शिवसेने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरांवर मोठी कारवाई केली आहे. उद्धव ठाकरे यांनी पक्षविरोधी कारवायांमुळे पाच नेत्यांची हकालपट्टी केली आहे. यामध्ये भिवंडीचे माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल (4 नोव्हेंबर) शेवटचा दिवस होता. महाविका आघाडीतील ज्या उमेदवारांनी बंडखोरी केली आहे, त्यांनी जर उमेदवारी अर्ज मागे घेतला तर त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे.तसेच शेकापच्या जयंत पाटील यांच्याशीही चर्चा झाली असून ठरलेल्या मतदारसंघात दोन्ही पक्षाच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्याचे आदेश दिले…
जळगाव : प्रतिनिधी रस्त्याने जात असताना धक्का लागल्याच्या कारणावरून सतीश भीमा गवळी (५५, रा. प्रजापतनगर) व त्यांचे भाऊ अशोक भीमा गवळी यांना पाच जणांनी लाकडी काठी व लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना २ नोव्हेंबर रोजी बळीराम पेठेत घडली. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सतीश गवळी हे रस्त्याने जात असताना एकाला धक्का लागला. त्यावरून वाद झाला व पाच जणांनी दोघा भावांना लाकडी काठी आणि लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर दुखापत केली. दोघांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सतीश गवळी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्यांविरुद्ध…
अमळनेर : प्रतिनिधी जळोद-अमळगाव रस्त्यावरील खूनप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली असून, आणखी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे, तर एक जण अद्याप फरार आहे. मयत विकास पाटील यांचा भाऊ विठ्ठल प्रवीण पाटील याच्या फिर्यादीत म्हटले आहे की, तो दि. २ रोजी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास मोटारसायकलने पिंगळवाडे (ता. अमळनेर) येथे यात्रेसाठी जात होता. गांधली गावाच्या स्मशानभूमीजवळ त्याला गर्दी दिसली. त्याने थांबून चौकशी केली असता, त्याचाच भाऊ व भावाचा मित्र अजित यांचा स्विफ्ट कार (एम.एच. १९ बीजे ४७९१) मधील लोकांशी वाद सुरू होता. कारने धडक दिल्याने विकास याच्या मोटारसायकलचे इंडिकेटर तुटले होते. यातून कारमधील सहा जण वाद घालत होते. त्यांची…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील विवरे येथे वीटभट्टीवर काम करून उदरनिर्वाह करणाऱ्या पती- पत्नीने दि. ३ रोजी दुपारी १:३० वाजता गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अनिल देवीदास हरणकार (३८) आणि शीतल अनिल हरणकार (३२) अशी मयतांची नावे आहेत. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, असा परिवार आहे. सपोनि हरिदास बोचरे यांनी घटनास्थळी पाहणी केली. याप्रकरणी घनश्याम हरणकार यांनी फिर्याद दिली. यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे. या दोघांनी आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
जळगाव : प्रतिनिधी लक्ष्मीपूजनादरम्यान देव्हाऱ्यात पूजेसाठी ठेवलेले १५ तोळे सोन्याचे दागिने व चांदीच्या काही वस्तू घर उघडे असल्याची संधी साधत चोरट्याने चोरून नेल्या. अॅड. प्रताप भीमराव निकम (५९, रा. गजानन कॉलनी) यांच्या घरात शनिवारी (२ नोव्हेंबर) सकाळी आठ वाजता चोरीची ही घटना घडली. भर दिवसा घडलेल्या या चोरीच्या घटनेने निकम कुटुंबीयांसह परिसरातील नागरिक धास्तावले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गजानन कॉलनीमधील अॅड. प्रताप निकम यांनी लक्ष्मीपूजनानिमित्त सोने-चांदीचे दागिने देव्हाऱ्यासमोर पूजेसाठी ठेवले होते. पूजा झाल्यानंतर रात्रभर हे दागिने तेथेच होते. शनिवारी (२ नोव्हेंबर) सकाळी ८ वाजता अॅड. निकम हे घरासमोरील मंदिरात दर्शनासाठी गेले होते तर त्यांच्या पत्नी घरामध्ये कामात व्यस्त होत्या. त्यावेळी त्यांच्या…
जळगाव : प्रतिनिधी आई-वडील शेतात काम करीत असताना झाडाला बांधलेल्या झोक्यातून सुमिना आमाश्या पावरा (२ वर्षे, रा. देवगाव, ता. जळगाव) या दोन वर्षांच्या चिमुकलीला अज्ञाताने उचलून नेले. हा धक्कादायक प्रकार रविवारी (३ नोव्हेंबर) देवगाव शिवारातील शेतात घडला. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील झेंडे अंजन (ता. शिरपूर) येथील दाम्पत्य जळगाव तालुक्यातील देवगाव येथील शिवारातील एका शेतात सालदार म्हणून कामाला आहे. रविवारी दुपारी या दाम्पत्याने शेतात एका झाडाला झोका बांधून त्यात दोन वर्षीय सुमिना या चिमुकलीला झोपविले होते. मुलीची आई शेतात काम करीत असताना व वडील मालकासोबत गेलेले असताना अज्ञात व्यक्तीने झोक्यातून चिमुकलीला…

