Author: editor desk

मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरात २० डिसेंबर रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर प्रवर्तन चौकातील एका व्यावसायिकावर चाकूहल्ला केल्याप्रकरणी पाच आरोपींना भुसावळ येथून अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास दुकान बंद करताना रवींद्र रमेश खेवलकर त्यांचे वडील रमेश देवचंद खेवलकर आणि भाऊ मंगेश रमेश खेवलकर यांच्यावर चाकूहल्ला करत हातातील रोकडची पिशवी घेऊन आरोपी फरार झाले होते. दरम्यान याप्रसंगी गोळीबार केल्याची देखील माहिती निष्पन्न झाली आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा व मुक्ताईनगर पोलिस यांच्या संयुक्त तपासात भुसावळ येथील आरोपी निष्पन्न झाले आहेत. ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी एक आरोपी अज्ञान असल्याची माहिती आहे. यासंदर्भात वरिष्ठ पोलिस अधिकारी तपशील विस्तृतपणे…

Read More

रावेर  : प्रतिनिधी शहरातील दोन मित्रांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी फैजपूर येथील ढाब्यावर गेलेल्या सहा मित्रांच्या कारला पिंपरूड- सावदा महामार्गावर गुरुवारी रात्री अपघात होऊन तीन मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेला चौथा मित्र तथा शहरातील फोटोग्राफर गणेश संतोष भोई (२७, रा. नेमाडे प्लॉट, रावेर) याचा रविवारी दुपारी जळगाव येथील एका खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरू असताना मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील महात्मा गांधी चौकातील रहिवासी मुकेश किशोर रायपूरकर व अक्षय उन्हाळे या मित्रांच्या वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्र शुभम दशरथ सोनार, जयेश केशव भोई, विनय विजय जाधव व सिनेमॅटिक फोटोग्राफर गणेश संतोष भोई हे सहा जण शुभम दशरथ सोनार याच्या…

Read More

मेष राशी कामात लक्ष गुंतेल, नियमित यश मिळेल. दक्षता आणि सातत्य राहील. व्यवसायाच्या क्षेत्रात प्रभाव राहील. कामात सावध राहा. मेहनत करा आणि शिस्त राखा. बजेटवर लक्ष केंद्रित करून हुशारीने खर्च करा. कर्जाचे व्यवहार टाळा. चांगले प्रस्ताव प्राप्त मिळतील. कामात संमिश्र परिस्थिती असू शकते. संयमाने पुढे जात राहा. वृषभ राशी दिखाऊपणा आणि फसवणूक टाळा. आपल्या प्रियजनांसाठी वेळ काढा. नात्यात सावध राहा. मित्रांची मदत होईल. प्रियजनांचा सहवास तुम्हाला प्रत्येक कामात उत्साही ठेवेल. तुम्हाला तुमचे आवडते काम करण्याची संधी मिळेल. मिथुन राशी हट्टीपणा आणि अहंकार सोडून काम करण्याची सवय सोडून द्या. भावांचे सहकार्य राहील. सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. वाहने व इतर सुविधांमध्ये वाढ होईल.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जागेवरील बांधकामाच्या वादावरुन चौघांकडून महिलेच्या भावाला मारहाण केली जात होती. दरम्यान, महिला भावाला त्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी पुढे सरसावल्या. याचवेळी मारहाण करणाऱ्यांनी महिलेसोबत अश्लिल वर्तन करीत त्यांचा विनयभंग केल्याची घटना घडली दि. २७ जुलै रोजी घडली होती. याप्रकरणी महिलेने न्यायालयात दावा दाखल केल्यानंतर न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार संशयित राजेश सोमा खडके, किशोर सोमा खडके, प्रशांत सोमा खडके, प्रकाश सोमा खडके सर्व रा. विठ्ठलपेठ खडकेवाडा यांच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात असलेल्या खळे प्लॉटवर महिलेकडून कायदेशीररित्या बांधकाम केले जात होते. यावेळी त्या परिसरात राहणाऱ्या चौघांनी बांधकामास अडथळा निर्माण करण्यास सुरुवात केली. महिलेने त्यांना दस्ताऐवज…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी मंगरूळ येथे प्लास्टिक भंगाराच्या दुकानाला शॉर्टसर्किटने आग लागून सुमारे ७ ते ८ लाखांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाचे बंब वेळीच गेल्याने आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. मंगरूळ येथे २० रोजी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसीमध्ये सय्यद मुझफ्फर अली मोहम्मद अली यांच्या प्लास्टिक भंगार साहित्य त्यांच्या शेडच्या बाहेर मोठ्या प्रमाणात ठेवलेले होते. जवळच विद्युत ट्रान्सफार्मर होता आणि तेथून विद्युत तार गेलेली होती. अचानक विद्युत तारा तुटून प्लास्टिक भंगाराला आग लागली प्लाटिकने लगेच पेट घेतल्याने आगीचे प्रमाण वाढले. परिसरात धावपळ सुरू झाली. मुख्याधिकारी तुषार नेरकर यांना कळविताच त्यांनी आगीचे दोन बंब पाठवले. अग्निशमनदल प्रमुख गणेश गोसावी, फारुख शेख, जफर पठाण,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी उसनवारीने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून रोहिदास श्रावण कोळी (३४, रा. कांचननगर) यांना दोन जणांनी शिवीगाळ करत लोखंडी वस्तूने पोटावर वार केला. यात कोळी यांना गंभीर दुखापत झाली असून पुन्हा आल्यास जिवंत जाऊ देणार नाही, अशी धमकीदेखील त्यांना दिली. ही घटना शुक्रवारी (२० डिसेंबर) तालुक्यातील रिधर येथे घडली. मिळालेल्या माहितीनुसार, कांचन नगरातील रोहिदास कोळी यांच्याकडे ट्रॅक्टर असून त्यावर प्रभाकर कोळी हे चालक आहे. चालक कामावर येत नसल्याने त्याविषयी प्रभाकर कोळी हे विचारणा करण्यासाठी गेले असता त्याने येण्यास नकार दिला. त्यावेळी त्याला दिलेले १० हजार ५०० रुपये परत मागितल्याने त्याचा त्याला राग आला व चालकासह भाच्याने रोहिदास कोळी यांना…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दिलेली रक्कम तिप्पट करून देण्याचे आमिष दाखवत ग्रामसेवकाची फसवणूक केल्या प्रकरणात पोलिस उपनिरीक्षकासह दोन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काढले. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन धुमाळ, बॅग घेऊन जाणारा नीलेश अहिरे या दोघांसह उपनिरीक्षक प्रकाश मेढे, पोलिस नाईक योगेश शेळके (मुख्यालय) व पोकॉ दिनेश भोई (फैजपूर) या पोलिसांचा या प्रकरणात समावेश असल्याचे तपासात समोर आले होते. यातील तीनही पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी काढले

Read More

भडगाव : प्रतिनिधी गिरणा नदीपात्रातून अवैध वाळूवाहतूक सुरू असून शुक्रवारी रात्री २ ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर दोन वेगवेगळे गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री १:३० वाजेच्या सुमारास किरण धनराज वाघ (४०, भडगाव) हा ट्रॅक्टरमधून अवैध वाळूची वाहतूक करीत असताना भडगाव शिवारात असलेल्या गिरणा नदीपात्रात आढळून आला. त्याच्याविरुध्द भडगाव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गुन्ह्यात शुक्रवारी मध्यरात्री २:१५ वाजेच्या सुमारास जुना वाक रस्त्याला गिरणा नदीपात्रात पंडित दत्तू पाटील (३७, महादेव गल्ली भडगाव) हा ट्रॅक्टर (एमएच१९/ बीजी०५९७) मध्ये १ ब्रास वाळूची चोरी करताना आढळून आला.

Read More

भुसावळ : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गावरील भुसावळ ते दीपनगर रस्त्यावरील एका ढाब्याजवळ झालेल्या अपघातात एक जण ठार झाला. दरम्यान घटनेच्या चौकशीत बनावट नोटा आढळून आल्याच्या प्रकार दि. १७ रोजी रात्री ११ वाजता समोर आला. याप्रकरणी दि.१९ डिसेंबरला नाशिक येथील तिघांविरुद्ध तालुका पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ ते दीपनगर रस्त्यावरील निर्मल ढाब्याजवळ १७ रोजी रात्री ११:३० वाजता चारचाकी वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने हिरामण कारभारी धात्रक (वय ४६, रा. नाशिक) यांचा मृत्यू झाला होता. तर सोबत असलेले नरेंद्र दत्ता मुळे (वय ५४) आणि विजय देवराम काळे (वय ३२, दोन्ही रा. नाशिक) हे जखमी झाले होते. पोलिस कर्मचारी योगेश पालवे…

Read More

मेष राशी समाजातील प्रतिष्ठित लोकांशी संपर्क वाढेल. आत्मविश्वास वाढेल. उद्योग क्षेत्राशी निगडित लोकांना लाभ आणि प्रगतीची संधी मिळेल. उपजीविकेच्या क्षेत्रात गुंतलेल्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. राजकारणात उच्च पद आणि प्रतिष्ठा वाढेल. वाहन आराम उत्कृष्ट राहील. वृषभ राशी आज, वैयक्तिक कारणांमुळे व्यवसायात अडथळे वाढू शकतात. उत्पन्नाचे अन्य स्रोत शोधण्याचा प्रयत्न करा. मालमत्ता खरेदी-विक्रीमध्ये धावपळ करावी लागेल. याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्या. कष्टकरी लोकांनी अधिक मेहनत केल्यास परिस्थिती सुधारेल. मिथुन राशी आज तुम्हाला प्रवासाला जावं लागू शकतं. समाजात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. नवनवीन प्रयोगांसोबतच परंपराही जपाल. नोकरीत अधीनस्थ सहकारी असतील. एकमेकांसोबत काम करणे फायदेशीर ठरेल. प्रलंबित प्रकरणे सकारात्मक राहतील. इच्छा पूर्ण होऊ…

Read More