Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अपघातात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू
    क्राईम

    अपघातात जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचा उपचारादरम्यान मृत्यू

    editor deskBy editor deskApril 21, 2026No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी 

    तालुक्यातील किनगाव येथून यावल रस्त्यावरील हॉटेल मन मंदिरसमोर दुचाकीद्वारे यावलकडे जाणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना कुझरने भरधाव वेगाने मागाहून धडक दिली होती. या अपघातात ३८ वर्षीय पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले होते. तर, उपचारादरम्यान त्या पोलिस कर्मचाऱ्यांचा सोमवारी पहाटेपूर्वी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यावर विदगाव येथे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या उपस्थितीत शासकिय इतमामात अंतसंस्कार करण्यात आलेत. या अपघातप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    यावल पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार भरत विठ्ठल कोळी (वय ३८) हे ९ एप्रिलला विदगाव येथून किनगाव मार्गे दुचाकी (एमएच १९, सीजी- २८१३) ने येत होते. दरम्यान, अंकलेश्वर ते ब-हाणपूर महामार्गावरील किनगाव जवळील हॉटेल मनमंदिर समोर ९ एप्रिलला रात्री अंमलदार भरत कोळी दुचाकीने जात होते. याच वेळी आडगाव येथील चालक दीपक प्रकाश सपकाळे हा कुझर या चारचाकी एमएच २९, बीसी ५४८७) ने जात होता. भरधाव वेगाने मागाहून येणाऱ्या याच चारचाकीने अंमलदार भरत कोळी यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या दुर्दैवी अपघातात दुचाकीस्वार भरत कोळी हे पोलिस अंमलदार जखमी झाले होते. तर जखमी अवस्थेत त्यांना उपचारार्थ जळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान सामेवारी पहाटेपूर्वी अंमलदार भरत कोळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर विदगाव येथे सोमवारी दुपारी १ वाजता अंमलदार भरत कोळी यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

    या प्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलिस अधीक्षक संदिप गावीत, जळगाव येथील डीवायएसपी नितिन गणापुरे, फैजपूरचे डीवायएसपी अनिल बडगुजर, यावल येथील पोलिस निरीक्षक रंगनाथ धारबळे, जळगाव तालुका पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांच्यासह अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयातील पथकाकडून हवेत रायफलच्या फैरी झाडून अंमलदार भरत कोळी यांना मानवंदना देण्यात आली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    लातूर हादरला : आईसह दोन निष्पाप जीवांचा दुर्दैवी अंत !

    April 21, 2026

    जळगाव जिल्ह्यांचे श्रीकांत धिवरे नवे पोलीस अधीक्षक !

    April 21, 2026

    चोपडा हादरले : बेपत्ता तरुणाचा खून उघड; एक जेरबंद !

    April 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.