Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » मित्राचे भांडण सोडवताना तरुणावर तलवारीने हल्ला; अक्सानगरात खुनाचा प्रयत्न !
    क्राईम

    मित्राचे भांडण सोडवताना तरुणावर तलवारीने हल्ला; अक्सानगरात खुनाचा प्रयत्न !

    editor deskBy editor deskApril 21, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी 

    मित्राचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या शेख इस्माईल शेख असगर (२५, रा. अक्सानगर) या तरुणाच्या कपाळावर तलवारीने वार करून गंभीर दुखापत करण्यात आली. अन्य दोन जणांनी मारहाण केली. ही घटना १८ एप्रिल रोजी अक्सानगरात घडली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दि. १९ रोजी, तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक अशोक काळे करीत आहेत.

    अक्सानगरातील रहिवासी शेख ईस्माईल यांच्या मित्राशी काही जणांचे भांडण सुरू होते. ते सोडविण्यासाठी शेख ईस्माईल गेले असता शहाबाज ऊर्फ नगिना याने त्यांच्या कपाळावर तलवारीने वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. तसेच तौसिफ पाशा ऊर्फ बिहारी व उजेर पिरजादा या दोघांनी मारहाण केली व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. शेख इस्माईल यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. शहाबाज, तौसिफ व उजेर पिरजादा या तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी : मे महिन्याचा हप्ता खात्यात जमा होणार !

    June 11, 2026

    शासकीय आयटीआयसमोर अपघात; कार-कंटेनर धडकेने वाहतूक विस्कळीत

    June 11, 2026

    अचानक ब्रेक ठरला जीवघेणा! कार-रिक्षा धडकेत दोघे गंभीर जखमी

    June 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.