Close Menu
Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Facebook X (Twitter) Instagram
    Facebook X (Twitter) Instagram
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Button
    • Home
    • राष्ट्रीय
    • राज्य
    • जळगाव
    • क्राईम
    • राजकारण
    • शैक्षणिक
    • सामाजिक
    Live Maharashtra NewsLive Maharashtra News
    Home » चिंचोलीत दुचाकींची समोरासमोर धडक; चिमुकल्यासह पाच जखमी
    क्राईम

    चिंचोलीत दुचाकींची समोरासमोर धडक; चिमुकल्यासह पाच जखमी

    editor deskBy editor deskMarch 19, 2026No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल : प्रतिनिधी

    चिंचोली बसस्थानकाजवळ १८ रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोन्ही दुचाकींवरील बालकासह ५ जण जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना तातडीने जळगाव येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, चिंचोली येथील प्रमोद प्रकाश साळुंखे हे आपली पत्नी जयमाला साळुंखे व मुलगा प्रिन्स साळुंखे (वय २ वर्षे) यांच्यासह आपल्या दुचाकीवरून चिंचोली पेट्रोल पंपाकडून चिंचोली गावात जात होते. तर चोपडा शहराकडून किनगावकडे चोपडा तालुक्यातील पारगाव येथील भावेश गणेश पाटील व कपिल विकास कोळी हे पल्सर गाडी (एमएच १९, बीव्ही- ९५५५) ने जात होते. चिंचोली बसस्थानकाजवळ या दोन्ही दुचाकी एकमेकांवर समारासमोर धडकल्या.

    या अपघातात चिंचोली येथील प्रमोद साळुंखे, जयमाला साळुंखे व प्रिन्स साळुंखे यांच्यासह पारगाव येथील भावेश पाटील व कपिल कोळी हे पाचही जण गंभीर जखमी झालेत. जखमींना तातडीने जळगाव येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, यावल पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी किशोर परदेशी व होमगार्ड संजय साळुंखे हे कर्तव्य बजावत होते, त्यामुळे ५ मिनिटांतच घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर अनिल सोळुंके व दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांनी जखमींना तत्काळ खासगी वाहनाने जळगाव येथे उपचारार्थ रवाना करण्यास सहकार्य केले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    editor desk

    Related Posts

    धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

    August 6, 2026

    निमखेडी भूखंड प्रकरण तापलं; विष्णू भंगाळेंना १५ दिवसांचा अल्टिमेटम!

    August 5, 2026

    १५ ऑगस्टपर्यंत काम करा; अन्यथा ‘रस्ता रोको’! GPS मित्र परिवाराचा NHAI ला अल्टिमेटम

    August 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    Facebook X (Twitter) Instagram Pinterest
    © 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.