
जळगाव : विजय पाटील
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे आज दिनांक 30 सप्टेंबर रोजी माजी मंत्री व शरद पवार गटाचे आमदार एकनाथराव खडसे यांच्या अमृत महोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात सुरू आहे मात्र या कार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्र्यांपासून ते थेट जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक आमदार खासदाराला आमंत्रण होते मात्र या कार्यक्रमाला भाजपच्या सर्वच नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरवली आहे.
राज्यात एकेकाळी बारा खात्याचे मंत्री म्हणून प्रसिद्ध असलेले मुक्ताईनगर चे आमदार एकनाथराव खडसे हे 74 वर्षे पूर्ण करून 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहे त्यानिमित्त मुक्ताईनगर शहरात अमृत महोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साह सुरू झाला आहे मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे दिग्गज नेते विनोद तावडे ते थेट जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघातील आमदार व खासदाराला निमंत्रण दिले होते मात्र या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर केवळ रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार व आमदार एकनाथराव खडसे यांच्या सून खासदार रक्षाताई खडसे हेच उपस्थित आहे मात्र या कार्यक्रमास भाजपचे कुठलेही दिग्गज नेते किंवा जिल्ह्यातील एकही आमदार खासदार उपस्थित नसल्याने या कार्यक्रमाची चर्चा जिल्हाभर होऊ लागली आहे राज्यभराचे या कार्यक्रमाकडे लक्ष होते की या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे संकटमोचक मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहतील की नाही याबाबत मोठी संभ्रम अवस्था होती मात्र आता या कार्यक्रमास या दोन दिग्गज नेत्यांनी उपस्थिती न लावल्याने मोठी चर्चा सुरू झाली आहे.



