जामनेर : प्रतिनिधी पहूर येथील येथील शेतकरी गजानन तुळशीराम पाटील यांना दोन जणांनी मुलीला रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखवून दहा लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी पहूर पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल करून एकाला अटक केली आली आहे, तर दुसरा फरार आहे. सविस्तर वृत्त असे कि, जितेंद्र भागवत थाटे (३५, रा. विवेकानंद नगर, जळगाव) आणि तुषार दीपक गावंडे (३०, रा. गिरिजा कॉलनी जामनेर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. यापैकी तुषार हा अटकेत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पहूर येथील शेतकरी गजानन तुळशीराम पाटील हे परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांची मुलगी रेल्वेच्या नोकरीसाठी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. पाटील यांच्या पत्नीच्या कार्यालयात…
Author: editor desk
मेष राशी दीर्घकाळ चाललेल्या समस्या आज संपतील. जमीन, इमारत, वाहन संबंधित कामातील अडथळे कमी होतील. तुम्ही पराक्रमाने काहीतरी नवीन करून दाखवण्यास उत्सुक असाल. पण सुरुवातीला तुम्हाला थोडा जास्त संघर्ष करावा लागेल. हळूहळू परिस्थिती सुधारेल. चांगल्या मित्रांचे सहकार्य वाढेल वृषभ राशी आज तुम्ही आर्थिक बाबतीत भांडवल गुंतवू शकता. भौतिक सुखसोयींवर अधिक खर्च होऊ शकतो. नवीन जमीन, इमारती, वाहने, घरे खरेदी-विक्रीसाठी परिस्थिती विशेष चांगली नाही. याबाबत नीट विचार करून निर्णय घ्या. मिथुन राशी समाजात मान-सन्मान मिळेल. तुम्हाला तुमच्या आईकडून खूप प्रेम मिळेल. मित्र आणि प्रियजनांच्या माध्यमातून घरगुती प्रश्न सुटतील. प्रियजनांच्या मतामुळे तुमचे व्यक्तिमत्व बदलेल. निसर्गाच्या सानिध्यात राहण्याची संधी मिळेल. कर्क राशी…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील नाशिक शहरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार देवयानी फरांदे यांनी गंगापूररोडवरील एका कॅफेवर छापा टाकत कारवाई केली आहे. त्यावेळी कॅफेमध्ये सुरु असलेले प्रकार पाहून त्यांना धक्का बसला. या ठिकाणी तरूण-तरूणींना १०० ते २०० रूपयात रूम दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या कॅफेत तरुण तरूणांसाठी पडदे लावून खास सोय केली जात असल्याची तक्रार आल्यानंतर आज दि. 1 दुपारी आमदार देवयानी फरांदे यांनी विद्या विकास सर्कल जवळील हॉटेल मोगली कॅफे येथे पोलिसांना घेऊन धडक दिली. पोलिसांनी कॅफेमध्ये अनेक मुला मुलींना अश्लील चाळे करताना ताब्यात घेतले. यावेळी आमदार देवयानी फरांदे चांगल्याच…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बीड येथील सरपंच देशमुख खून प्रकरणात मोठी अपडेट समोर आल्यानंतर सर्वच विरोधक आता मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत असतांना नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी धनंजय मुंडेंवर टीकेची झोड उठवत त्यांची व नैतिकतेची केव्हा भेटच झाली नसल्याचा दावा केला. सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या व्यक्तीला (वाल्मीक कराड) एवढे अमानुष वागण्याचा अधिकारच कुणी दिला? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणात सीआयडीने 1500 हून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात वाल्मीक कराड हाच देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार असल्याचा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरापासून जवळ असलेल्या ममुराबाद येथील अरूणामाई कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात दुचाकीने जात असलेल्या दोन जणांनान भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून जोरदार धडक दिल्याने फार्मसी महाविद्यालयातील तरूण हा जागीच ठार झाला तर त्याचा सोबतचा मित्र हा गंभीर जखमी झाला आहे. जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मास्टर कॉलनीत फैसज पटेल हा तरूण आपल्या आईवडील व मोठे काका यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो ममुराबाद येथील अरुणामाई कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयात बी-फार्मसीच्या तृतीय वर्षाला शिक्षण घेत होता. नेहमीप्रमाणे शनिवारी १ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फैसल हा त्याचा मित्र वासीक याच्यासोबत…
रायगड : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील तरुणीवर अत्याचाराची घटना ताजी असतांना आता रायगड जिल्ह्यातील उरण येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. घटस्फोटाला नकार देणाऱ्या पतीचा मुलाच्या आणि मित्रांच्या सहाय्याने काटा काढण्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी उलवे पोलिसांनी पत्नी मुलासह अन्य दोघा जणांना अटक केली आहे. उलवे पोलिसांना नवी मुंबई विमानतळ सर्विस रोड वरून वहाळ गावकडे येणाऱ्या खाडीवरील पुलावर एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह २३ फेब्रुवारीला सापडला होता. उलवे पोलिस ठाण्यात याबाबत अकस्मात मृत्यू अशी नोंद घेऊन मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी चौकशी सुरू केली होती. त्याच दरम्यान रेश्मा सचिन मोरे व तिचा मुलगा हे दोघे तिचा पती सचिन मोरे हा…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे येथील स्वारगेट बस डेपो मध्ये झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्या वकिलांनी मोठा दावा केला आहे. या प्रकरणात दत्तात्रय गाडे आणि ती मुलगी एकमेकांना एक महिन्यांपासून ओळखत होते. दोघांमध्ये जे झाले ते संगनमताने झाले असून बलात्कार झाला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. ते दोघे एकाच बसमधून खाली उतरले, ते बस मधून कोठे गेले? याची माहिती घेण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. या दोघांमध्ये पैशांचा वाद झाला होता. त्यानंतर दत्तात्रय गाडे पळून गेल नाही तर तो त्याच्या गावी गेला होता. मात्र गावाला पोलिस छावणीचे रूप आल्याने तो लपून बसला, अशी माहिती देखील दत्तात्रय…
चाळीसगाव : प्रतिनिधी नातेवाईक असून घराकुलाचे कागद कपाटात असल्याचे भासवत घरात घुसून अज्ञात भामट्याने कपाटातील लॉकर तोडून त्यातील १ लाख २० हजारांची सोन्याची पोत चोरून दुचाकीवरून पळ काढल्याचा खळबळजनक प्रकार तालुक्यातील तरवाडे पेठ येथे दिवसाढवळ्या घडला. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तरवाडे पेठ येथील विजय पद्माकर अमृतकार यांच्या मातोश्री व त्यांची लहान मुलगी घरात होते, तर इतर कुटुंबीय शेतात गेले होते. दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अंदाजे २५ ते २८ वयाचा अनोळखी तरूण घरी आला. मी नांदेड येथून आलो असून तुमच्या सुनेचा नातेवाईक असून घरातून कागदपत्रे घेण्यास सांगितले आहे. तर ही कागदपत्रे कपाटात…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील कानळदा येथे एका शेतमजुराने नैराश्यातून छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना गुरुवारी २७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता उघडकीस आली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता जळगाव तालुका पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्त वृत्त असे कि, आनंदा धर्मा पाटील (वय ४०, रा. कानळदा ता. जळगाव) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते गावात आई, वडील, भाऊ, पत्नी, १ मुलगी यांच्यासह राहत होते. शेतमजुरी करून ते परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. आनंदा पाटील हे गुरुवारी २७फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घरी वरच्या मजल्यावर एकटेच होते. त्यावेळी त्यांनी छताला गळफास लावून घेत आत्महत्या…
जळगाव : प्रतिनिधी दोन महिन्यांपूर्वी नवीन घरात राहण्यासाठी आलेल्या एका ३२ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता बिबानगर येथे उघडकीस आली. सकाळी पत्नी झोपेतून उठल्यानंतर पतीचा गळफास घेतलेला मृतदेह दिसला. मृतदेह पाहताच पत्नीने आक्रोश केला. यासंदर्भात तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, समाधान रमेश शिरसाठ (वय ३२, रा. डांगरी, ता.अमळनेर, ह.मु. बिबानगर, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. ते महावितरण कंपनीत वायरमन म्हणून नोकरीला होते. समाधान शिरसाठ यांनी घरात सर्वजण झोपलेले असताना राहत्या घरात गळफास घेतला. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता त्यांच्या पत्नीच्या लक्षात…

