Author: editor desk

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव बुद्रुक गावात चुंचाळे रस्त्यावर एका २५ वर्षीय तरुणाला गावातीलच एकाने दारूची बाटली आणून दे असे सांगितले. त्याने हे काम करण्यास नकार दिल्याच्या कारणावरून वाद झाला आणि या वादातून या तरुणाला एकाने शिवीगाळ करून मारहाण करून जबर दुखापत केली. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, किनगाव बुद्रुक, ता. यावल या गावात चुंचाळे रोडवर पंकज सुरेश पाटील (वय २५) हा तरुण उभा असताना तेथे गणेश मोहन चौधरी हा आला व त्याने पंकजला दारूची बाटली आणून देण्यास सांगितली असता त्याने नकार दिला. नकार दिल्याचा राग येऊन पंकजला गणेश चौधरी याने शिवीगाळ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी पुणे येथील नातेवाइकांकडील कार्यक्रम आटोपून बडनेरा येथे परताना संध्या चंद्रकांत राठी (६९, रा. अमरावती) या वृध्देच्या पर्समधून १० हजार रुपयांसह ११ लाख ९५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लांबविले. ही घटना १ जानेवारी रोजी महाराष्ट्र एक्स्प्रेसमध्ये घडली. या प्रकरणी जळगाव लोहमार्ग पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, अमरावती येथील संध्या राठी यांच्या नातेवाईकांकडे पुणे येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता. तेथे त्यांच्यासह पती डॉ. चंद्रकांत राठी व अन्य दोन नातेवाईक गेले होते. तेथून ते ३१ जानेवारी रोजी रात्री महाराष्ट्र एक्स्प्रेसने बडनेरापर्यंत आले. त्यावेळी त्यांनी आजूबाजूला शोध घेतला, मात्र ऐवज न सापडल्याने त्यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एका धार्मिक मिरवणुकीमध्ये डीजेवर वादग्रस्त ऑडिओ क्लिप वाजवण्यासह औरंगजेबचे छायाचित्र घेऊन नाचत असल्याचा प्रकार २३ जानेवारी रोजी रात्री तांबापुरा परिसरात घडला. याप्रकरणी १ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा आहे. दाखल करण्यात आला सविस्तर वृत्त असे कि, तांबापुरा परिसरातील एका चौकात धार्मिक मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मिरवणुकीत नेत्याचे वादग्रस्त एका पक्षाच्या वक्तव्य असलेली ऑडिओ क्लिप डीजेवर लावण्यात आली होती. तसेच औरंगजेबचे हातात छायाचित्र घेऊन एकजण मिरवणुकीत नाचत होता. याप्रकरणी किशोर रवींद्र जाधव (३२, रा. समतानगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मिरवणूक आयोजक अशरफ शेख शकील, डीजेमालक योगेंद्र पाटील उर्फ…

Read More

मेष राशी तुम्ही कोणतीही व्यवसाय योजना गुप्तपणे राबवता. बेरोजगारांना रोजगार मिळेल. जमीन, इमारत, वाहन इत्यादी विकणाऱ्याकडून आर्थिक लाभ होईल. राजकारणात पद आणि प्रतिष्ठा वाढेल. काही अपूर्ण कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. वृषभ राशी  आज, कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या अचानक गंभीर आजारामुळे, आर्थिक, शारीरिक आणि मानसिक त्रास होईल. जमीन, वास्तू, वाहन इत्यादींच्या आशीर्वादाची विशेष काळजी घ्या. अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. मिथुन राशी  आज तुमच्या प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीचा प्रवेश होऊ शकतो. ज्यामुळे तुमच्या नात्यात शंका आणि अंतर वाढेल. प्रेमविवाहाच्या योजनांना धक्का बसेल. आणि गोष्टी आणखी वाईट होतील. आनंद आणि सहकार्य मिळेल. कर्क राशी  आरोग्यात आज काही चढ-उतार जाणवतील. गंभीर आजाराने…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारतीय संघाने आयसीसी महिला अंडर-19 टी-20 विश्वचषक 2025 चे विजेतेपद पटकावले. रविवारी (2 फेब्रुवारी) खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 9 विकेट्सने पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाला जिंकण्यासाठी 83 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी फक्त 11.2 षटकांत पूर्ण केले. भारतीय संघाच्या विजयात गोंगाडी त्रिशाने महत्त्वाची भूमिका बजावली. त्रिशाने गोलंदाजीत तीन विकेट्स घेतल्या, तर फलंदाजीत नाबाद 44 धावा केल्या. भारताने सलग दुसऱ्यांदा हे विजेतेपद जिंकले आहे. यापूर्वी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या स्पर्धेत भारतीय संघ शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली विजेता ठरला होता. अंतिम सामन्यात लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली. जी कमलिनी आणि…

Read More

अहमदाबाद : वृत्तसंस्था गुजरात राज्यातील डांग जिल्ह्यात यात्रेकरूंना घेऊन जाणारी खासगी बस खोल दरीत कोसळली. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. 17 जण गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ४.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. सापुतारा हिल स्टेशनजवळ बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस खड्ड्यात पडली. ही बस महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वरहून गुजरातमधील द्वारका येथे ४८ भाविकांना घेऊन जात असताना हा अपघात झाला. अधिकाऱ्याने सांगितले की, यात्रेकरू मध्य प्रदेशातील गुना, शिवपुरी आणि अशोक नगर जिल्ह्यातील होते. 23 डिसेंबर रोजी मध्य प्रदेशातील शिवपुरी, गुना आणि अशोकनगर जिल्ह्यातील भाविकांचा एक समूह धार्मिक यात्रेला निघाला होता. हे लोक उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना या प्रेमप्रकरणातून होत असल्याचे सातत्याने समोर येत असतांना आता एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. पनवेलमध्ये एका प्रियकराने रागाच्या भरात केलेले कृत्य त्याचे आणि तिचे आयुष्य उद्धवस्त करून गेले. पोलिसांनी या प्रकरणात प्रियकरावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे. सविस्तर वृत्त असे कि, नवीन पनवेलमधील 22 वर्षाचा निकेश शिंदे याचे प्रेम प्रकरण सुरू होते. पण दोघांमध्ये खटके उडाले आणि दोघांमध्ये ब्रेकअप झाले. आपली प्रेयसी कुणाशी तरी बोलते असा त्याला संशय होता. त्याच्या या संशयाच्या भुताने दोघांमधील वाद वाढला होता. ब्रेकअप नंतर पण निकेश तिच्यावर पाळत ठेवून होता. तू कोणाशी बोलते…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहराकडून भरधाव वेगाने जाणाऱ्या प्रवासी रिक्षाने समोरुन येणाऱ्या दुचाकीस्वार बापलेकाला जोरादार धडक दिली. या अपघातात मगन छगन ढगे (वय ८३) यांच्यासह त्यांचा मुलगा दिनेश मगन ढगे (दोघ रा. रेलगाव, ता. सिल्लोड, जि. संभाजी नगर) हे दोघ गंभीर जखमी झाले. ही घटना दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी कुसुंबा शिवारातील विमानतळ इन गेट समोर घडली. यापक्ररणी रिक्षा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सविस्तर वृत्त असे कि, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रेलगाव येथील मगन छगन ढगे हे दि. ३१ जानेवारी रोजी मुलगा दिनेश ढगे यांच्यासोबत सकाळी ८ वाजता (एमएच २०, डीएम ७८७४) क्रमांकाच्या दुचाकीने धार्मीक कार्यक्रमासाठी जळगाव तालुक्यातील रायपूर येथे…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव येथील मनीषा संदीप पाटील (वय ३२) या विवाहितेने या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनीषा पाटील या घरी असताना त्यांच्याशी जवळचे संबंध असलेला मुकुंदा गणेश भंगाळे (वय ३२, रा. डांभुर्णी) हा तरुण त्यांच्या घरात आला. तो त्या महिलेला म्हणाला की, मी तुमच्या मोबाईलवर कॉल केला, तूम्ही माझा कॉल का उचलला नाही. तेव्हा या महिलेने सांगितले की, माझा मोबाईल सायलेंट मोडवर होता आणि मी बाहेर गेली होती. तरी ही मुकुंदा भंगाळे याने मनीषा पाटील या महिलेशी वाद घातला आणि महिलेला थेट शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या उजव्या पायाच्या मांडीवर धारदार शस्त्राने वार करून…

Read More

यावल : प्रतिनिधी तालुक्यातील साकळी येथील हजरत सजन शहावली बाबाच्या दर्गाहजवळ यावल शहरातील २१ वर्षीय तरुणावर मागील भांडणाच्या कारणावरून पाच जणांनी हल्ला चढवला. यामध्ये त्याच्यावर चाकूने जबर वार केले असून हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारार्थ जळगाव रुग्णालयात दाखल केले असून याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात साकळी येथील पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, साकळी गावात हजरत सजन शहावली बाबा दर्गाह असून या दर्गाहजवळ २६ जानेवारीला रात्री यात्रेनिमित्त शादाब खान गुलाब खान (वय २१, रा. बाबूजीपुरा, यावल) हा तरूण आला होता. तेथे मागील भांडणाच्या कारणावरून नईम मन्यार अब्दुल हक, जनलाल नईम मन्यार, अदनान नामक…

Read More