Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » भरधाव वाहनाचा कहर; २२ वर्षीय अग्निशमन जवानाचा जागीच मृत्यू
    क्राईम

    भरधाव वाहनाचा कहर; २२ वर्षीय अग्निशमन जवानाचा जागीच मृत्यू

    editor deskBy editor deskMarch 19, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव : प्रतिनिधी

    दीड वर्षांपुर्वीच वापी येथे अग्रिशमन विभागात नोकरीस लागलेल्या प्रफुल्ल सुनिल पाटील (वय २२, मूळ रा. भोकर, ता. जळगाव) या तरुणाला भरधाव वाहनाने दिलेल्या धडकेत मृत्यू झाला, ही घटना मंगळवार दि. १७मार्च रोजी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास चापी येथे घडली. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार,  तालुक्यातील भोकर येथे राहणारा प्रफुल्ल पाटील हा वापी येथील अग्निशमन दलात आपली सेवा बजावत होता. मंगळवारी रात्री आपली ड्युटी संपवून तो खोलीवर परतला होता. जेवण झाल्यानंतर तो काही वेळासाठी शत्तपावली करण्यासाठी बाहेर पडला. याच दरम्यान भरधाव वेगाने आलेल्या एका अज्ञात वाहनाने त्याला जोराची धडक दिली. या अपघातात प्रफुल्लचा जागीच मृत्यू झाला, त्याच्या पश्चात आई, वडील, लहान भाऊ आणि आजी असा परिवार आहे.

    प्रफुल्ल हा अत्यंत मेहनत्ती आणि होतकरू युवक होता. अवघ्या २१ व्या वर्षी, म्हणजेच दीड वर्षांपूर्वी ती अग्निशमन विभागात भरती झाला होता, त्याचे वडील सुनील पाटील हे भोकर येथे शेती करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, घराची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रफुल्ल बाहेरगावी नोकरीला गेला होता, मात्र काळाने त्याच्यावर झडप घातली.

    प्रफुल्लच्या निधनाची बातमी धडकताच भोकर गावासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बुधवारी, १८ मार्च रोजी त्याचा मृतदेह वापी येथून मूळ गावी भोकर येथे आणण्यात आले. यावेळी गावातील वातावरण अत्यंत सुन्न झाले होते. शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    ‘धनंजय मुंडे दुसरे खरातच’; करुणा मुंडे यांचा खळबळजनक आरोप, चौकशीची मागणी

    April 15, 2026

    चाकणकर प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; अदिती तटकरे यांच्यावर थेट सवालांचा भडिमार !

    April 15, 2026

    कासमवाडीत शस्त्रांसह फिरणाऱ्या दोघांना अटक; पोलिसांची धडक कारवाई

    April 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.