आजचे राशिभविष्य दि.२२ एप्रिल २०२६ मेष राशी व्यावसायिक व्यवहारांबाबत सावधगिरी बाळगा आणि आधी प्रत्येक गोष्टीची कसून तपासणी करा. या राशीच्या ज्या महिलांना व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यांना त्यांच्या कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. त्या आपल्या शब्दांनी कोणाच्याही भावना दुखावणार नाहीत याची विशेष काळजी घेतील. जर तुम्हाला एखादी गोष्ट त्रासदायक वाटत असेल, तर त्याबद्दल तुमच्या मित्रांशी बोला आणि तुम्हाला एक चांगला उपाय सापडेल. वृषभ राशी वर्क फ्रॉम होम करत आहेत ते आज आपली उरलेली कामं पूर्ण करतील आणि नवीन टार्गेट गाठतील. घाऊक व्यवसायात असलेल्यांना आज नफ्यात वाढ दिसेल. चित्रपटसृष्टीत असलेल्यांना चांगली नोकरीची संधी मिळू शकते. आज आरोग्याच्या समस्यांचे निराकरण झाल्यामुळे तुम्ही उत्साही…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते व विभागीय प्रसिद्धीप्रमुख यांची घोषणा झाली असून नाशिक येथून प्रवक्ते पदी लक्ष्मण सावजी ,अजित चव्हाण तर उत्तर महाराष्ट्र माध्यम विभाग प्रमुख गोविंद बोरसे यांची सलग तिसऱ्यांदा फेर निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण, कुंभमेळा मंत्री नामदार गिरीशजी महाजन, प्रदेश उपाध्यक्ष केशवजी उपाध्ये, प्रदेश उपाध्यक्ष भारती पवार, नामदार जयकुमार रावल, नामदार राधाकृष्ण विखे पाटील , प्रदेश कार्यालय प्रभारी रवीजी, अनासपुरे, विजय चौधरी, माधवजी भंडारी, मुख्य प्रदेश प्रवक्ते नवनाथजी बन, प्रदेश माध्यम विभाग प्रमुख गोविंदराव येतेयेकर, सह माध्यम विभाग प्रमुख ओमप्रकाश चव्हाण, नाशिक महानगर जिल्हा अध्यक्ष…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा शाळेच्या परिसरात विनयभंग केल्याप्रकरणी एका विरोधात जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर शहरातील एका शाळेच्या परिसरात दिनांक 30 मार्च रोजी १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी पेपर देण्यासाठी आली असता या ठिकाणी 38 वर्षीय नितीन नामक व्यक्तीने त्या मुलीचा पाठलाग करत तू कोणाबरोबर बोलायचे नाही तू फक्त माझी आहे, असे म्हणून तीस जवळ ओढून घेऊन तिच्या मनात लज्जा निर्माण होईल. असे कृत्य केल्याप्रकरणी संशयित आरोपी विरोधात जामनेर पोलीस स्थानकात अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार संशयित आरोपी विरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव : प्रतिनिधी चोपडा शहरात घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत छडा लावत दोन आरोपींना अटक केल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे. दि. १९ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९.०० ते दि. २० एप्रिल २०२६ रोजी सकाळी ८.३० वाजेदरम्यान चोपडा-धरणगाव रोडवरील पाटचारी परिसरात ही घटना घडली. फिर्यादीचा मुलगा प्रदीप राजेंद्र महाजन (वय ३३, रा. तारामती नगर, चोपडा) याचा अज्ञात हत्याराने चेहरा व डोके ठेचून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात CCTNS नं. १५२/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान चेतन सुभाष कानडे…
लातूर : वृत्तसंस्था राज्यातील लातूर जिल्ह्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली असून खरोसा येथे एका विवाहित महिलेने कौटुंबिक वादातून आपल्या दोन लहान मुलांसह विहिरीत उडी घेऊन जीवनयात्रा संपवली आहे. या भीषण आणि खळबळजनक घटनांमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला असून, खरोसा येथील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पुढील तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे कौटुंबिक वादातून एक अत्यंत मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. निकिता अमरदीप भूरे (वय 25) या विवाहित महिलेने पतीसोबत झालेल्या टोकाच्या वादातून आपली दोन लहान मुले, शिवानी आणि शिवांश यांच्यासह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. प्राथमिक माहितीनुसार, रविवारी संध्याकाळपासून…
जळगाव : प्रतिनिधी राज्याच्या गृह विभागाने पोलीस प्रशासनात मोठे फेरबदल केले असून, जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता जळगाव जिल्ह्याची कमान श्रीकांत धिवरे सांभाळणार आहेत. डॉ. महेश्वर रेड्डी यांची पुणे येथील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षांच्या कार्यकाळात डॉ. रेड्डी यांनी जळगाव पोलीस दलासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि हिताचे निर्णय घेतले. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयातील गुन्हेगारीवर मोठा अंकुश मिळवण्यात पोलिसांना यश आले होते. विशेषतः जिल्ह्यातील क्लिष्ट खून प्रकरणे आणि गंभीर गुन्ह्यांमधील आरोपींना जेरबंद करण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या शिस्तबद्ध कार्यपद्धतीमुळे पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोबल…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव येथून यावल रस्त्यावरील हॉटेल मन मंदिरसमोर दुचाकीद्वारे यावलकडे जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कुझरने भरधाव वेगाने मागाहून धडक दिली होती. या अपघातात ३८ वर्षीय पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. तर, उपचारादरम्यान त्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सोमवारी पहाटेपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यावर विदगाव येथे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत शासकिय इतमामात अंतसंस्कार करण्यात आलेत. या अपघातप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार भरत विठ्ठल कोळी (वय ३८) हे ९ एप्रिलला विदगाव येथून किनगाव मार्गे दुचाकी (एमएच १९, सीजी- २८१३) ने येत होते. दरम्यान, अंकलेश्वर ते ब-हाणपूर महामार्गावरील किनगाव जवळील हॉटेल मनमंदिर समोर…
चोपडा : प्रतिनिधी शहरातील नारायणवाडी परिसरातील धरणगाव नाक्याजवळ सोमवारी सकाळी 45 वर्षीय व्यक्तीचा रक्तबंबाळ अवस्थेतील मृतदेह आढळून आला. मृताचा गळा कापून त्याची हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, मृताच्या खिशात मिळालेल्या एका लग्नपत्रिकेवरून पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, सदर मृतदेह तारामती नगर येथील रहिवासी प्रदीप राजू माळी यांचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. याबाबत प्राप्त माहिती अशी की, सोमवारी सकाळी शहरातील धरणगाव नाक्याजवळ एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह दिसल्याची बातमी पोलिसांना मिळाली. या नंतर क्षणाचाही विलंब ना करता पोलिसांनी तातडीने धाव घेत घटनास्थळी दाखल झाले, तर मृताच्या गळ्यावर वार केल्याचे दिसून आले. सुरुवातीला…
जळगाव : प्रतिनिधी मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या शेख इस्माईल शेख असगर (२५, रा. अक्सानगर) या तरुणाच्या कपाळावर तलवारीने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली. अन्य दोन जणांनी मारहाण केली. ही घटना १८ एप्रिल रोजी अक्सानगरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दि. १९ रोजी, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत. अक्सानगरातील रहिवासी शेख ईस्माईल यांच्या मित्राशी काही जणांचे भांडण सुरू होते. ते सोडविण्यासाठी शेख ईस्माईल गेले असता शहाबाज ऊर्फ नगिना याने त्यांच्या कपाळावर तलवारीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तौसिफ पाशा ऊर्फ बिहारी व उजेर पिरजादा या दोघांनी मारहाण केली व…
भुसावळ : प्रतिनिधी सोशल मीडियावरील बनावट ओळख, परदेशातून पार्सल व डॉलरची लालूच, तसेच एफबीआय, अमेरिकन सैन्य आणि भारतीय कस्टम विभागाची भीती दाखवत भुसावळ एमआयडीसीतील एका कामगाराकडून तब्बल ३ लाख ४७ हजार रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील एका कंपनी मशीन ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेले चंदन मुन्ना मौर्य (वय ३४) हे या फसवणुकीचे बळी ठरले आहेत. दि. ८ जून २०२४ रोजी टेलर नावाच्या फेसबुक पेजवरून मौर्य यांच्याशी संपर्क साधण्यात आला. काही दिवस संवाद साधून विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर मियामी (अमेरिका) येथून पार्सल पाठवले आहे. असे सांगून डिलिव्हरी चार्जेसच्या नावाखाली पैसे…

