Author: editor desk

नंदूरबार : वृत्तसंस्था खान्देशातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना उघडकीस येत असतांना नुकतेच चेन्नई-जाेधपूर एक्स्प्रेसमध्ये प्रवासादरम्यान जागेच्या वादातून राजस्थानमधील रहिवासी असलेल्या दोघांवर चाकूहल्ला करण्यात आला होता. या घटनेत एका प्रवाशाचा मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेनंतर सोमवारी येथील जिल्हा रुग्णालयात समाजबांधवांनी आक्रमक होत जोपर्यंत मारेकऱ्यांना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा घेतला. रात्री उशिरापर्यंत मृतदेह जिल्हा रुग्णालयातच पडून होता. सविस्तर वृत्त असे कि, चेन्नईहून जोधपूरकडे प्रवास करत असताना बसण्याच्या जागेवरून वाद झाल्याने सुमेरसिंग जबरसिंग व सहकारी प्रवासी प्रबंतसिंग डोंगरसिंग परिहार (दोघे रा. बाकेसर, जि. जोधपूर, राजस्थान) या दोघांना येथील रेल्वेस्थानकावर सात ते आठ जणांच्या जमावाने मारहाण केली.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी दुचाकीवर जात असताना अपघात होऊन गंभीर दुखापत झाल्याने संजय पुंडलिक नारखेडे (५५, मूळ रा. ममुराबाद, ह.मु. एमआयडीसी परिसर) हे ठार झाले तर त्यांच्या पत्नी ज्योत्स्ना संजय नारखेडे (४१) या गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात सोमवारी (३ फेब्रुवारी) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास रेमंड चौकात झाला. सविस्तर वृत्त असे कि, मुमराबाद येथील मूळ रहिवासी संजय व ज्योत्स्ना नारखेडे हे दाम्पत्य एमआयडीसी परिसरातील एका कंपनीमध्ये कामाला आहे. सोमवारी रात्री ते लग्न सोहळ्यावरून परत येत असताना रेमंड चौकात अपघात झाला. घटनेनंतर दोघांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे संजय नारखेडे यांना मयत घोषित करण्यात आले तर त्यांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भुसावळकडून येणारी भरधाव कार नियंत्रित न झाल्याने ती थेट आकाशवाणी चौकातील सर्कलमध्ये घुसली. यामुळे सर्कलचे मोठे नुकसान होण्यासह वाहतूक सिग्नलही कोसळला. शिवाय कारचेही मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कारमधील दोघांना कोणतीही दुखापत झाली नाही. ही घटना सोमवारी (३ फेब्रुवारी) पहाटे तीन वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या प्रकरणी जंडू कन्स्ट्रक्शनच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना केवळ घटनेविषयी पत्राद्वारे कळविले असून कोणतीही फिर्याद दिलेली नाही. सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ येथील दीपक कृष्णा सोनार (३४) व त्यांचे मित्र सुरजसिंग दिनेशसिंग राजपूत (२९, सुरत) हे कारने (क्र. एमएच १९, डीवाय ८८५९) जळगावकडे येत होते. आकाशवाणी चौकात आल्यानंतर ही भरधाव कार थेट सर्कलमध्ये चढली.…

Read More

एरंडोल : प्रतिनिधी तालुक्यातील कढोली येथील व्यापारी गणेश बंडू बडगुजर (६२) सोमवारी सायंकाळी यांनी साडेसात वाजेच्या सुमारास काशिनाथ पलोड शाळेजवळ रेल्वेखाली आत्महत्या केली. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले. सविस्तर वृत्त असे कि, व्यापारी गणेश बडगुजर गावासह परिसरातील शेतकऱ्यांकडून गहू, मका, ज्वारी, सोयाबीन, कपाशी, तूर अशी धान्य घेऊन ते धुळे येथील व्यापाऱ्याला देत होते. त्यांच्यावर लाखोचे कर्ज होते. कर्ज कसे फेडायचे या विंवचनेत गेल्या काही दिवसापासून जगत होते. कर्जबाजारीपणामुळे त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, दोन मुले, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.

Read More

मेष : श्रीगणेश म्‍हणतात की, आज ग्रहांची स्थिती तुम्हाला अनेक संधी देईल. आर्थिक गुंतवणूक विचार करत असाल तर ते लगेच करा. आळशीपणामुळे कोणतेही काम टाळण्याचा प्रयत्न करू नका. तुमचे बोलणे मृदू ठेवा. अतिरिक्‍त कामाचा भार असूनही तुम्ही कुटुंबाला प्राधान्य द्याल. वृषभ : श्रीगणेश सांगतात की, आज आर्थिक व्‍यवहारांमध्‍ये यश लाभेल. सकारात्मक विचारांनी सर्व कामे नियोजनानुसार करा. अतिआत्मविश्वास नुकसानकारक ठरेल. घराच्या व्यवस्थेबाबत पती-पत्नीमध्ये वाद होऊ शकतो. मिथुन : श्रीगणेश म्‍हणतात की, आज इतरांचा सल्‍ल्‍ला ऐकण्‍यापेक्षा स्वतःच्‍या मताचा विचार करा. उत्पन्नासोबत खर्चही जास्त होईल. कुटुंबात आणि व्यवसायात कोणत्याही बाहेरील व्यक्तीला हस्तक्षेप करू देऊ नका. अन्‍यथा विनाकारण गैरसमज निर्माण होऊ शकतात.…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी वालिमक कराड गैंगशी संबंध आदी मुद्यावरून अडचणीत आलेले मंत्री धनंजय मुंडे यांची पाठराखण करणे दुर्दैवी आहे. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांनी गुन्हेगारीचे समर्थन करणारी भूमिका मांडली असून, याचा आम्ही निषेध करतो याप्रकरणी नामदेव शास्त्री यांनी त्वरित वारकरी संप्रदायाची माफी मागावी अन्यथा शास्त्री यांच्याविरोधात राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी आध्यामिक व वारकरी आघाडीने पत्रकार परिषदेत दिला, या पत्रकार परिषदेत आघाडीचे राज्यप्रमुख हभप विठ्ठल मोरे, राज्य उपाध्यक्ष मुबारकभाई शेख, राज्य युवा संपर्कप्रमुख हभप सुरज महाराज लवटे, आळंदी शहर अध्यक्ष हभप दत्तात्रेय महाराज साबळे, मुस्लिम संत विभागाचे संपर्कप्रमुख राजूभाई इनामदार…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात मराठा आरक्षणसाठी तीन तरुणांनी आत्महत्या केली होती. यावरून मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना आत्महत्या न करण्याची विनंती केली. न मिळणारे आरक्षण आपल्याला मिळत आहे. मला राज्यात कुणाची नाही, पण तुमची फार गरज आहे. मी तुमच्या पाया पडतो, तुम्ही आत्महत्या करू नका, असे मनोज जरांगे म्हणाले. एका टक्क्यावरून हुकले, तर हुकू द्या. धाडसी बना. एक दोन वर्ष रिपीट करा, पण आपल्या आई-बापापासून लांब जाऊ नका. आपल्या आई-बापाला दुसरा कोणाचा आधार नाही, असेही ते म्हणाले. मनोज जरांगे यांनी सरकारकडेही दोन दिवसांत मार्ग काढण्याची मागणी केली. मराठा आरक्षणावर दोन दिवसांवर मार्ग काढा, तुम्हाला हात जोडतो. अन्यथा आम्हाला आंदोलन…

Read More

शिर्डी : वृत्तसंस्था साई संस्थांनच्या दोन कर्मचाऱ्यांवर तसेच शिर्डीतील तरुणावर ड्युटीला येताना प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. हि घटना ३ फेब्रुवारी रोजी घडली असून या दुहेरी हत्याकांडाने शिर्डीमध्ये खळबळ उडाली आहे. तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या घटनेत तिघांवर धारदार चाकूने वार करण्यात आले. यात दोघांचा या घटनेत मृत्यू झाला असून तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साई संस्थानचे दोघे कर्मचारी पहाटे ड्युटीला येताना ही घटना घडली. तीन वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर वार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. सुभाष साहेबराव घोडे (वय ४५) आणि नितीन कृष्णा शेजुळ (वय ३२) साई संस्थानच्या या दोन कर्मचाऱ्यांवर…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील प्रयागराज येथे महाकुंभ मोठ्या उत्साहात सुरु असून महाकुंभाचा तिसरा आणि अंतिम अमृतस्नान वसंत पंचमीला सुरू आहे. हातात तलवार-गदा, ढोल आणि शंख. अंगावर भिती. डोळ्यांवर काळा चष्मा. घोडेस्वारी आणि रथ. ‘हर हर महादेव’चा जयघोष करत ऋषी-मुनी स्नानासाठी संगमावर पोहोचत आहेत. सर्वप्रथम पंचायती निरंजनी आखाड्याचे संत संगमावर पोहोचले. त्यानंतर सर्वात मोठ्या जुना आखाड्यासह किन्नर आखाड्याने अमृतस्नान केले. 13 आखाडे एक एक करून स्नान करतील. साधूंचे आशीर्वाद घेण्यासाठी लाखो भाविक संगमावर आहेत. नागा साधूंच्या पायाची धूळ ते कपाळावर लावत आहेत. अमृत ​​स्नान पाहण्यासाठी 20 हून अधिक देशांतील लोकही संगमावर पोहोचले आहेत. हेलिकॉप्टरमधून संगमावर पुष्पवृष्टी करण्यात आली. संगमाकडे जाणाऱ्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव रेल्वेस्थानकावर उतरलेल्या व्यापाऱ्याला मारहाण करून जबरदस्तीने दुचाकीवर बसवून गोदावरी इंजिनिअरिंग कॉलेज येथे नेऊन मारहाण करत जबरी ऑनलाईन पद्धतीने २ हजार रुपये आणि खिशातील ३०० रुपये असे एकुण २ हजार ३०० रुपये घेऊन दमदाटी करून सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी १ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता घडली आहे याप्रकरणी शहर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे तीन जणांना अटक केली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद मुन्ना कुरेशी वय-३४, रा.उत्तर प्रदेश ह.मु. धुळे हे व्यापारी असून कर्नाटक एक्सप्रेसमधून जळगावला उतरले आणि जळगाव रेल्वे स्थानकाजवळील पान टपरीवर पान घेत होते. त्यावेळी दुचाकीवर तीन जण…

Read More