Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी  तालुक्यातील वरणगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात लग्नाच्या हळदी समारंभा दरम्यान झालेल्या वादातून मारहाणीची गंभीर घटना घडली असून, कोयत्याने हल्ला केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आतिश सिद्धार्थ इंगळे (वय ३८, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, वरणगाव) यांनी वरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि. २५ शनिवार रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास हळदी समारंभातील नाचगाण्याच्या कार्यक्रमात धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. या वादातून आरोपी गौरव राहुल कोरोसीया, हर्षल राहुल कोरोसीया आणि रोशन माळी (सर्व राहणार वरणगाव) यांनी फिर्यादीस शिवीगाळ करत चापटा-बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गौरव कोरोसीया व रोशन माळी यांनी विटांनी…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२७ एप्रिल २०२६ मेष राशी तुम्ही तुमच्या ध्येयांबद्दल सतर्क आणि उत्साही असाल. नवीन नोकरी मिळवण्याचे प्रयत्न यशस्वी होतील. व्यवसायात चढ-उतार होऊ शकतात, परंतु आज नवीन संधी निर्माण होतील. तुमच्या मुलांप्रति असलेल्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील आणि नातेसंबंध सुखकर राहतील. बऱ्याच काळापासून ठेवलेली रक्कम किंवा कर्ज परत केली जाऊ शकते. वृषभ राशी आज तुमचं ज्ञान वाढेल, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या कामात यश मिळवता येईल. नोकरीतील काही असमाधान कायम राहू शकते, परंतु व्यवसाय तेजीत राहील. नफा मिळण्याची शक्यता आहे, परंतु नातेसंबंधांमध्ये काही भावनिक दुरावा कायम राहू शकतो, म्हणून व्यावहारिक बाबींना प्राधान्य द्या आणि पुढे वाटचाल करा. तुमचे आरोग्य सामान्य राहील. मिथुन राशी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  रस्त्याने पायी जाणाऱ्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात मुरलीधर कृष्णा माळी (वय ४९, रा. दत्त मंदिराजवळ नशिराबाद, ता. जळगाव) यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. २४ एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास सॉ मीलजवळ घडली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील नशिराबाद यकेथील दत्त मंदिराजवळ मुरलीधर माळी हे वास्तव्यास आहे. दि. २४ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास गावातील दत्त मंदिर सॉ मीलजवळून पायी जात होते. यावेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली. या अपघातात माळी हे गंभीररित्या जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी फैजपूर शहरातील पिंपरुड रोडवर असलेल्या ‘श्रीधर गॅस एजन्सी’च्या गोदामावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी दरोडा टाकला. गोदामाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तब्बल १०० भरलेले गॅस सिलिंडर चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एजन्सीचे संचालक ललित रघुनाथ राणे यांनी फैजपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ललित राणे यांचे पिंपरुड शिवारात १२,००० किलो क्षमता असलेले भारत गॅसचे अधिकृत गोदाम आहे. शुक्रवारी (दि. २४) सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास राणे यांच्या पत्नी मृणाल आणि कर्मचारी दामोदर असटकर यांनी गोदाम व्यवस्थित बंद केले होते. त्यावेळी गोदामात घरगुती वापराचे १४.२ किलोचे २०९ भरलेले…

Read More

जळगाव : प्रतिनिधी एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात रात्रीच्या वेळी घरात घुसून १० वर्षीय बालिकेचे तोंड दाबून तिच्या २६ वर्षीय चुलत भावानेच तिचा विनयभंग केला. नात्याला काळिमा फासणारा हा धक्कादायक प्रकार दि. ३० मार्च रोजी रात्री घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात -तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका कुटुंबातील १० वर्षीय बालिका घरात असताना रात्रीच्या वेळी तिच्या चुलत भावाने घरात प्रवेश केला. त्यानंतर दरवाजा लावून बालिकेचे तोंड दाबले व तिचा विनयभंग केला. हा प्रकार कोणाला सांगितला तर तुला आणि तुझ्या भावाला मारून टाकेल, अशी धमकीदेखील तरुणाने दिली. यामुळे सदर बालिका भयभीत झाली होती. हा प्रकार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरात मोकाट कुत्र्यांचा त्रास पुन्हा एकदा तीव्र झाल्याचे समोर आले आहे. शनिवारी (दि. २५ एप्रिल) दिवसभरात शहरातील विविध भागांत कुत्र्यांनी तब्बल २१ जणांवर हल्ले करून त्यांना गंभीर जखमी केले. या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगरमधील उस्मानिया पार्क, पिंप्राळा, एमआयडीसीतील सुप्रीम कॉलनी, रामेश्वर कॉलनी तसेच अक्सानगर-निमखेडी शिवार परिसरात कुत्र्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला. वृद्धांसह लहान मुलांवरही हल्ले झाल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, कुत्र्यांच्या चावण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी मोठी गर्दी झाली होती. सकाळपासूनच अँटी रेबीज इंजेक्शन विभागात रुग्णांची रांग लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक भागात रस्त्यावर मांसविक्री…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२६ एप्रिल २०२६ मेष राशी कोणतेही काम अत्यंत सावधगिरीने करा. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे आज वाद टाळा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, विशेषतः मार्केटिंग, सॉफ्टवेअर आणि अकाउंटिंगच्या नोकऱ्यांमध्ये. आज तुम्हाला देशाच्या बाहेर जाण्याचा योग आहे.व्यवसायात परिस्थिती आरामदायक असली तरी, नातेसंबंधांमध्ये जास्त हिशेबीपणामुळे काही तणाव निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी अधिक मेहनत करणे आवश्यक आहे. मेष राशी कोणतेही काम अत्यंत सावधगिरीने करा. तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे आज वाद टाळा. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, विशेषतः मार्केटिंग, सॉफ्टवेअर आणि अकाउंटिंगच्या नोकऱ्यांमध्ये. आज तुम्हाला देशाच्या बाहेर जाण्याचा योग आहे.व्यवसायात परिस्थिती आरामदायक असली तरी, नातेसंबंधांमध्ये जास्त हिशेबीपणामुळे काही तणाव निर्माण होऊ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  बुलढाणा येथील आमदार संजय गायकवाड यांनी कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या राजकीय वादात सत्ताधारी शिवसेना पक्षाने अखेर माघार घेत स्वतःला त्या वक्तव्यापासून दूर केले आहे. गायकवाड यांचे विधान हे त्यांचे वैयक्तिक मत असून पक्षाचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणात आमदार गायकवाड यांनी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोनवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल संताप व्यक्त करत गंभीर धमक्या दिल्याचे ऐकायला मिळते. या घटनेमुळे राज्यातील राजकीय…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरात रस्ता सुरक्षेला प्राधान्य देत वाहतूक शाखेकडून व्यापक अभियान राबविण्यात आले असून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर आणि अवैध फॅन्सी नंबर प्लेटवर पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. या मोहिमेत एकूण १०० दुचाकींचे कर्कश सायलेन्सर जप्त करण्यात आले, तर २५० फॅन्सी नंबर प्लेट ताब्यात घेण्यात आल्या. विशेष म्हणजे, जप्त करण्यात आलेले सायलेन्सर आणि नंबर प्लेट आज रोड रोलरच्या सहाय्याने चेपून पूर्णतः निकामी करण्यात आले. वाहतूक शाखेच्या तपासणीदरम्यान असे निदर्शनास आले की अनेक दुचाकीस्वारांनी मूळ कंपनीकडून बसविण्यात आलेल्या सायलेन्सरऐवजी बाहेरून कर्कश आवाज करणारे सायलेन्सर बसवले होते. या सायलेन्सरमुळे स्थानिक रहिवासी, जेष्ठ नागरिक तसेच शाळकरी विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा…

Read More

बारामती : वृत्तसंस्था राज्यात अंधश्रद्धा व अघोरी प्रथांबाबत सुरू असलेल्या चर्चेला आता नवे वळण मिळाले असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या सोशल मीडिया पोस्टमुळे बारामतीत खळबळ उडाली आहे. नाशिक येथील भोंदूबाबा प्रकरणानंतर आधीच तापलेल्या राजकीय वातावरणात या नव्या दाव्यांमुळे अधिकच तणाव निर्माण झाला आहे. मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये बारामतीतील सहयोग घर, काटेवाडी येथील निवासस्थान तसेच विद्या प्रतिष्ठान परिसरात अघोरी विधी झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांच्या मते, असे प्रकार बाहेरून आलेल्या व्यक्तींना करणे शक्य नसून, यामागे स्थानिक पातळीवरील काही प्रभावशाली घटकांचा सहभाग असू शकतो. या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. डिसेंबर २०२५ मधील एका घटनेचा उल्लेख…

Read More