जळगाव : प्रतिनिधी पाळधीसह परिसरातील ३० हजार विद्यार्थ्यांना शुक्रवारी वह्या पुस्तकांचे वाटप तर दिव्यांगाना तीनचाकी सायकलींचे वितरण करण्यात आले. वाढते तापमान लक्षात घेता पाळधी परिसरात ऑक्सिजन पार्कची निमिर्ती करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. पालकमंत्री गुलाबराव पाटील याच्या वाढदिवसानिमित्ताने हे विविध उपक्रम राबवण्यात आले. जीपीएस कॅम्पस हायस्कूलच्या मैदानावर हे उपक्रम घेण्यात आले. मंत्री गुलाबराव पाटील यांच्या समाज सेवेच्या विचारांनुसार शुभेच्छुकांनी ३० हजारांहून अधिक वह्या, शैक्षणिक साहित्य आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त वस्तू भेट देऊन वाढदिवसाला सामाजिक बांधिलकीची जोड दिली. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून प्रत्येक शुभेच्छुकाला एक झाड देण्यात आले. ‘एक झाड… भावी पिढ्यांसाठी जीवनाचा श्वास’ हा संदेश देत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था मराठा समाजाच्या आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी फडणवीस सरकारने एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, आता इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणेच मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शासनाच्या सर्व प्रकारच्या शैक्षणिक सवलती आणि सोयी-सुविधा लागू करण्यात येणार आहेत. शासनाच्या या नव्या धोरणांतर्गत, ओबीसी प्रवर्गाच्या धर्तीवर मराठा समाजासाठी तब्बल 8 विशेष योजना सुरू करण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे मराठा समाजातील हजारो होतकरू विद्यार्थ्यांना उच्च आणि व्यावसायिक शिक्षण घेताना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी लागू करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण 8 योजना नेमक्या कोणत्या आहेत, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. ओबीसींप्रमाणेच मराठा समाजाला मिळणाऱ्या प्रमुख…
चाळीसगाव : प्रतिनिधी शहरालगतच्या डेराबर्डी परिसरातील समर्थ पाव बेकरीमध्ये काम करणाऱ्या एका तरुणावर जुन्या वादातून कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना ३ जून रोजी दुपारी घडली. या हल्ल्यात तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, डेराबडी येथील जखमी अजय शिवाजी चव्हाण (वय २४) हा समर्थ पाव बेकरीमध्ये कारागीर म्हणून काम करतो. अजयच्या फिर्यादीनुसार, त्याची बहिण आणि संशयित ममराज हरीलाल जाधव यांच्यात पूर्वी ओळख असल्यामुळे काही वर्षांपूर्वी दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला होता. हा वाद समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या मध्यस्थीने मिटवण्यात आला होता. मात्र, त्यानंतरही ममराज जाधव हा जुन्या वादाची कुरापत काढून वारंवार भांडण करत असल्याचा आरोप करण्यात…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यात संशयास्पद एचटीबीटी कापूस बियाण्यांच्या अवैध विक्रीप्रकरणी कृषी विभागाच्या कारवाईत १ हजार १६ बियाणे पाकिटे जप्त करण्यात आली असून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृषी विभागाने दि. ३ जून रोजी पाठविलेल्या डमी ग्राहकास १ हजार संशयास्पद कापूस बियाणे पाकिटांची प्रत्येकी १२०० दराने विक्री करण्याचा व्यवहार पिंप्री.ता. धरणगाव येथे गुलाब आधार पाटील, भूषण पाटील व दीपक राजकमल चौधरी यांनी ठरविला होता. मात्र व्यवहार अंतिम टप्प्यात असताना पोलीस पाळत ठेवत असल्याचा संशय आल्याने संबंधितांनी बियाण्यांची विक्री न करता तेथून पलायन केले. त्यानंतर कृषी विभागाने स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाच्या मदतीने तांत्रिक तपास करून संबंधितांचा शोध घेतला. चौकशी दरम्यान…
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील सावखेडा येथील तापी नदीपात्रातील वाळू घाटावर मोठ्या प्रमाणात झालेल्या अवैध वाळू उत्खनन प्रकरणी महसूल प्रशासनातील अधिकाऱ्यांवर कारवाईची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. कर्तव्यात हलगर्जीपणा आणि देखरेखीतील त्रुटी आढळल्याच्या पार्श्वभूमीवर सावखेडा मंडळाच्या मंडळाधिकारी कल्याणी पाटील आणि तलाठी पवनकुमार शिंगारे यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सावखेडा येथील तापी नदीपात्रात नियमबाह्य पद्धतीने मोठ्या प्रमाणावर वाळूचा उपसा करण्यात आल्याचे अलीकडेच उघड झाले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासनाने धडक कारवाई करत लाखो रुपयांचा वाळूसाठा जप्त केला होता. जप्त करण्यात आलेल्या वाळूसाठ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून वाळू, यंत्रसामग्री आणि…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एकलग्न येथील अशोक रतन पाटील (वय ७२) यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. मिळालेल्या माहितीनुसार, एकलग्न येथील अशोक पाटील हे ५ जून रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास शेतामध्ये काम करत होते. या वेळी अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने उपचारासाठी डॉक्टरांकडे नेण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, तीव्र उष्णतेचा फटका बसल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, मयत अशोक पाटील हे शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. त्यांच्या आकस्मात निधनामुळे एकलग्न गावात शोककळा पसरली आहे. तर अशोक पाटील यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
जळगाव : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील वरणगावजवळ शुक्रवारी दुपारी भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत एका महिलेसह दोन बालके आणि एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या भीषण अपघातामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या नातेवाईकांनी अपघातास कारणीभूत वाहनचालकावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर येथील फासे पारधी समाजातील काही कुटुंबीय वरणगाव परिसरातील कपीलनगर येथे पत्र्याच्या घरात वास्तव्यास होते. ते गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून या ठिकाणी राहत होते. शुक्रवारी दुपारी जय शंकर काळे (वय १९) हा आपल्या मामी ऐश्वर्या बहाद्दूर भोसले (वय ३०), विघ्नेश शंकर चव्हाण (वय १४) आणि मोनालिसा शिवबसप्पा…
मुंबई : वृत्तसंस्था रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेना (ठाकरे गट) उमेदवार बाळ माने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. या घडामोडीवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केल्याचा दावा केला आहे. गुरुवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी बाळ माने यांनी माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याचा मार्ग प्रशस्त झाला. महायुतीकडून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र या जागेवर शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात अंतर्गत…
मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. संजय राऊत हे दादर येथील शिवाजी पार्क परिसरातील राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी दाखल झाले. या भेटीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी विविध राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. राज्यात विधान परिषदेच्या १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू असून महायुतीने आतापर्यंत ६ जागांवर विजय मिळविला आहे. जळगाव आणि नाशिकमध्ये बंडखोरीमुळे काही ठिकाणी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत. महायुतीतच अनेक ठिकाणी चुरशीची लढत पाहायला मिळत असून महाविकास आघाडी…
जळगाव : प्रतिनिधी शासनाच्या योजनेतर्गत अत्यावश्यक संच व सुरक्षा संच घेण्यासाठी गेलेल्या तक्रादाराला संच वाटप केंद्रावरील खासगी व्यक्ती असलेल्या भाग्यश्री विजय पाटील (वय २०, रा. सामनेर, ता. जळगाव) या तरुणीला शंभर रुपयांची लाच घेतांना गुरुवारी एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी तरुणीजवळ असलेल्या डब्ब्यातून लाचेपोटी स्विकारलेली २६ हजार ७७० रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली. तक्रादार यांनी ३ जून रोजी अत्यावश्यक संच व सुरक्षा संच मिळण्याकरीता नोंदणी केली होती. ४ जून रोजी संच घेण्याकरीता जळगाव तालुक्यातील वावडदा येथे संच वाटप केंद्रावर गेले होते. या केंद्रावर असलेल्या भाग्यश्री पाटील यांनी तक्रादार यांना तुमची केवायसी करीता दोन फॉर्म विकत घ्यावे लागतील त्याकरीता शंभर रुपयांच्या…

