Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » धरणगाव : ४५ वर्षीय शेतकऱ्याने शेतातच घेतले विषारी औषध
    क्राईम

    धरणगाव : ४५ वर्षीय शेतकऱ्याने शेतातच घेतले विषारी औषध

    editor deskBy editor deskJanuary 30, 2025Updated:January 30, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव : प्रतिनिधी

    तालुक्यातील चमगाव येथील ४५ वर्षीय व्यक्तीने शेतातील कर्जबाजारीला कंटाळून सोमवारी २७ जानेवारी रोजी दुपारी शेतात विषारी औषध घेतले होते. त्यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले असता गुरुवारी ३० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यासंदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. राजेश्वर आनंदा सावंत वय-४५, रा.चमगाव ता. धरणगाव असे मयत झालेले शेतकऱ्याचे नाव आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील चमगाव येथे राजेश्वर सावंत हे आपल्या आई, पत्नी आणि दोन मुलांसह वास्तव्याला होते. शेती करून ते आपला उदरनिर्वाह करत होते. गेल्या काही वर्षापासून त्यांनी शेती करण्यासाठी कर्ज काढले होते. पण सततची नापिकी आणि कर्जबाजाराला कंटाळून त्यांनी सोमवारी २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता शेतात असताना विषारी औषध घेतले. त्यांचे प्रकृती खालावल्याने त्यांना त्यांच्या नातेवाईकांनी तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी ३० जानेवारी रोजी पहाटे ५ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. त्यांच्या पश्चात आई, कमलाबाई पत्नी आशाबाई आणि सागर, विशाल ही दोन मुले असा परिवार आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    जळगावात सायबर फसवणुकीचा धक्कादायक पर्दाफाश; ट्रॅव्हल्स व्यावसायिकाच्या खात्यांत २.१५ कोटींची संशयास्पद रक्कम!

    August 22, 2026

    मैत्री नाकारली अन् तरुणाचा संताप अनावर : मध्यरात्री घरासमोर गोंधळ, जीवे मारण्याची धमकी

    August 21, 2026

    गुटख्याने भरलेली पिकअप धडकली अन् जीव गेला!

    August 21, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.