Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी शहरातील हनुमाननगर येथील टीव्ही ग्राउंड जवळ बेकायदेशीरपणे गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणावर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल आहे. जिवंत काडतूस जप्त केले आहे. याबाबत शनिवारी १ मार्च रोजी रात्री ११ वाजता भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ शहरातीला हनुमाननगर मधील टी. व्ही. ग्राउंडजवळ संशयित आरोपी हिरामण उर्फ किशोर जाधव (वयः ३२, रा. वाल्मिक नगर, भुसावळ) हा तरुण बेकायदेशीरपणे हातात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी १ मार्च रोजी रात्री ९ वाजता कारवाई…

Read More

जळगाव : प्रतिनिधी हर्बललाईफ कंपनीमध्ये गुंतवणूक करण्याचे अमिष दाखवून माधुरी अनिल चांदोरीकर (३२, रा. आहिल्यानगर) या महिलेची ६६ लाख ४० हजार रुपयांची फसवणुक केली. सुरुवातीला चांदोरीकर यांना गुंतवणुकीवर तब्बल २० लाख ई दौऱ्यावर घेवून हजार रुपयांचा नफा देवून त्यांना दुबई दौऱ्या गेले. मात्र नंतर वेगवेगळ्या कारणाने उकळलेली रक्कम परत न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी दोघ भावंडांसह त्यांचे आई-वडील व कंपनीच्या एका कर्मचाऱ्याविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, जळगावातील माहेर असलेल्या माधुरी चांदोरीकरण या अहिल्यानगर येथे वास्तव्यास आहे. त्या मे २०२३ मध्ये पतीसह माहेरी आलेल्या असताना ते दोघे व मामेभाऊ हे मू.जे.…

Read More

मेष राशी आज कामाच्या ठिकाणी अनावश्यक वाद होऊ शकतात. कठोर शब्द आणि रागावर नियंत्रण ठेवा. राजकारणात तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या मोहिमेची कमान मिळू शकते. तुमच्या बुद्धीने व्यवसायाचा विस्तार करण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. काही सामाजिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी तुम्हाला घरापासून दूर जावे लागेल. वृषभ राशी व्यवसायात अपेक्षित आर्थिक लाभ न मिळाल्याने आज तुम्ही दु:खी व्हाल. बिझनेस ट्रिपला जाऊ शकता. पण अपेक्षित पैसे मिळण्यात काही कमतरता जाणवेल. प्रेमसंबंधांमध्ये पैसे आणि भेटवस्तूंची देवाणघेवाण होईल मिथुन राशी आज तुमची प्रेमसंबंधांमध्ये फसवणूक होऊ शकते. प्रेमविवाहाच्या योजना फसतील. जिव्हाळ्याच्या नात्यात थोडा थंडपणा जाणवेल. तिसऱ्या व्यक्तीमुळे नात्यात तणाव निर्माण होऊ शकतो. वैवाहिक जीवनात घटस्फोट किंवा जोडीदारापासून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशाच्या केंद्रीय मंत्री आणि भाजपच्या नेत्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढल्याचा धक्कादायक प्रकार आज समोर आला. मुक्ताईनगर तालुक्यातील कोथळी येथील जत्रेत सुरक्षारक्षक सोबत असताना रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढण्यात आली. तसेच व्हिडिओ देखील काढला होता. याप्रकरणी रक्षा खडके मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या होत्या. यावेळी आक्रमक पवित्रा घेत त्यांनी आरोपींच्या अटकेच्या मागणी केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेमध्ये एका विशिष्ट पक्षाचे पदाधिकारी असल्याचे फडणवीस म्हणाले. तसेच आरोपींवर कडक कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तर एका आरोपीला ताब्यात घेतल्याने पोलिसांकडून सांगण्यात…

Read More

पुणे : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील महाविकास आघाडीतील अनेक नेते महायुतीमध्ये जात असतांना आता शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यातच आता शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांनी देखील अजित पवार यांच्यासोबत पुण्यात एकाच गाडीतून प्रवास केला. या दोघांमध्ये दहा मिनिटे चर्चा झाली. यावेळी जाणकार यांच्यासोबत उमेश पाटील देखील उपस्थित होते. त्यामुळे आता या घडामोडीची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. उत्तम जानकर आणि अजित पवार यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली? याबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र यावर प्रतिक्रिया देताना उमेश पाटील यांनी माळशिरस तालुक्यातील उजनी धरणातून पंधरा दिवस आधी पाणी सोडण्याची जानकर यांनी मागणी…

Read More

जळगाव :  प्रतिनिधी भाजपच्या नेत्या आणि केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची काही टवाळखोरांनी यात्रेदरम्यान छेड केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी टवाळखोरांच्या अटकेसाठी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी ठिय्या मांडला आहे. या नुकत्याच समोर आलेल्या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांनी याबद्दल महिला आणि मुली घेऊन पोलीस स्टेशनमध्ये आक्रमक पावित्रा घेतला आहे. एका केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांसह कार्यकर्त्यांचा मोठा जमाव पाहायला मिळत आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आमच्यासारख्या परिवाराच्या मुली जर सुरक्षित नसेल तर बाकीच्यांचं काय, असा सवाल केंद्रीय मंत्री…

Read More

बीड :  वृत्तसंस्था राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे मोठ्या अडचणीत आले असून मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2024 रोजी निर्घृण हत्या करण्यात आली. याप्रकरणात सीआयडीने दोषारोपपत्र दाखल केले. त्यात वाल्मिक कराड हाच या हत्येचा मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. दरम्यान करुणा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टने राजकीय खळबळ उडाली आहे. 3 मार्च रोजी धनंजय मुंडे राजीनामा देतील असा दावा त्यांनी या पोस्टमध्ये केल्याने राज्याच्या राजकीय गोटात स्फोट झाला आहे. तर हे प्रकरणात न्याय मिळण्यासाठी राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे यांनी सुद्धा मोठा हातभार लावला. त्यांनी याप्रकरणात मोठे विधान केले आहे. आपण करूणा मुंडे यांची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी आठवडे बाजारात भाजीपाला घ्यायला गेलेल्या विमल मंगा शिरसाठ (वय ६१) यांच्या घरातून चोरट्यांनी २५ हजार रुपये व अन्य साहित्य चोरून नेल्याची घटना पिंप्राळ्यातील गणपती नगरात घडली. ही रक्कम विमलबाई यांनी डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यासाठी सांभाळून ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, विमल शिरसाठ यांचे पती आरोग्य विभागात नोकरीला होते. २०१९ मध्ये त्यांचे निधन झाल्याने त्या गणपती नगरात एकट्याच राहतात. पेन्शनवर त्या उदरनिर्वाह करतात. बुधवारी पिंप्राळ्याचा बाजार असल्याने सायंकाळी साडेसहा वाजता त्या बाजारात गेल्या होत्या. तेथून रात्री साडेआठ वाजता घरी आल्या असता, घराच्या पुढच्या दरवाजाला लावलेले कुलूप तुटलेले होते तर घरातील कपाटही तुटलेले दिसले. त्या कपाटातील पर्समध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी २५ हजार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसीतील चटई कंपनीत काम करणाऱ्या अनिकेत विजय मौर्य (वय १८, रा. उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम सुप्रीम कॉलनी, जळगाव) या परप्रांतीय तरुणाने सुप्रीम कॉलनी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आली. आत्महत्येचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नातेवाइकांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत मौर्य हा वडील विजय मौर्य यांच्यासोबत सुप्रीम कॉलनी येथे भाड्याच्या खोलीत वास्तव्याला होता. एमआयडीसीतील एका चटई कंपनीमध्ये काम करून ते आपला उदरनिर्वाह करीत होते. अनिकेतची आई व बहिणी मूळ गावाला आहेत. इकडे बापलेक दोघेच राहत होते. दोघांची कंपनीत रात्रपाळी ड्यूटी…

Read More

वरणगाव : प्रतिनिधी येथील मुक्ताईनगर रस्त्यावरील गंगाबेन पटेल रुग्णालयास लागून असलेले तायबा टायर्स या दुकानाला शनिवारी दुपारी अचानक आग लागली. आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेजारील दुकानेही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडल्यामुळे लाखोंचे नुकसान झाले. मुस्लीम भाई अन्सारी यांच्या टायर दुकानाला आग लागली. यात दुकानातील नवीन व जुने टायर, तसेच दुकानासमोरील या दोन दुचाकी जळून खाक झाल्या. तसेच बाजूला असलेले निजाम शेख यांचे चायनीजचे दुकान, इस्माइल शहा यांचे रेडिएटर शॉप,  गॅरेज, मजहर ऑटो गॅरेज व इलेक्ट्रिक गॅस वेल्डिंग या दुकानांनाही आग लागली. यात दुकानातील साहित्य जळून खाक झाले आहे. तसेच लोककल्याण हॉस्पिटलच्या आवारातील जुने मेडिकल साहित्य यात जळून खाक झाले आहे. वरणगाव फॅक्टरी…

Read More