Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धक्कादायक : मास्टर कॉलनी तरुणाने संपविले आयुष्य !
    क्राईम

    धक्कादायक : मास्टर कॉलनी तरुणाने संपविले आयुष्य !

    editor deskBy editor deskApril 18, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील मास्टर कॉलनी परिसरात एका २८ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी, १६ एप्रिल रोजी दुपारी उघडकीस आली. शेख नयुम शेख मसुरोद्दीन असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

    मिळालेल्या माहितीनुसार,  शेख नयुम हा तरुण हातमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. घटनेच्या दिवशी तो आपल्या घरातील एका खोलीत झोपलेला होता. सकाळी ११:५५ वाजेच्या सुमारास तो बराच वेळ बाहेर न आल्याने, त्याचा भाऊ त्याला उठवण्यासाठी खोलीत गेला. यावेळी नयुमने छताला गळफास घेतल्याचे दिसून आले. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. कुटुंबीयांनी तातडीने नयुमला खाली उतरवून उपचारासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणीअंती त्याला मयत घोषित केले.

    या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नयुमच्या पश्चात पत्नी, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे. पुढील तपास पोलीस नाईक संजीव मोरे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    बिबानगरात ‘रोमिओ’चा हैदोस : विद्यार्थिनीचा छळ, घरावर दगडफेक

    April 18, 2026

    घरपोच जाऊन २५ लाख उकळले : सायबर फसवणुकीत जळगावातील चौघे अटकेत

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.