आजचे राशिभविष्य दि.२३ एप्रिल २०२६ मेष राशी मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साह आणि ऊर्जेने भरलेला असेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रचंड प्रेरणा मिळेल. कामाच्या ठिकाणी विचारांची देवाणघेवाण करण्याच्या चांगल्या संधी मिळतील, ज्यामुळे तुमची परिस्थिती सुधारेल. कुटुंबासोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे असेल आणि तुम्ही तुमच्या प्रियजनांसोबत काही मजेदार उपक्रमांचे नियोजन करू शकता. जुन्या मित्राला भेटल्याने तुमचा मूड सुधारेल आणि तुम्हाला तुमच्या मनातील भावना व्यक्त करण्याची संधी मिळेल. वृषभ राशी तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात संतुलन साधण्याचा प्रयत्न करा. तुमच्या सभोवतालच्या लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यात तुम्हाला यश मिळेल. संवाद महत्त्वाचा ठरेल, त्यामुळे तुमचे विचार स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न करा. आर्थिक…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नुकतीच मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धाम येथे कुटुंबासह भेट दिली. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या दौऱ्याची देशभरात चर्चा रंगली आहे. सर्वोच्च न्यायव्यवस्थेतील उच्च पद भूषवलेल्या व्यक्तीच्या या भेटीमुळे विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. ‘बागेश्वर बाबा’ म्हणून ओळखले जाणारे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या नेतृत्वाखालील बागेश्वर धाम सध्या धार्मिक कार्यक्रम, दरबार आणि प्रवचनांमुळे चर्चेत आहे. भक्तांच्या समस्यांवर आध्यात्मिक उपाय सुचवण्याच्या त्यांच्या दाव्यांमुळे मोठ्या प्रमाणात भाविक येथे आकर्षित होत असले तरी, त्यांच्या कथित चमत्कारांवरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा या विषयावर समाजात सातत्याने चर्चा रंगताना दिसते. बागेश्वर…
मुंबईतील वरळी परिसरात महायुतीच्या आक्रोश मोर्चादरम्यान झालेल्या वाहतूक कोंडीमुळे एका सामान्य महिलेने भाजपचे ज्येष्ठ नेते व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांना थेट जाब विचारल्याची घटना चर्चेत आली आहे. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातही तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून विरोधकांनी सरकार आणि भाजपवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर गिरीश महाजन यांनी माध्यमांसमोर येत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी सांगितले की, संबंधित महिला अत्यंत संतप्त अवस्थेत होत्या आणि त्यांनी वापरलेली भाषा योग्य नव्हती. त्या वेळी त्यांनी पोलिसांकडे तक्रार करणे अपेक्षित होते, असेही महाजन यांनी नमूद केले. महाजन यांच्या म्हणण्यानुसार, हा मोर्चा महिलांच्या आरक्षणासंदर्भातील विधेयकाच्या समर्थनार्थ आयोजित करण्यात आला…
नाशिक : वृत्तसंस्था दैवी शक्तीचा दावा करत महिलांचे शोषण आणि आर्थिक फसवणूक केल्याच्या गंभीर आरोपांमध्ये अडकलेल्या भोंदूबाबा अशोक खरात याच्या चौकशीत नाट्यमय घडामोडी समोर आल्या आहेत. विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) सुरू असलेल्या चौकशीदरम्यान अचानक त्याची प्रकृती बिघडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीकडून खरातची सखोल चौकशी सुरू आहे. एका गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर दुसऱ्या प्रकरणात त्याला पोलिस कोठडीत घेऊन दररोज अनेक तास कसून चौकशी केली जात आहे. मात्र मंगळवारी चौकशीदरम्यान त्याला अचानक छातीत वेदना, तीव्र डोकेदुखी, मळमळ आणि उलट्यांचा त्रास सुरू झाला. परिस्थिती गंभीर होताच पोलिसांनी तातडीने वैद्यकीय मदत बोलावली. खरातला ऑक्सिजन…
जळगाव : प्रतिनिधी चिंचोली येथे ३१ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २० रोजी रात्री घडली. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली येथील रहिवासी नीलेश अशोक बडगुजर (वय ३१) हा आपल्या आई सोबत एकटाच राहत होता. नीलेशची आई बाहेर शेजारी गेली असता नीलेश हा घरात एकटाच होता. याचवेळी त्याने घरातील लाकडी सरीला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नीलेशला मद्याचे व्यसन असल्याने तो नेहमी नशेत असायचा. त्यामुळेच त्याने मद्याच्या नशेत हे कृत्य केल्याचे बोलले जात आहे. नीलेशच्या वडिलांचे १० वर्षांपूर्वी आजाराने निधन झाले आहे. मयत नीलेशच्या पश्चात आई, २ विवाहित बहिणी असा परिवार आहे. तो मधूकर ओंकार बडगुजर यांचा पुतण्या…
जळगाव : प्रतिनिधी शिवीगाळ केल्याचा जाब विचारल्याने कमल भरत लोंढे (वय ४५, रा. राजीवगांधी नगर) यांच्यावर धारदार चाकूने वार करीत गंभीर जखमी केले. ही घटना दि. २० एप्रिल रोजी सायंकाळी ८ वाजता राजीवगांधी नगरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहिती नुसार, शहरातील राजीव गांधी नगरात राहणाऱ्या कमल लोंढे या दि. २० रोजी सायंकाळी मुलीसोबत खदाणकडे जात होत्या. तयवेळी संशयित उषाबाई हातांगळे यांनी त्यांना शिवीगाळ केली. यावेळी कमल लोंढे यांनी तुम्ही आम्हाला शिवीगाळ का करीत आहे याचा जाब विचारला. त्याच्या राग आल्याने तिघांनी मायलेकीसोबत वाद घातला. या वादातून संशयित शुभम हातांगळे यांने त्याच्या हातील धारदार…
जळगाव : प्रतिनिधी निविदेची (टेंडर) ची गोपनीय माहिती देण्यास नकार दिल्याच्या रागातून संतापलेल्या व्यक्तीने सहाय्यक अभियंता संदीपकुमार बडगुजर यांच्या केबीनमध्ये शिरुन त्यांना मारहाण केली. ही घटना दि. २० एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास महावितरणच्या दिक्षीतवाडी कार्यालयात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी संजय रामभाऊ वराडे हा दि. २० एप्रिल रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास दिक्षितवाडी येथील महावितरण कार्यालयात गेला होता. त्या ठिकाणी त्याने सहाय्यक अभियंता संदीपकुमार रणछोड बडगुजर यांच्याकडे महावितरणकडन काढण्यात आलेल्या एका निविदेची माहिती मागितली. संबंधित निविदेची माहिती गोपनीय असल्याने ती देता येणार नाही, असे अभियंता बडगुजर यांनी स्पष्ट…
जळगाव : प्रतिनिधी रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील इंद्रनील सोसायटीमध्ये एका घरात साठवून ठेवलेला १ लाख ६६ हजार रुपये किमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने छापा टाकून जप्त केला. ही कारवाई २० एप्रिल रोजी केली. याप्रकरणी घर मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इंद्रनील सोसायटीतील एका घरात मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटख्याचा साठा असून, तेथून त्याची विक्री केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी पद्मजा कढरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी संबंधित घरावर छापा टाकला. पथकाने घराची तपासणी सुरू केली असता कोपऱ्यात लपवून ठेवलेला १ लाख ६६ हजार ७१९ रुपये किमतीचा गुटखा जप्त केला. हा साठा…
एरंडोल : प्रतिनिधी स्वतःच दुकानात गुटखा ठेवून अन्न व भेसळ विभागाच्या तोतया अधिकाऱ्याने चहा विक्रेत्याकडून दहा हजाराची खंडणी वसूल केल्याची घटना एरंडोलमध्ये घडली. याबाबत तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याच्या निषेधार्थ आमदार अमोल पाटील यांनी ठाण्यात मंगळवारी रात्री ९ वाजेपासून चार तास ठिय्या आंदोलन केले. दरम्यान, याबाबत पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे-जळगाव महामार्गावरील गजानन महाजन यांचे चहाचे दुकान आहे. या दुकानात सोमवार दि. २० रोजी दुपारी किशोर बाविस्कर व त्याचे चार साथीदार एका कारमधून आले. आपण अन्न व भेसळ खात्याचे अधिकारी असल्याचे सांगून त्यांच्यासोबत असलेल्या एकाने स्वतःसोबत आणलेली गुटख्याची पिशवी दुकानात ठेवली आणि महाजन यांना धमकी दिली.…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील वसंतवाडी येथील तरुणाचा जळके गावाजवळील रस्त्याच्या वळणावर अपघात होऊन दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २१ एप्रिल रोजी सकाळी समोर आली आहे. . हा तरुण दिनांक २०एप्रिल रोजी घरुन काम निमित्ताने बाहेर गेला होता परंतु तो रात्री उशिरा पर्यंत घरी परतला नाही . मिळालेल्या माहितीनुसार, वसंतवाडी येथील रवींद्र रुपचंद चव्हाण वय वर्षे ३७ हा तरुण आपल्या मोटारसायकलने वावडद्याकडुन घरी परतत असताना जळके गावाजवळील रस्त्याच्या वळणावर अपघात होऊन रस्त्याच्या बाजूला असलेल्या केळीच्या शेतात त्याच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक MH 19 EK 3530 सह मृत अवस्थेत आढळून आला होता. या घटनेची माहिती शेत मालक नथ्यु पाटील यांनी जळके पोलीस पाटील संजय…

