Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » बिबानगरात ‘रोमिओ’चा हैदोस : विद्यार्थिनीचा छळ, घरावर दगडफेक
    क्राईम

    बिबानगरात ‘रोमिओ’चा हैदोस : विद्यार्थिनीचा छळ, घरावर दगडफेक

    editor deskBy editor deskApril 18, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    शहरातील बिबानगर परिसरात एका युवकाने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थीनीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराबाबत युवकाला समज देण्यास गेलेल्या मुलीच्या पालकांनाच त्याने जीवे मारण्याची धमकी दिली असून, १६ एप्रिल रोजी थेट युवतीच्या घरावर दगडफेक करत खिडकीच्या काचा फोडून दहशत निर्माण केली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात संशयित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    संबंधित युवक पीडित विद्यार्थीनी शाळेतून घरी जात असताना सतत तिचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. याच त्रासातून त्याने तिला आपल्या प्रेमात ओढले. काही दिवसांपूर्वी तो युवतीला दुचाकीवर बाहेर फिरायला घेऊन गेला, तिथे त्याने तिची छेड काढत बळजबरीने विनयभंग केला. हा सर्व प्रकार जेव्हा मुलीच्या आई-वडिलांना समजला, तेव्हा त्यांनी युवकाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, सुधारण्याऐवजी त्याने पालकांनाच धमकावण्यास सुरुवात केली.

    संशयित युवकाची मजल इतकी वाढली की, तो अनेक दिवस युवतीच्या घराबाहेर घिरट्या घालत होता. त्याने घरासमोर चिठ्ठी लिहून टाकली. एवढेच नव्हे तर, युवतीच्या आईला फोन करून त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देखील दिली. गुरुवारी, १६ एप्रिल रोजी या प्रकरणाने टोक गाठले. संशयित युवकाने पुन्हा युवतीच्या घराजवळ येऊन घराच्या दिशेने दगडफेक केली. या दगडफेकीत घराच्या खिडकीच्या काचा फुटून नुकसान झाले आहे. वाढत्या त्रासाला कंटाळून अखेर पीडित युवतीने जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. या तक्रारीवरून बिबानगरमधील संबंधित युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शामकुमार मोरे करत आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    राज्यात उष्णतेचा कहर, अवकाळी पावसाचा तडाखा : दुहेरी संकटात शेतकरी-नागरिक हैराण

    April 18, 2026

    धक्कादायक : मास्टर कॉलनी तरुणाने संपविले आयुष्य !

    April 18, 2026

    घरपोच जाऊन २५ लाख उकळले : सायबर फसवणुकीत जळगावातील चौघे अटकेत

    April 18, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.