Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » अर्जुन खोतकर बरसले : उद्धव साहेबांना हिऱ्यासारखे लोक सांभाळता आले नाही !
    राजकारण

    अर्जुन खोतकर बरसले : उद्धव साहेबांना हिऱ्यासारखे लोक सांभाळता आले नाही !

    editor deskBy editor deskFebruary 14, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई : वृत्तसंस्था

    राज्यातील महाविकास आघाडीतील ठाकरे गटाला गेल्या काही महिन्यापासून गळती सुरु असतांना आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे राजन साळवी यांनी आज शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. त्यावरून शिंदे गटाचे नेते व जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी मोठे विधान केले आहे. उद्धव साहेबांना हिऱ्यासारखे आपले लोक होते ते सांभाळता आले नाही, हे दुर्दैव आहे, असे अर्जुन खोतकर म्हणाले आहेत.

    राजन साळवी यांचा पक्षप्रवेशावर अर्जुन खोतकर म्हणाले, उद्धव साहेबांना सोडून जाण्याचा प्रश्न नाही. त्यांनी विचारधारा बदलली आहे. शिवसेनाप्रमुखांचे आम्ही शिवसैनिक आहोत. शिवसेनाप्रमुख गेल्यानंतर हीच कमान उद्धव ठाकरे यांच्या हातात आली होती. परंतु उद्धव साहेबांना हे जे हिऱ्यासारखे आपले लोक होते ते सांभाळता आले नाही, हे दुर्दैव आहे. उद्धव ठाकरे यांना सोडून जाताना एकनाथ शिंदे असतील किंवा मी असेल आम्हाला दुःख झालेच आहे. आम्ही काय आनंदाने थोडी गेलो होतो किंवा शिंदे साहेब थोडी आनंदाने गेले.

    पुढे बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले, शिवसेनेत एक चांगली गोष्ट घडली आहे. खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे नेत आहोत. त्यामुळे साहजिकच अशा सर्व लोकांना शिवसेना सोडताना त्रासच होणार आहे. आदित्य ठाकरे यांनी केलेल्या दिल्ली दौऱ्यावर बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले, आता सूचना देऊन काय फायदा आहे. आता पाणी वाहून गेलेला आहे. आता काही होणार नाही. डॅमेज कंट्रोलच्या बाहेर या सर्व गोष्टी गेलेल्या आहे. त्यामुळे त्यांनी स्वतःच आता ज्याला जायचे त्यांनी जा, असे म्हटले आहे. म्हणजे त्यांच्या हातातले सगळे संपलेले आहे. कोणीही हातामध्ये आता राहिलेले नाही. तशीच अवस्था आता आदित्य ठाकरे यांची झालेली आहे.

    अर्जुन खोतकर म्हणाले, संसदेत किंवा विधिमंडळात खासदार, मंत्री, आमदार अशा प्रकारचे स्नेहभोजन आयोजित करत असतात. त्या स्नेह भोजनाला निमंत्रण आला असेल तर शिवसेना उबाठाचे काही लोक गेले असेल. त्यामुळे असे बंधन कुणावर टाकता येत नाही, असेही ते म्हणाले.

     

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    युद्धाच्या पार्श्वभूमीवरही सोन्याला ब्रेक; जळगावात दर १५०० रुपयांनी घसरले

    March 9, 2026

    बोर्ड परीक्षेत कॉपीचा मोठा भंडाफोड; सीसीटीव्हीमुळे 81 जणांवर कारवाई

    March 9, 2026

    खर्गे आणि सपकाळ यांना फडणवीसांचा बिनडोक टोला !

    March 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.