• Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 
Live Maharashtra News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक
No Result
View All Result
Live Maharashtra News
No Result
View All Result

धक्कादायक : दरवाजा उघडताच दिसला पत्नी व मुलीचा मृतदेह

editor desk by editor desk
November 25, 2024
in क्राईम, जळगाव
0
धक्कादायक : दरवाजा उघडताच दिसला पत्नी व मुलीचा मृतदेह

जळगाव : प्रतिनिधी

घरी कोणीही नसताना पोटच्या मुलीला गळफास देत सोनाली दीपक दाभाडे (३६, रा. व्यंकटेशनगर) या महिलेने स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवारी दुपारी व्यंकटेशनगरमध्ये घडली. दुपारी महिलेचे पती दीपक दाभाडे हे घरी परतले व दरवाजा उघडताच त्यांना पत्नी व मुलगी तेजस्विनी हे गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसले. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हरिविठ्ठलनगर परिसरातील व्यंकटेशनगरमध्ये दीपक दाभाडे हे तिसऱ्या मजल्यावर राहतात. भुसावळ येथे त्यांच्या नातेवाईकांचे निधन झाल्याने रविवारी सकाळी ते आपल्या दोन भावांसह गेले होते. त्यावेळी घरी दीपक यांच्या पत्नी सोनाली व मुलगी तेजस्विनी होती. घरात कोणीही नसताना सोनाली यांनी आठ वर्षीय मुलीला छताच्या पंख्याला दोरीने गळफास दिला व स्वतःदेखील दुसऱ्या दोरीने गळफास घेतला.

लग्नानंतर काही वर्ष अपत्य होत नसल्याने दीपक यांनी मोठे भाऊ जितेंद्र यांची मुलगी काव्या हिला दत्तक घेतले होते. त्यानंतर दीपक व सोनाली या दाम्पत्याला मुलगी झाली. रविवारी ही घटना घडली त्यावेळी काव्या खालच्या मजल्यावर खेळत होती. पत्नी व मुलीने गळफास घेतल्याचा मोठा धक्का दीपक यांना बसला व त्यांचा रक्तदाब कमी झाला होता.

दाभाडे दाम्पत्यामध्ये कोणताही वादविवाद नव्हता, असे त्यांच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने सांगितले. काही दिवसांपूर्वीच ते खुलताबाद, वेरूळ, शनि शिंगणापूर या ठिकाणी देवदर्शन करून परतले. त्यानंतरही दैनंदिन कामे नित्यनियमाने सुरू होते. कोणताही वाद नसताना या महिलेने पोटच्या गोळ्यासह आत्महत्या का केली, या विषयी सर्वांना प्रश्न पडला आहे. सोनाली यांना मानेचा व छाती दुखीचा त्रास होता, असे त्यांचे दीर संदीप दाभाडे यांनी सांगितले.

Previous Post

अल्पवयीन मुलीवर वृद्धाने केला अत्याचार

Next Post

जरांगे पाटलांचे मोठे वक्तव्य : ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले पण…

Next Post
जरांगे पाटलांचे मोठे वक्तव्य : ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले पण…

जरांगे पाटलांचे मोठे वक्तव्य : ज्याला पाडायचे आहे त्याला पाडले पण...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ते आले दरोडा टाकण्याच्या तयारीत अन पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

जळगावात चारचाकीचा थरार : अनेक वाहनासह महिलेला दिली जबर धडक !

June 20, 2025
नकली नोटा चलनात आणणाऱ्या दोघांना अटक
क्राईम

जळगावात शालकाने केली मेहुण्याची तब्बल तीन कोटींत फसवणूक !

June 20, 2025
बाप, काका व दोन भावांनी १३ वर्षीय मुलीसोबत केले घाणेरडे कृत्य !
क्राईम

भुसावळात विवाहितेचा छळ; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

June 20, 2025
खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !
क्राईम

खान्देशात भरधाव बसला ट्रकची धडक : ९ प्रवासी गंभीर जखमी !

June 20, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन
Uncategorized

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आज जळगाव जिल्हा दौरा : विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन

June 20, 2025
या राशीतील व्यक्तीची व्यवसायात प्रगती होणार !
राशीभविष्य

प्रशासकीय क्षेत्रात पदोन्नती मिळण्याची शक्यता

June 20, 2025
  • Home
  • नाशिक मधे रस्त्यावर गाडी चालवने ठरते तारेवरची कसरत 

© 2021

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • क्राईम
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • सामाजिक

© 2021

WhatsApp Group