भुसावळ : प्रतिनिधी शहरालगतच्या कंडारी परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या मागील बाजूस बंद पडलेल्या खोल्यांमध्ये बिबट्याने एका गाढवाची शिकार केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून पुढील कारवाई केली. रविवारी सायंकाळी केंद्रीय विद्यालयाजवळ बिबट्या दिसल्याने कंडारी आणि सुभाष नगर परिसरात भीतीचे वातावरण पसरले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गाढवाच्या शिकारीचे तपशील तपासले. बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले नसले तरी शिकारीची पद्धत बिबट्यासारखीच असल्याने हा हल्ला बिबट्यानेच केला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला. नागरिकांच्या सुरक्षेसाठी कंडारी शिवारातील बिबट्याला लवकरात लवकर पकडून नागरिकांना भयमुक्त करावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. रेल्वे क्वार्टर, ऑर्डनन्स फॅक्टरी…
Author: editor desk
मुक्ताईनगर : प्रतिनिधी लोकप्रतिनिधी तथा भाजपच्या नेत्याच्या कन्येसह तिच्या मैत्रिणीची संत मुक्ताबाई यात्रोत्सवात छेड काढल्याप्रकरणात आणखी दोन जणांना पोलिसांनी रविवारी मध्यरात्रीनंतर अटक केली, आता या प्रकरणात अटकेतील आरोपींची संख्या चार झाली आहे. किरण माळी (२१) व एक अल्पवयीन अशा दोघांना रविवारी रात्री तर अनिकेत भोई (२६), अनुज पाटील (१९) या दोघा संशयितांना रविवारी मध्यरात्रीनंतर अटक करण्यात आली. अल्पवयीन वगळता तीन आरोपींना सोमवारी भुसावळ येथील विशेष सत्र न्यायालयाने दि. ५ मार्चपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तीन आरोपी अद्यापही फरार आहेत. अल्पवयीन आरोपीला जळगावातील बाल न्याय मंडळापुढे हजर करण्यात आले. भुसावळ विशेष सत्र न्यायालयात पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी तिन्ही…
मेष श्रीगणेश म्हणतात की, आज महत्त्वाचे काम पूर्ण करतील. विश्वासू व्यक्तीचा सल्ला आणि पाठिंबा तुमचा आत्मविश्वास वाढवेल. इतरांच्या सल्ल्याचा गांभीर्याने विचार करा. अचानक काही खर्च येऊ शकतात. कोणत्याही प्रकारच्या अनुचित कामात रस घेऊ नका. घरातील वातावरण आनंदी राहील. वृषभ गेल्या काही दिवसांपासून अडथळे येत असलेली कामे आज अगदी सहजपणे पूर्ण कराल. जवळच्या नातेवाईकांसोबत मनोरंजनाचे कार्यक्रम होतील. धार्मिक कार्यातही तुमचा सहभाग असेल. कोणतेही काम करण्यापूर्वी चांगल्या आणि वाईट पातळीचा विचार करणे आवश्यक आहे. मुलांच्या समस्या शांतपणे सोडवा, असा सल्ला श्रीगणेश देतात. मिथुन श्रीगणेश सांगतात की, आज ग्रहस्थिती तुमच्यासाठी अनुकूल आहे. धार्मिक कार्यातील सहभागाने तुमची मानसिकतेमध्ये सकारात्मकता अनुभवा. तुमच्या संतुलित…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याच्या राजकारणातून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. विधानसभा निवडणूक निकालानंतर आता रिक्त पाच विधान परिषदेच्या जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. परिषदेतील ५ आमदार विधानसभेवर निवडून गेल्याने त्या जागा आता रिक्त झाल्या आहेत. शिवसेना शिंदे गट एक, अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा एक तर भाजपच्या तीन रिक्त जागांवर निवडणूक होणार आहे. १० मार्च ते १७ मार्च अर्ज भरण्याची प्रक्रिया असेल. आमश्या पाडवी, राजेश विटेकर, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रमेश कनाड या सदस्यांच्या रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. दरम्यान, या रिक्त जागांवर कुणाची नेमणूक होणार याकडे आता राज्याचं लक्षू लागून राहिलं आहे. आमदार आमश्या पाडवी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव – कजगाव आणि परिसरातील प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. बडनेरा-नाशिक रोड स्पेशल (01211/01212) या रेल्वेला कजगाव स्थानकावर प्रायोगिक तत्त्वावर थांबा देण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. खासदार स्मिता वाघ यांच्या पाठपुराव्यामुळे हा थांबा मंजूर करण्यात आला आहे, त्यामुळे स्थानिक प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे. कजगाव आणि परिसरातील नागरिकांकडून या थांब्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. प्रवाशांना नाशिक आणि बडनेराकडे प्रवास करण्यासाठी लांबच्या स्थानकांवर जावे लागत होते. या समस्येची दखल घेत खासदार स्मिता वाघ यांनी रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि कजगाव येथे गाडीला थांबा देण्याची मागणी केली. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, रेल्वे मंत्रालयाने…
मुंबई : वृत्तसंस्था राज्य सरकारने “लाडकी बहीण” योजनेच्या माध्यमातून राज्यातील लाखो महिलांना दरमहा १५०० रुपये देण्यास सुरुवात केली होती. मात्र, फेब्रुवारी महिन्यात या योजनेचा हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा न झाल्याने संभ्रम निर्माण झाला होता. तसेच, पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची छाननी सुरू झाल्यामुळे अनेक शंका उपस्थित केल्या जात होत्या. मात्र, आजपासून सुरू झालेल्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्य सरकारने मोठी घोषणा करत जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरित करण्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा रखडलेला हप्ता आणि मार्च महिन्याचा नियोजित हप्ता एकत्रितपणे देण्यात येणार आहे.…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी तालुक्यातील शेमळदे येथील रहिवासी विश्वजीत उर्फ भागवत विनोद पाटील या तरुणाचा मध्य प्रदेशातील भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. सविस्तर वृत्त असे कि, विश्वजीत हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असून त्याच्या दोन बहिणी आहेत. शेतीच्या काही कामानिमित्त तो दिनांक २ मार्च २०२५ रोजी आपल्या मित्रासोबत बऱ्हाणपूर येथे गेला होता. दरम्यान, मध्य प्रदेशातील चापोरा – दापोरा या ठिकाणी झालेल्या भीषण अपघातात त्याचा मृत्यू झाला. विश्वजीत हा तालुक्यात सर्वत्र ओळखला जाणारा, मनमिळाऊ आणि प्रेमळ स्वभावाचा तरुण होता. त्याच्या अकाली निधनाने मित्रमंडळी आणि तालुक्यातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या जाण्याने कुटुंबावर आणि मित्रांवर मोठा आघात झाला असून परिसरात शोककळा…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आज पासून अर्थसंकल्पीय अधिवेशनात सर्वात प्रामुख्याने मुद्दा हा शेतकऱ्यांच्या समस्या संदर्भात असणार आहे. तसेच अलीकडच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी राजे यांच्या बद्दल गरळ ओकणारी प्रवृत्ती निर्माण झाली आहे. यात राहुल सोलापूरकर असो किंवा प्रशांत कोरटकर असो. अशा प्रवृत्तीला चाप लावण्याकरता, कठोर कायदा करून त्यांना तात्काळ जेल बंद करावे, अशी मागणी आपण अधिवेशनात करणार असल्याचे आमदार अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. या वेळी मिटकरी यांनी प्रशांत कोरटकर यांचाही चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले की, प्रशांत कोरटकरने दिलगिरी व्यक्त न करता, माफी न मागता, एखादा चोर डल्ला टाकल्यानंतर…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील एकनाथ शिंदे यांच्या पक्षात प्रवेश घेण्यासाठी अनेकांची रीघ लागली असून ठाकरेंच्या पक्षाला मोठा धक्का बसत आहे. नुकतेच आता शिंदेंच्या मंत्र्यांनी ठाकरे गटावर टीकास्त्र सोडले आहे. न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट म्हणाले कि, आमच्याकडे गँग आहे, ठाकरे सेनेला राज्यात गळती लागली आहे. त्यांच्याकडे केवळ ‘हम दो हमारे दो’च उरले आहेत. त्यामुळे त्यांचा अधिक विचार करण्याची गरज नाही. बाळासाहेब ठाकरे असताना सामना सर्वत्र वाचला जायचा, आता रात्रीची न उतरलेले लोक त्यात लिहितात त्यामुळे त्याचे महत्त्व संपले आहे. हे भारतीय जासूस मनघडन कहानिया सामनात लिहितात, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना लगावला. जागतिक धम्म…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील स्वारगेट बसस्थानकात २६ वर्षीय तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करणारा आरोपी दत्तात्रय गाडे याला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. सध्या पोलिस कोठडीत असलेल्या गाडेने स्वारगेट प्रकरणात तरुणीवर बलात्काराची कबुली देण्यासोबतच अनेक गैरप्रकार केल्याचे सांगितले. शिरूर परिसरात एका लॉजबाहेर बसून विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांचे लॉजबाहेर पडताना छुपे व्हिडिओ काढत आरोपी महिलांना ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवण्यासाठी त्यांना जबरदस्ती करत असल्याची बाबदेखील पोलिसांना गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाल्याने त्यानुसार चौकशी करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून त्यावर यापूर्वी चोरीचे ६ गुन्हे दाखल आहेत. त्यासोबत त्याने अनेक महिलांसोबत गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. शिरूर…

