Author: editor desk

पाचोरा : प्रतिनिधी  शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्यांविरुद्ध पाचोरा पोलिसांनी मोठी मोहीम उघडली आहे. २४ एप्रिल रोजी राबवलेल्या विशेष मोहिमेत २५ जणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. पाचोरा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. २४ तारखेला सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत शहरातील विविध भागांत पोलिसांनी अचानक छापे टाकले. यावेळी सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करताना आढळलेल्या २५ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या सर्व संशयितांना पाचोरा पोलिस ठाण्यात आणून त्यांच्यावर महाराष्ट्र पोलिस कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील कायदेशीर प्रक्रिया पोलिस प्रशासनाकडून पूर्ण केली जात आहे. ही कारवाई पाचोरा पोलिस…

Read More

आजचे राशिभविष्य दि.२८ एप्रिल २०२६ मेष राशी आज, नक्षत्राचा स्वामी तुमच्या धनस्थानातून भ्रमण करेल. आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करण्याचा हा दिवस आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वात आकर्षण आणि वाणीचा प्रभाव वाढेल, तसेच संभाषणातून वादही मिटू शकतील. तुम्ही एका मोठ्या गुंतवणुकीत भागीदार होऊ शकता, ज्यामुळे भविष्यात लाभ मिळेल. तुमची नोकरी आणि व्यवसाय अनुकूल राहील आणि नातेसंबंध सुखकर राहतील. वृषभ राशी भगवान विष्णूच्या आशीर्वादाने, तुमची नियोजित कामे आज पूर्ण होतील, ज्यामुळे तुमच्या मनाला आनंद मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचे काम सादर करण्यावर लक्ष केंद्रित करा; यामुळे तुमचे यश आणि नफा निश्चितपणे वाढेल. व्यवसाय अनुकूल राहील आणि तुम्हाला तुमच्या व्यावसायिक प्रयत्नांमध्ये यश मिळेल. तुमचा आनंद वाढेल. तुम्ही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  “माझं गाव – आरोग्य संपन्न गाव” अभियान आढावा बैठक पार पडली. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, हे अभियान केवळ पुरस्कारासाठी नसून प्रत्येक गाव आरोग्यदृष्ट्या सक्षम करण्याची मोठी संधी आहे. जळगाव जिल्ह्याने या अभियानात राज्यात अव्वल स्थान मिळवण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. राज्यात 1 एप्रिल 2026 पासून सुरू झालेल्या या अभियानाचा उद्देश प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण व सहज उपलब्ध आरोग्य सेवा देणे हा आहे. ग्रामीण भागात आरोग्य सुविधा बळकट करणे आणि संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण कमी करणे हे यामागील प्रमुख ध्येय आहे. चांगली कामगिरी करणाऱ्या ग्रामपंचायतींना…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था  राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी नागपुरात झालेल्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या कार्यक्रमावरून राज्य सरकार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. शास्त्री यांच्या वादग्रस्त वक्तव्यांनंतरही त्यांचे कार्यक्रम सुरू ठेवण्यात येत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. नागपुरातील कार्यक्रमादरम्यान धीरेंद्र शास्त्री यांनी रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते, असा दावा केला. या विधानावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेससह विविध विरोधी पक्षांनी शास्त्रींवर टीकेची झोड उठवली आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना रोहित पवार म्हणाले, “सत्तेतल्या एका मोठ्या पक्षाला वगळता संपूर्ण महाराष्ट्राने या भोंदूगिरीचा निषेध केला आहे. तरीही नागपुरात या कार्यक्रमांना…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  मुंबईत रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या प्रस्तावावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंत्रालयात बैठक बोलावली असली, तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)ला निमंत्रण न दिल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त करत सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी ‘व्यावहारिक मराठी’ अनिवार्य करण्याचा निर्णय अंमलात आणण्यापूर्वी सर्व संबंधित पक्षांशी चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली होती. मात्र, मराठीच्या मुद्द्यावर सातत्याने भूमिका मांडणाऱ्या मनसेला या बैठकीत सहभागी करून न घेतल्याने राजकीय वातावरण तापले आहे. संदीप देशपांडे यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्क चौफुलीवर सोमवारी सकाळी भीषण अपघात घडून एका २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. ओम सुनील गिरी (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ओम गिरी हा आपल्या दुचाकीने मानराज पार्क चौफुलीवरून जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने त्याला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, ओम ट्रकच्या चाकाखाली सापडल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघात होताच परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसही तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नागरिकांच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष आता अधिक तीव्र होत असून, शाब्दिक चकमकींनी वैयक्तिक पातळी गाठल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी आमदार नवनीत राणा यांच्या चित्रपट क्षेत्रातील पार्श्वभूमीवरून केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या राजकीय वादाला तोंड फुटले आहे. माध्यमांशी बोलताना वडेट्टीवार यांनी नवनीत राणांवर टीका करताना म्हटले की, “त्या स्वतःला मोठं समजतात आणि इतरांना कमी लेखतात. ‘सी-ग्रेड’ चित्रपटातील अभिनेत्री असल्यामुळे त्या स्वतःला ‘ग्रेट’ समजत असाव्यात.” त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना आमदार रवी राणा यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. पत्नी नवनीत राणांवर झालेल्या टीकेचा समाचार घेत त्यांनी वडेट्टीवारांवर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक परिसरात आज सकाळी भीषण आगीची घटना घडली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयातील कॅन्टींगजवळ असलेल्या स्टोअर रूमला अचानक आग लागल्याने परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक कार्यालयातील कॅन्टींगजवळ असलेल्या स्टोअर रूममध्ये अचानक आग लागली. आग लागताच परिसरात धुराचे लोट पसरले आणि तातडीने महानगरपालिकेचे दोन अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले होते. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तर मनपाच्या अग्निशमन पथकात अधिकारी अश्वदीप घरडे, वाहनचालक देविदास सुरवाडे, अक्षय नाईक, भगवान पाटील,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील इस्लामपुरा भागातील कसाई गल्लीत बेकायदेशीरपणे गोमांस विक्री करणाऱ्या दुकानावर शनिवारी दि. २६ रोजी शनिपेठ पोलिसांनी छापा टाकला. याठिकाणाहून सुमारे ३० किलो गोमांस आणि मांस कापण्याचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी आजम शेख सलीम शेख (वय २४) या संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील शनिपेठ पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक साजिद मन्सुरी यांना मिळालेल्या माहितीनुसार शहरातील इस्लामपुरा भागातील मदिना मशीद जवळ एका लाकडी पार्टीशनच्या दुकानात गोमांसाची बेकायदेशीर विक्री होत आहे. या माहितीची खात्री करण्यासाठी सपोनि मन्सुरी यांनी पोलीस पथक आणि दोन पंचांना पाचारण केले. सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास पोलीस पथक घटनास्थळी रवाना…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  चाळीसगाव ते कन्नड घाट मार्गावर म्हसोबा मंदिराच्या पुढे रविवारी दुपारच्या सुमारास कारचा अपघात झाला. या अपघातात कारमधील पोलीस अंमलदारासह चौघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. चाळीसगाव शहराकडून (एमएच ०१, बीवाय ५३७१) क्रमांकाची कार कन्नड घाटाकडे जात होती. घाटातील वळणावर कट लागल्याने वाहन घसरुन अडकले. या अपघातात कारमधून प्रवास करणारे धनी पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार दिनेश बारड (वय ५१), तेजश्री बारड (वय ४८), नंदिनी बारड (वय २२) व वेदांत बारड (वय १८, सर्व रा. कल्याण) हे चौघे किरकोळ जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच चाळीसगाव महामार्ग पोलीस केंद्राचे…

Read More