जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील उजाड कुसुंबा येथील मराठी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला गळफास घेत अत्तरसिंग चमारसिंग पावरा (वय ७०) यांनी आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील उजाड कुसुंबा येथे अत्तरसिंग पावरा हे वृद्ध कुटुंबियांसह वास्तव्यास होते. बुधवारी दुपारच्या सुमारास अत्तरसिंग यांनी गावातील मराठी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या झाडाला गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आल्यानंतर अत्तरसिंग पावरा यांना तात्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करीत मयत घोषीत केले. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव-जामनेर महामार्गावर तोरणाळा येथील स्मशानभूमी जवळ एक अत्यंत भीषण आणि हृदयद्रावक अपघात घडला आहे. दुचाकी आणि ट्रॅक्टर यांच्यात झालेल्या या भीषण धडकेत पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मात्र, या भीषण अपघातात त्यांच्या सोबत असलेली केवळ एक वर्षाची चिमुकली मुलगी चमत्कारिकरित्या बचावली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल वासुदेव खडके (वय 50) आणि सोनाली गोपाल खडके (वय 45, रा. सातबारा) हे आपल्या दुचाकीने घरी परतत होते. जामनेर महामार्गावरील तोरणाळा गावाजवळील स्मशानभूमीजवळ आले असताना, वेगातील दुचाकीवरील नियंत्रण सुटले. परिणामी, समोरून चाललेल्या एका ट्रॅक्टरला दुचाकीने मागून जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर गोपाळ खडके आणि सोनाली खडके…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात १८ वर्षीय तरुणी एकटी असताना घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी धीरज अनिल पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २० रोजी रात्री सुमारे १० वाजता तरुणी घरात एकटी असताना धीरज अनिल पाटील हा घरात घुसला. त्याने तरुणीचे तोंड दाबून शिवीगाळ केली. तसेच आरडाओरड केल्यास जिवंत ठेवणार नाही, अशी धमकी दिली. त्यावेळी त्याने तिचा विनयभंग केला. घटनेनंतर तरुणीने आरडाओरड केल्यावर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावून आले. त्यावेळी आरोपी घरातच आढळून आला. यानंतर तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हे. कॉ. शरीफ पठाण करीत…
आजचे राशिभविष्य दि.२४ एप्रिल २०२६ मेष राशी आज खूप बिझी असाल आणि तुमच्या जबाबदाऱ्यांबाबत दक्ष राहाल. तुमच्या मेहनतीला नशिबाची साथ मिळेल. आज प्रवासाचीही शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने दिवस अनुकूल आहे. तुमच्या नातेसंबंधांमध्ये तुमच्या अपेक्षा वाढतील. तुमच्या मुलांप्रति असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील, तर विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. वृषभ राशी आज तुमचे उत्पन्न वाढेल आणि तुम्हाला नफ्याच्या संधी मिळतील. तथापि, दीर्घकालीन गुंतवणूक करण्यापूर्वी, आपल्या निर्णयांचा काळजीपूर्वक विचार करा. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि बोलण्याचा इतरांवर प्रभाव पडेल, ज्यामुळे तुम्हाला प्रसिद्धी आणि आदर मिळेल. तुम्हाला धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. आज तुम्हाला तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहण्याची गरज आहे. मिथुन राशी आजचा दिवस…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला असून, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मात्र, महाविकास आघाडीतून आता ठाकरेंनाच पुन्हा संधी देण्याची जोरदार मागणी पुढे येत आहे. आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसने आधीच या जागेसाठी अनुकूलता दर्शवली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडूनही ठाकरेंनाच पाठिंबा देण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. खासदार सुप्रिया सुले यांनी सोशल मीडियावर ट्विट करत ठाकरेंनीच ही निवडणूक लढवावी, अशी विनंती केली आहे. सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “महाराष्ट्रातील विधानपरिषदेची निवडणूक माजी मुख्यमंत्री उद्धवजी…
नाशिक : वृत्तसंस्था नाशिक जिल्ह्यातील सप्तशृंगी गड येथील श्री सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टच्या कारभारात तब्बल २२ किलोहून अधिक चांदीची तफावत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या या प्रसिद्ध तीर्थक्षेत्रातील या प्रकरणाची नाशिक विभागीय आयुक्त कार्यालय आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. सामाजिक कार्यकर्ते विठोबा लच्छिराम द्यानद्यान यांनी पुराव्यानिशी केलेल्या तक्रारीनुसार, मंदिरातील नक्षीकामासाठीच्या जुन्या नोंदींमध्ये ४०६ किलो चांदीचा उल्लेख आहे. मात्र प्रत्यक्ष मोजणीत केवळ ३८३ किलो ७०३ ग्रॅम चांदी उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. यामुळे तब्बल २२ किलो ४९० ग्रॅम चांदीचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. २५ मार्च २०२६ रोजी प्राप्त झालेल्या या…
मुंबई : वृत्तसंस्था छत्रपती शिवाजी महाराजांविषयीच्या संवेदनशीलतेवरून राज्यात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाच्या शीर्षकावर आक्षेप घेत प्रकाशकाला फोनवरून धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. माहितीनुसार, दिवंगत प्राध्यापक गोविंद पानसरे यांनी सुमारे ३७ वर्षांपूर्वी ‘शिवाजी कोण होता’ हे पुस्तक लिहिले होते. या पुस्तकाच्या शीर्षकावरूनच आक्षेप घेत गायकवाड यांनी प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन केला. या संभाषणात त्यांनी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आणि पानसरे कोण होते, असा सवाल…
जळगाव : प्रतिनिधी जून्या घरगुती वादातून सागर सुपडू पाटील (वय २६, रा. शिरसोली प्र.न. ता. जळगाव) याच्यावर कुऱ्हाडीसह विळ्याने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. १९ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिरसोली येथे घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील शिरसोली येथे राहणारे सागर पाटील यांना दि. १९ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास जून्या घरगुती वादातून गोविंदा पाटील व त्यांच्या साडूची मुलगी निकीता पाटील आणि मुलगा प्रशांत गोविंदा पाटील यांनी मारहाण केली. या मारहाणीत गोविंदा पाटील याने कुऱ्हाडीने सागरच्या डोक्यावर तर निकीता पाटील हीने विळ्याने वार करीत गंभीर जखमी केले. तसेच त्यांना लाथाबुक्क्यांनी…
चोपडा : प्रतिनिधी तालुक्यातील चुंचाळे येथे कृषी विभाग आणि पोलीस प्रशासनाने संयुक्त कारवाई करत अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाण्यांचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे शेतकऱ्यांना फसवणूक करणाऱ्या बेकायदेशीर बियाणे विक्रीवर मोठा आळा बसण्याची अपेक्षा आहे. शहर पोलीस स्टेशन चोपडा यांना दि. २० एप्रिल रोजी मिळालेल्या माहितीनुसार, नितीन नंदलाल चौधरी हा व्यक्ती छुप्या पद्धतीने प्रतिबंधित एचटीबीटी कापूस बियाण्यांची विक्री करत असल्याचा संशय होता. यावर कृषी विभागाने तपासणी केली असता तब्बल ४५० पॅकेट बियाणे सापडले. कारवाईदरम्यान ‘रिसर्च हायब्रीड कॉटन सीड सुपर किंग’ व ‘चॅलेंजर’ या नावाची प्रतिबंधित बियाण्यांची ९ पोती जप्त करण्यात आली. त्यांची अंदाजे किंमत ५ लाख ४० हजाररुपये आहे.…
जळगाव : प्रतिनिधी तुमचा शनि काढून देतो’ असे सांगत गजानन विठोबा सर्जेराव (वय ६७, रा. जिल्हा बँक कॉलनी) या वृद्धाची सोन्याची अंगठी व रोख ९०० रुपये अज्ञाताने त्यानंतर हा अज्ञात भोंदू त्याच्या साथीदारासह पसार झाला. हा प्रकार दि. २० एप्रिल रोजी नवीन बसस्थानकात घडला. या प्रकरणी लांबविले. २१ एप्रिल रोजी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात दोन अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा बँक कॉलनीतील रहिवासी गजानन सर्जेराव हे त्यांच्या मुलीकडे घरभरणीच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी बसस्थानकावर आले होते. त्यांच्याजवळ एक जण आला व त्याने शेगावच्या बसविषयी विचारणा केली. त्यावर वृद्धाने माहिती नसल्याचे सांगितले. त्यावेळी समोरील व्यक्तीने वृद्धाच्या शेजारी बसलेल्या इसमाला एक…

