पुणे : वृत्तसंस्था राज्यात आपल्या तूफान नृत्याने आणि अदांनी सर्वांना भुरळ पाडणारी, प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिचं नाव सर्वांनाच परिचित आहे. तिच्या कार्यक्रमांप्रमाणेच ती आता चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावरही झळकणार आहे. पण या सगळ्या झगमगत्या विश्वापासून दूर, स्वत:चं एक वेगळं ( कल्पनेचं) जग निर्माण करता येतं, अशा पुस्तकांच्या जगात आज तिने प्रवेश केला. पुण्यामध्ये सध्या ‘पुणे बूक फेस्टिव्हल’ सुरू असून त्याला फक्त पुणेकरांचाच नव्हे तर इतर शहरातील वाचकांचाही भरभरून प्रतिसाद मिळताना दिसत आहे. पुण्यातील वाचकांसह इतर शहरातील वाचकही या बूक फेस्टिव्हलला भेट देण्यासाठी आवर्जून गर्दी करताना दिसत असून सोशल मीडियावरही याचा बराच बोलबला आहे. याच बूक फेस्टिव्हलला चक्क प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी पहूर नाशिक महामार्गावर दुभाजकावर ट्रक आदळून उलटला. या अपघातात चालक थोडक्यात बचावला. ही घटना शुक्रवारी पहाटे घडली. दिशा दर्शविणारे फलक नसल्याने दुभाजक अपघातांना निमंत्रण देणारा ठरत आहे. या ठिकाणी किरकोळ अपघात होत आहेत. तातडीने फलक लावण्याची मागणी होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पहूर ते नाशिक महामार्ग हा पहूर गावातून जातो. पहूर ग्रामीण रुग्णालय ते संगमेश्वर महादेव मंदिर दरम्यान दुभाजक टाकण्यात आला आहे. संगमेश्वर महादेव मंदिराजवळ हा दुभाजक संपत असून याला दिशादर्शक असणारे फलक लावण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यामुळे हा दुभाजक लक्षात येत नाही. शुक्रवारी पहाटे (एम. एच. २८ बी.बी. ५९९२) क्रमांकाचा कापसाचा ट्रक चाळीसगाव येथून मलकापूर येथे जात…
जळगाव : प्रतिनिधी नूतन मराठा महाविद्यालयासमोरील शोलिनो बिल्डकॉन प्रा. लि. या कंपनीच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्याने रोकडसह ६८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नूतन मराठा महाविद्यालयासमोर शोलिनो बिल्डकॉन प्रा. लि. च्या नावाने दुकान आहे. याचे कार्यालय बंद असताना अज्ञात चोरट्याने कार्यालयाचे शटर व दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. तेथून रोख ५८ हजार ५०० रुपये, कॉम्प्युटर सेट, सीसीटीव्हीचा डीव्हीआर सेट असा एकूण ६८ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार १९ डिसेंबर…
जळगाव : प्रतिनिधी साखरपुड्यासाठी जात असलेल्या दाम्पत्याच्या दुचाकीला भरधाव ट्रकने धडक दिल्यामुळे वंदना अशोक गोराडे (वय ४९, रा. राणीचे बांबरुड, ता. पाचोरा) या महिलेचा जागीच मृत्यू झाला, ट्रकच्या चाकाखाली आल्याने या महिलेच्या डोक्याचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात महिलेचे पती अशोक सुखदेव गोराडे (६०) हे गंभीर जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी (२० डिसेंबर) सकाळी सव्वादहा वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर उड्डाणपुलावर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील राणीचे बांबरूड येथील अशोक गोराडे यांच्या वाहनचालकाच्या मुलाचा शुक्रवारी चांदसर येथे साखरपुडा होता. त्यासाठी गौराडे हे पत्नी वंदना गोराडे यांच्यासह दुचाकीने (एमएच १९ डीजे ४७९६) तेथे जात होते. शुक्रवारी सकाळी १०:१५ वाजण्याच्या सुमारास टॉवर चौकाकडून शिवाजीनगर…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील प्रवर्तन चौकात असलेल्या गल्लीत एका व्यावसायिकावर रात्री दुकान बंद करत असताना अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने वार करत जखमी केल्याची घटना दि. १९ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. या हल्ल्यात दोन्ही मुलेही जखमी झाले. तिघांपैकी एकाची प्रकृती अधिक गंभीर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, प्रवर्तन चौकात मंगेश रमेश खेवलकर यांचे दुकान आहे. १९ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास मंगेश व त्याचा भाऊ रवींद्र आणि वडील रमेश देवचंद खेवलकर हे दुकान बंद करून घराकडे जाण्याच्या तयारीत असतानाच दोघा अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर चाकू हल्ला केला. या हल्ल्यात पिता व दोघे पुत्र गंभीर जखमी झाले. मंगेश खेवलकर यांची प्रकृती याची प्रकृती अधिक…
फैजपूर : प्रतिनिधी मोलमजुरी व शेतीचे कामे करून आपला उदरनिर्वाह चालवणाऱ्या दोन आदिवासी महिलांनी दोन दिवसांत आपली जीवन यात्रा संपविण्याची घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, १९ रोजी गीता प्रकाश बारेला (३८) या महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली तर २० रोजी शुक्रवारी रंगुबाई प्रकाश भिलाला (२०) या महिलेने विषारी द्रव प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. या दोन्ही घटनांप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. फैजपूर येथील यावल रस्त्यावर असलेल्या एका गॅरेजच्या मागे झोपडीत आपल्या कुटुंबासह राहणाऱ्या गीता प्रकाश बारेला या महिलेने गुरुवारी झोपडीतच गळफास घेऊन आत्महत्या केली या महिलेला यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता डॉक्टरांनी तिला…
सावदा : प्रतिनिधी भरधाव चारचाकी झाडावर आदळून झालेल्या अपघातात तीन तरुण ठार तर तीनजण जखमी झाले. ही भीषण घटना पिंपरूड ते सावदा (ता. रावेर) मार्गावर गुरुवारी रात्री १२:३० ते १ वाजेच्या सुमारास घडली. धडक इतकी जोरात होती की कारचे चार तुकडे होऊन अक्षरशः चुराडा झाला आहे. शुभम सोनार (२१), मुकेश रायपूरकर (२६) आणि जयेश भोई (२०) अशी या अपघातातील मृतांची तर विजय जाधव, गणेश भोई व अक्षय उन्हाळे अशी जखमींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मित्राचा वाढदिवस साजरा करून वरील सहाही जण एका कारने भुसावळहून रावेरकडे येत होते. पिंपरूड-सावदा मार्गावर त्यांच्या कारने एका निंबाच्या झाडाला जोरदार धडक दिली. यात दोनजण जागीच…
धरणगाव : प्रतिनिधी चांदसर येथे वाळू माफियांनी महसूलच्या पथकावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी आणखी एकास अटक करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणात अटक झालेल्यांची संख्या आता चार झाली आहे. दरम्यान, यापूर्वी गणेश विसर्जनाच्या दिवशी चांदसर येथील कोतवालाशी वाळूच्या विषयावरून वाद घातल्याने या संशयितांवर त्या वेळीही गुन्हे दाखल झाले होते. महसूल कर्मचाऱ्यांवर हल्लाप्रकरणी पाळधी पोलिसांनी गुरुवारी आबा ईश्वर कोळी (३०), योगेश ईश्वर कोळी (२८) आणि गणेश सोमा कोळी (३५) यांना अटक केली होती, तर रात्री दिनेश सोमा कोळी यास अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे गिरणा नदी पात्रामध्ये अवैध वाळू उपसा आणि वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूलच्या पथकावर १४ ते १५ जणांनी हल्ला…
मेष राशी आज सभी से घुलमिलकर कार्य व्यापार को आगे बढ़ाएंगे. बौद्धिक चेतना के विकास में तेजी आएगी. सहयोगियों के साथ अधिक तालमेल बनाने की आवश्यकता रहेगी. व्यवसाय के क्षेत्र में कार्यरत लोगों के व्यापार में लाभ के संकेत प्राप्त होंगे. कार्यक्षेत्र में परिस्थितियां कुछ अनुकूल रहेगी. छोटी-छोटी यात्राओं के अधिक योग बनेंगे. वृषभ राशी आज तुमच्या भावना व्यक्त करण्यात घाई करू नका. प्रत्येकाच्या भावनांचा आदर ठेवा. कौटुंबिक बाबींमध्ये निवांतपणे पुढे जा. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीत प्रगती होईल. नवीन मित्रांसोबत पर्यटनस्थळी आनंद लुटाल. मिथुन राशी आज प्रिय व्यक्तीच्या आगमनाने आजूबाजूच्या वातावरणात आनंद पसरेल. जवळच्या मित्राची भेट होईल. विद्यार्थ्यांची अभ्यासात…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यात महायुतीने सरकार स्थापन केले असून या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे नाराज आहेत. त्यामुळे ते पक्ष सोडतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, छगन भुजबळ यांची पक्ष सोडण्याची हिंमत नाही. त्यांनी पक्ष सोडून दाखवावा, असे आव्हान आमदार सुहास कांदे यांनी दिले आहे. सुहास कांदे यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळ स्थान न देऊन अजित पवार यांनी नाशिक जिल्ह्याला न्याय दिला असल्याचे सुहास कांदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना सांगितले. नाशिक जिल्ह्यामध्ये छगन भुजबळ विरुद्ध सुहास कांदे असा वाद विधानसभा निवडणुकीदरम्यान देखील पाहायला मिळाला होता.…

