Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » कर्जाच्या नैराश्येतून तरुण शेतकऱ्याने आयुष्य संपविले !
    क्राईम

    कर्जाच्या नैराश्येतून तरुण शेतकऱ्याने आयुष्य संपविले !

    editor deskBy editor deskOctober 6, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर : प्रतिनिधी

    तालुक्यातील पहूर येथे कर्जाच्या नैराश्येतून तरुण शेतकऱ्याने स्वतःच्याच शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना लॉध्री बुद्रुक येथे शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. जीवन ज्ञानेश्वर भागवत (वय३८) असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, भागवत हे शुक्रवारी संध्याकाळी घरातून बेपत्ता होते. नातेवाईकांनी शोधाशोध केली असता रात्री स्वतःच्या शेतात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळून आला. जीवन यांच्यावर खासगी व बँकेचे सत्तर ते ऐंशी हजाराचे कर्ज असल्याचे नातेवाइकांनी सांगितले. त्याचे व्याज वाढल्याने ते विवंचनेत होते. या नैराश्यातून आत्महत्या केली असल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सचिन सानप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    बदलापूर पुन्हा हादरले : ४ वर्षांच्या चिमुकलीवर स्कूल व्हॅन चालकाने केला अत्याचार !

    January 23, 2026

    राजीव गांधी नगरात तरुणावर दगडाने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा

    January 23, 2026

    डोक्यावर वार, तरुणाचा जागीच मृत्यू; आव्हाणेतील घटनेने परिसरात दहशत !

    January 23, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.